Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आवळा खाण्याचा सल्ला! शक्तिशाली घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास राहाल कायम निरोगी

Benefits Of Amla: रोजच्या आहारात नियमित एक आवळा खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच शरीराला आवश्यक प्रमाणात विटामिन सी आणि फायबर मिळेल. आवळ्यातील घटक केसांची वाढ करून केस घनदाट आणि मजबूत करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 30, 2026 | 08:02 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आवळा खाण्याचा सल्ला! शक्तिशाली घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास राहाल कायम निरोगी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आवळा खाण्याचा सल्ला! शक्तिशाली घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास राहाल कायम निरोगी

Follow Us
Follow Us:

आवळा खाण्याचे फायदे?
कोणत्या वेळी आवळ्याचे सेवन करावे?
पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी उपाय?

Benefits Of Amla: आयुर्वेदामध्ये आवळ्याला अमृतफळ म्हंटले जाते. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात बोलताना आवळ्याबद्दल बोलून आहारात नियमित एक आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. दिसायला लहान असलेले आवळे हे फळ चवीसाठी आणि संपूर्ण शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. दैनंदिन आहारात नियमित एक आवळा खाल्ल्यास महिनाभरात केसांच्या वाढ होण्यासोबतच त्वचा आणि पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. अनेक घरांमध्ये आवळ्याचे लोणचं, आवळ्याचे सरबत, आवळा कँडी, मुरंबा, चटणी इत्यादी विविध पदार्थ बनवून खाल्ले जातात. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला आवळा पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत आहारात कायमच खाल्ला जातो.(फोटो सौजन्य – istock)

No Sugar Benefits: साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

आवळ्याची चव तुरट किंवा आंबट लागते. त्यामुळे अनेक लोक आवळ्याचे सेवन करणे टाळतात. पण शरीरासाठी फायदेशीर असलेला आवळा नियमित खाणे आवश्यक आहे. आवळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात विटामिन सी आणि इतर आवश्यक घटक असतात. आकाराने लहान असलेला आवळा शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतो. यासोबतच केस, त्वचा आणि अपचनाच्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे फारच आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया नियमित आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती.

आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

आवळ्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तसेच विटामिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल, टॅनिन याशिवाय कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस इत्यादी शरीरास आवश्यक असलेले घटक आवळ्यात असल्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आवळा किंवा आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. संत्र्यापेक्षा जास्त पटीने आवळ्यात विटामिन सी असते. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि सर्दी खोकल्यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे.

रोजच्या आहारात फायबर असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. पचनक्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. गॅस, अपचन, छातीत जळजळ किंवा बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात आवळा खाणे फायदेशीर ठरते. आवळा खाल्ल्यामुळे पोटात थंडावा टिकून राहतो.

APL Blood Cancer: ताप गेला पण रक्तात गडबड कायम, तपासणी केली तर निघाला दुर्मिळ रक्ताचा कॅन्सर

मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास पाण्यात आवळ्याचे सरबत मिक्स करून प्यावे. यामध्ये असलेले क्रोमियम घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.शरीरातील खराब कोलेस्टेरॉल नष्ट करून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आवळा खावा. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करून लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आवळ्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कच्चा आवळा खाण्याचा कंटाळा येत असेल तर ज्यूस, चटणी, आवळा सुपारी किंवा उकळून खाऊ शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आवळा आरोग्यासाठी फायदेशीर का मानला जातो?

    Ans: आवळ्यामध्ये Vitamin C आणि polyphenols सारखे जैवसक्रिय घटक आढळतात. Vitamin C शरीरातील antioxidant म्हणून काम करते आणि रोगप्रतिकारक यंत्रणेच्या कार्यातही भूमिका बजावते.

  • Que: रोज आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते का?

    Ans: Vitamin C सामान्य रोगप्रतिकारक कार्यासाठी महत्त्वाचे आहे. मात्र केवळ आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती ‘कायमची वाढते’ असे म्हणणे योग्य नाही; संतुलित आहार महत्त्वाचा आहे.

  • Que: आवळा पचनासाठी उपयुक्त आहे का?

    Ans: आवळ्यातील फायबर आणि इतर जैवसक्रिय घटक पचनाशी संबंधित आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र पचनाच्या आजारांवर आवळा हा उपचार आहे असे समजू नये.

Web Title: Prime minister narendra modi advises eating amla consuming foods rich in potent nutrients will keep you healthy forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • amla benefits
  • amla for hair
  • Narendr Modi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.