Raksha Bandhan 2025 : भावाला करा खुश; स्वतःच्या हाताने घरी बनवा रसाळ अन् सर्वांच्या आवडीचा 'रसगुल्ला'
यंदा ९ ऑगस्ट रोजी देशभर रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. हा सण बहीण भावाच्या नात्याला समर्पित असतो. आता सणाच्या दिवशी नेहमीच घरी चवदार आणि गोड मिष्टान्नाची मेजवानी असते अशात आम्ही तुमच्यासाठी एक खास आणि सर्वांच्या आवडीचा असा पदार्थ घेऊन आलो आहोत जो तुम्ही तुमच्या भावासाठी घरीच तयार करू शकता.
रसगुल्ला हा एक अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक बंगाली गोड पदार्थ आहे, जो आता संपूर्ण भारतभर आवडीने खाल्ला जातो. हा स्पंजी, रसभरित मिठाई दूधापासून बनवली जाते. खास करून सण-उत्सवांमध्ये, पार्टीमध्ये किंवा गोड खाण्याची इच्छा झाल्यास रसगुल्ला एक परिपूर्ण पर्याय आहे. नात्यांचा गोडवा वाढवण्यासाठी रसगुल्ला एक चांगला पर्याय आणि त्यातही तुम्ही स्वतःच्या हाताने तयार केलेला पदार्थ म्हणजे भावासाठी खास आनंद. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
रसगुल्ल्यासाठी: