फोटो सौजन्य - Social Media
उसाचा रस कुणाला नाही आवडत? पण ती पिण्याची एक वेळ असते. उसाचा रस पचनास गरम आहे. ताजेतवाने करण्याच्या नादात भर उन्हात अनेक जण उसाचा रसाचे सेवन करण्याची चूक करतात आणि आरोग्याचे तीन तेरा वाजवून टाकतात. मुळात, उसाचे रसाचे सेवन करण्यामागचे काही कारणे आहेत की ताजेतावाने होणे, लगेच एनर्जी मिळवण्यासाठी तसेच शरीराला थंडावा देण्यासाठी उसाचा रस प्यायला जातो.
उसाचा रस पिण्यामागे अनेक फायदे आहेत. उसाचा रस प्यायल्याने शरीराला एनर्जीतर मिळतेच तसेच शरीराचे डिहायड्रेशनपासून सुरक्षा होते. उसाचा रस यकृताच्या आरोग्यसाठी फायद्याचे असते. तसेच पचनासाठीदेखील उसाचा रस फायद्याचा आहे. भर उन्हात उसाचा रस पीत असाल तर सावध व्हा. उन्हाळ्यात रस लवकर खराब होत असतो आणि नकळत ते प्यायल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो. उघड्यावर ठेवलेला रस दूषित होण्याचा धोका वाढतो. तसेच बॅक्टेरिया आणि फंगसची वाढ होऊन फूड पॉइझनिंगचा धोका होतो. गोड रसामुळे शरीरात ब्लड शुगर झपाट्याने वाढतो आणि मधुमेहींना विशेषतः नुकसान होऊ शकते
उसाचा रस पीत असाल तर काही सावधगिरी नक्की बाळगा आणि आरोग्याचे तीन तेरा वाजण्यापासून वाचावा. खराब पाणी किंवा बर्फ मिसळल्यामुळे पचनाचे विकार होऊ शकतात, त्यामुळे रस मागवण्याआधी बारकाईने निरीक्षण करा. अशुद्ध रसामुळे विषबाधा किंवा इतर आजार होण्याची शक्यता असते.
उसाचा रस घेताना काही काळजी घेतल्या पाहिजेत जसे की नेहमी ताज्या उसाचा आणि स्वच्छ ठिकाणी तयार केलेला रस घ्या, जूस मशीनची आणि वापरण्यात येणाऱ्या पाण्याची स्वच्छता तपासा, जड जेवणानंतर किंवा अगदी उपाशीपोटी रस पिऊ नका, उन्हात घाम आल्यावर थोडी विश्रांती घेऊन मग रस प्या, मधुमेह असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच रस प्यावा. मुळात, उसाचा रस उन्हाळ्यात फायदेशीर आहे, पण योग्य काळजी घेतली नाही तर तो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.