Rahul Vaidya Classy Home: घर असावं तर राहुल वैद्यसारखं! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
Rahul Vaidya and Disha Parmar’s Classy Home: टीव्हीचा फेमस सिंगर राहुल वैद्य आणि त्याची बायको दिशा परमार यांचं घर तुम्ही पाहिलंय का? सोशल मीडियावर त्यांच्या घराचे फोटो खूप व्हायरल होतात. घर बघितलं की एक गोष्ट लगेच लक्षात येते, जास्त भपका नाही, जास्त रंगांची गर्दी नाही, पण तरीही घर एकदम रिच आणि स्टायलिश वाटतं.आजकाल लोक घर सजवताना खूप खर्च करतात, महागडं फर्निचर आणतात. पण राहुलच्या घरातून एक गोष्ट शिकायला मिळते की कमी पैशात आणि कमी वस्तूंमध्ये पण घर भारी दिसू शकतं. चला त्यांच्या घरातून काय आयडिया घेता येतील ते बघूया. Rahul Vaidya Classy Home:
सगळ्यात मोठा हिरोत्यांच्या पूर्ण घरात पांढरा आणि ऑफ-व्हाईट रंग जास्त वापरला आहे. भिंती पांढऱ्या, पडदे पांढरे, काही ठिकाणी फर्निचर पण पांढऱ्या जवळचं. पांढऱ्या रंगामुळे घर खूप मोठं आणि मोकळं वाटतं. लहान घर असेल तर पांढरा रंग लावला की घर मोठं दिसतं.पण नुसतं पांढरं केलं की घर हॉस्पिटलसारखं वाटेल, म्हणून त्यांनी त्यात लाकडी फर्निचर आणि हिरवी झाडं लावली आहेत. त्यामुळे घरात ऊब पण येते आणि पांढरा रंग उठून पण दिसतो. तुम्हाला पण जर घर मोठं दाखवायचं असेल तर भिंतीला पांढरा, बेज, क्रीम असे लाईट रंग लावा.
छोटी गोष्ट पण लूक भारीघराच्या बाहेरच्या दारावर त्यांची एक छोटीशी गोल्डन नेमप्लेट आहे. साधीच आहे, जास्त नक्षी नाही, पण सोनेरी रंगामुळे ती पांढऱ्या भिंतीवर एकदम उठून दिसते. घरात येणाऱ्या पाहुण्याला पहिली छाप दारावरूनच पडते. त्यामुळे दारावर अशी एक चांगली नेमप्लेट लावली तर पूर्ण घराचा लूकच बदलतो. जास्त पैसे पण लागत नाहीत.
Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?
घराला घरपण येतंआजकाल सगळे मॉडर्न घर करतात, पण त्यात आपलेपणा नसतो. राहुल आणि दिशाने एका भिंतीवर त्यांच्या आठवणींचे फोटो लावले आहेत. लग्नाचे, फिरायला गेलेले फोटो. यामुळे घर मॉडर्न तर दिसतंच, पण त्यात एक इमोशन पण येतो.तुम्ही पण घरात एक छोटी भिंत फोटो वॉलसाठी ठेवू शकता. सगळ्या फ्रेम एकाच साईजच्या न घेता वेगवेगळ्या साईजच्या घेतल्या तर अजून सुंदर दिसतं.
– मन शांत करणारंत्यांच्या घरातलं मंदिर पांढऱ्या मार्बलचं आहे. एकदम साधं, स्वच्छ आणि सुंदर. जास्त माळा, जास्त सामान नाही. पांढऱ्या मार्बलमुळे तिथे एकदम प्रसन्न वाटतं. मॉडर्न घरात असं पारंपरिक पांढरं मंदिर खूप शोभून दिसतं. देवघर नेहमी स्वच्छ आणि कमी सामान असलेलं ठेवलं की मन पण शांत राहतं.
कमी पण कामाचंत्यांच्या हॉलमध्ये खूप फर्निचर नाही. एक मोठा आरामदायी सोफा, एक सेंटर टेबल आणि टीव्ही युनिट. बस, एवढंच. मध्ये फिरायला भरपूर जागा मोकळी ठेवली आहे. ह्याने घर गजबजलेलं न वाटता मोकळं वाटतं.आणि गॅलरीत एक छोटासा झोपाळा टाकला आहे. संध्याकाळी तिथे बसून चहा प्यायला एकदम भारी वाटत असेल.जर तुमचं घर लहान असेल तर तुम्ही पण फोल्डिंग फर्निचर किंवा स्टोरेज असलेला सोफा वापरू शकता. म्हणजे जागा पण वाचेल आणि घर सुंदर पण दिसेल.
थोडक्यात सांगायचं तर, घर सुंदर दिसायला लाखो रुपये लागत नाहीत. पांढरे रंग, थोडी हिरवी झाडं, आपल्या आठवणींचे फोटो आणि मोकळी जागा ठेवली की घर आपोआप क्लासी दिसतं. राहुल आणि दिशाच्या घरातून हेच शिकायला मिळतं.






