चीनच्या डिजास्टर हबमध्ये मृत्यूचे दृश्य अनुभवण्यासाठी लोक घालवतायेत पैसे
वादळ आणि पुराचा अनुभव
चीनचे हांग्झू शहर हे देशातील डार्क टुरिझमचे मुख्य केंद्र आहे. इथे एक डिजास्टर सिम्युलेशन हब आहे ज्याला अनेक पर्यटक भेट देतात. हे देशातील पहिले असे सेंटर मानले जाते जिथे जाऊन लोक आपत्तीजनक परिस्थितीत अडकल्याची भूमिका साकारतात. इथे जाऊन लोकांना अत्यंत धोकादायक घटनांचा सामना करावा लागतो ज्यातून ते बाहेर कसं पडायचं याचा अनुभव घेतात. म्हणजेच इथे गेल्यावर तुम्हाला असं भासवलं जात की खरोखर तुम्ही पुराच्या किंवा वादळाच्या परिस्थितीत अडकला आहात आणि यातून आता तुम्हाला तुमची सुटका करायची आहे.
सिम्युलेशनला १६५ किमी/तास वेगाने चालवलं जातं ज्यामुळे वादळाची परिस्थिती निर्माण होते आणि अचानक येणाऱ्या मुसळधार पावसाची परिस्थिती तयार होते. हा अनुभव लोकांना खऱ्या आपत्तीजनक परिस्थितीचा अनुभव देते. इथे जाऊन लोक या बनावटी आपत्तीजनक परिस्थितीचा अनुभव घेतात ज्यामुळे वास्तवात जर कधी अशी घटना घडली तर त्यांना आधीच ठाऊक राहिल की अशा परिस्थितीत नक्की काय करावं.
सुरक्षा यंत्रणा आणि फी
या सिम्युलेशन हबमध्ये आपत्तीजनक परिस्थितीचा अनुभव घेण्यासाठी लोकांना व्हिजीटर्सना पहिले एक खास सेफ्टी थर्मल सूट आणि हेलमेट घालण्यासाठी दिले जाते. यासोबतच या एक्टीव्हीटी दरम्यान तिथे काही ट्रेन इंस्ट्रक्टर्स देखील उपस्थित असतात. हे इंस्ट्रक्टर्स पर्यटकांना बचाव टेक्नीकविषयी माहिती देतात. जर कुणी या अनुभवावेळी खरोखर गंभीर परिस्थितीत अडकला किंवा त्याला त्रास होऊ लागला तर सुरक्षा कर्मचारी लगेच जवळ जाऊन त्याची मदत करतात.
या अनोख्या आपत्तीजनक घटनांचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच पैेसे आकारावे लागणार आहेत. मुख्य म्हणजे चीनमध्ये यासाठी लोकांकडून भारीभक्कम फी आकारली जाते. एका व्यक्तीच्या तिकिटासाठी इथे ८९९ युआना म्हणजेच १३५ अमेरिकी डाॅलर्स इतकी फी आहे. जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर ६-१४ वयोगटातील मुलांना इथे वॉटर रेस्क्यू आणि जंगलात सर्व्हाइव्ह कसं करायचं याच प्रशिक्षण दिलं जातं. फॅमिली पॅकेजची फी साधारण ५ हजार युआनपर्यंत जाते.




