राधिका मर्चंटचा पहिला ब्रायडल लुक
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियासह इतर सर्वच ठिकाणी अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्याची चर्चा रंगली होती. अखेर काल १२ जुलै ला अनंत राधिका यांचा विवाह सोहळा पार पडला. अनंत राधिकाचा फस्ट लुक पाहण्यासाठी नेटकरी उत्सुक होते. पण अखेर राधिकाच्या लग्नातील पहिला लुक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्यासाठी जगभरातील अनेक प्रसिद्ध उद्योगपती, सेलिब्रिटी यांच्यासह अनेक विदेशी पाहुण्यांनी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
१२ जुलै ला सात फेरे घेत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा पार पडला. संपूर्ण जगाला या विवाह सोहळ्याची फार उत्सुकता लागली होती. या विवाह सोहळ्यातील राधिका मर्चंट हीच पहिला लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचा हा लुक पाहण्याची अनेकांना उत्सुकता लागली होती. राधिका मर्चन्टच्या फर्स्ट ब्रायडल लुकला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. विवाह सोहळ्यात राधिकाने महाराणी लुक परिधान केला होता. या महाराणी लेहंग्यामध्ये राधिका खूप सुंदर दिसत होती. राधिका मर्चंटने परिधान केलेल्या लेहंग्याची नेमकी काय खासियत आहे चला तर जाणून घेऊया.
राधिका मर्चंटचा पहिला ब्रायडल लुक
विवाह सोहळ्यात राधिकाने परिधान केलेला लेहंगा सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन करून तयार केला होता. यावर करण्यात आलेले बारीक नक्षीकाम सगळ्यांचं आवडले. क्रीम-गोल्डन रंगाच्या पानेतर लेहेंग्यात राधिका अधिक सुंदर आणि स्टयलिश दिसत होती. राधिकाने परिधान केलेला लेहंगा हा गुजराती ब्रायडल लेहेंगा आहे. राधिकाला तिच्या विवाह सोहळ्यात गुजराती ब्राईडप्रमाणे तयार व्हायचे होते. त्यामुळे तिने पानेतर ब्रायडल लेहंग्याची निवड केली होती.
राधिकाने विवाह सोहळ्यात परिधान केलेल्या लेहंग्यावर जरदोसी कटवर्कचे नक्षीकाम करण्यात आले होते. तसेच या लेहंग्याला मोठ्या लाल रंगाच्या बॉर्डरची लेस लावण्यात आली होती.या लेहंग्यावर सुंदर ब्रायडल ओढणी आणि टिश्यू शोल्डर दुपट्टा देखील लावण्यात आला होता. राधिकाने परिधान केलेल्या लेहंग्यावर गोल्डन, लाल आणि क्रीम कलरचे बारीक हेव्ही हॅंडवर्क केले असून स्टोन्स, सिक्विन्स आणि लाल रेशमी फॅब्रिकचे डिटेलिंग देखील करण्यात आली होती.
राधिकाने महाराणी लेहंग्यावर डायमंडचे दागिने घातले होते. तिने या लेहंग्यावर रत्नजडीत चोकर, लांब डायमंड नेकलेस, हातामध्ये लाल सफेद रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या. या लुकमध्ये राधिका महाराणीसारखी दिसत होती. महाराणी लेहंग्यावर राधिकाचा सुंदर मेकअप करण्यात आला होता. या लेहंगा लुकवर राधिकाने लाल रंगाची लिपस्टिक लावली होती. त्यामुळे तिचा लुक अधिक सुंदर दिसत होता.