Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Protein Foods: प्रोटीन वाढवण्यासाठी सप्लिमेंट्सचे सेवन करत असाल तर थांबा! दैनंदिन आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचे सेवन

Protein Foods: शरीरात निर्माण झालेली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी महागड्या सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी या शक्तिशाली पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात प्रोटीन मिळते आणि स्नायूंची ताकद वाढते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 14, 2026 | 07:55 AM
Protein Foods: प्रोटीन वाढवण्यासाठी सप्लिमेंट्सचे सेवन करत असाल तर थांबा! दैनंदिन आहारात करा 'या' शक्तिशाली पदार्थांचे सेवन

Protein Foods: प्रोटीन वाढवण्यासाठी सप्लिमेंट्सचे सेवन करत असाल तर थांबा! दैनंदिन आहारात करा 'या' शक्तिशाली पदार्थांचे सेवन

Follow Us
Follow Us:

प्रोटीन वाढवण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन:
शरीराला नियमित किती प्रोटीनची आवश्यकता असते?
पसप्लिमेंट्सचे सेवन केल्यास शरीराला कोणती हानी पोहचते?

Protein Foods: शरीराला सर्वच विटामिनची योग्य प्रमाणात आवश्यकता असते. विटामिन सी, ए, ई, डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी सर्वच घटक शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. पण बऱ्याचदा बॉडीबिल्डिंग किंवा जिमला जाणारे लोक प्रोटीन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या सप्लिमेंट्सचे किंवा गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण केमिकल आणि हानिकारक घटकांनी तयार केलेल्या सप्लिमेंट्सचे सेवन करणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शरीराला स्नायूंची डागडुजी, विकरांची निर्मिती आणि निरोगी आरोग्यासाठी आहारात पुरेशा प्रोटीनची आवश्यकता असते. प्रोटीन पावडर किंवा सप्लीमेंट्स घेतल्यानंतर शरीरातील प्रोटीनची पातळी वाढते, असे अनेकांना कायमच वाटते. पण त्याऐवजी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यासोबतच शरीराला आवश्यक प्रमाणात प्रोटीन मिळेल. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

Early Throat Cancer: ६८ वर्षीय रुग्णाला दुर्मिळ कर्करोगाचे निदान; आधुनिक शस्त्रक्रियेतून मिळाला दिलासा

शरीराला नियमित किती प्रोटीनची आवश्यकता असते?

प्रत्येक व्यक्तीची प्रोटीन्सची गरज त्याच्या शरीरातील स्नायूंच्या हालचालींवर आणि ऊर्जेचे संतुलनावर अवलंबून असते. एका सामान्य प्रौढ व्यक्तीला दररोज प्रति किलो वजनामागे ०.८ ग्रॅम प्रथिने मिळणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील प्रथिनांचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. आहारात कॅलरीज आणि प्रोटीन्स कमी तर ऊर्जेसाठी, हार्मोन्स व एन्झाईम्स बनवण्यासाठी स्नायूंमधील प्रोटीन्स तुटू लागते. कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्समधून शरीराला पुरेशी ऊर्जा मिळाल्यानंतर प्रोटीनचा वापर फक्त स्नायूंच्या निर्मितीसाठी व शरीर वाढीसाठी केला जातो.

प्रोटीन वाढवण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन:

१०० ग्रॅम सोयाबीनमध्ये तब्बल ३५ ते ४० ग्रॅम असते. त्यामुळे दोनदा किंवा तीनदा आहारात सोयाबीनचा समावेश करावा. तुरीची डाळ, मूग, चणा, मटकी यांसारख्या विविध डाळींमधून १०० ग्रॅममागे १८ ते २५ ग्रॅम प्रोटीन शरीराला मिळते. सुका मेवा आणि बिया खाल्ल्यामुळे शरीराला १५ ते २५ ग्रॅम प्रोटीन मिळते. एका अंड्यात ६ ते ८ ग्रॅम उत्तम प्रोटीन्स असते. अंड्याचा पांढरा भाग, साय काढलेले दूध, दही/ग्रीक योगर्ट, चिकन, मासे इत्यादी पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे महागड्या सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ खावेत.

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी

डाळींमध्ये ‘मेथिओनाईन कमी असते पण लायसीन जास्त असते. तर तांदळामध्ये लायसीन कमी असते तर मेथिओनाईनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे भात आणि डाळ एकत्र खाल्ल्यामुळे शरीराला अमिनो ॲसिड्स मिळतात. गव्हाच्या पोळीमध्ये नसलेले अमिनो ॲसिड राजमा आणि छोल्याच्या भाजीमधून भरून काढता येईल. दैनंदिन आहारात डाळी, कडधान्ये, अंडी, दूध, भाजीपाला आणि धान्यांचा समावेश केल्यास प्रोटीनची कमतरता भरून निघेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरीरातील प्रोटीन वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

    Ans: शरीरातील प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी डाळी, कडधान्ये, दूध, दही, पनीर, सोयाबीन, अंडी, मासे आणि चिकन यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करता येतो. योग्य पर्याय व्यक्तीच्या आहारपद्धतीनुसार निवडावेत.

  • Que: प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याऐवजी नैसर्गिक पदार्थ खाणे पुरेसे आहे का?

    Ans: अनेक लोकांची प्रोटीनची गरज संतुलित आहारातून पूर्ण होऊ शकते. मात्र, गरज वय, वजन, शारीरिक हालचाल आणि आरोग्याच्या स्थितीनुसार बदलते. आहारातून पुरेसे प्रोटीन मिळत नसल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेता येतात.

  • Que: शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचे सर्वोत्तम स्रोत कोणते आहेत?

    Ans: डाळी, हरभरा, मूग, राजमा, सोयाबीन, टोफू, दूध, दही, पनीर आणि शेंगदाणे हे शाकाहारी प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत.

Web Title: Protein rich foods add these natural protein sources to your daily diet instead of relying only on supplements sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 07:55 AM

Topics:  

  • important vitamins
  • protin
  • vitamin deficiency

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.