रतन टाटांच्या निधनाचे नेमकं कारण काय
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांनी देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी अनेक कामे केली. काही दिवसांआधी रतन टाटा यांना वृद्धापकाळामुळे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी स्वतःच दिली होती. मात्र काल रात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात रात्री साडेअकराच्या दरम्यान अखरेचा श्वास घेतला. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शारुख अस्पी गोलवाला यांनी रतन टाटा यांच्यावर उपचार केले. मात्र त्याच्या वाढत्या वयामुळे कोणतीही गोष्टी डॉक्टरांच्या हातात नव्हती.(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
रतन टाटा यांचे तीन दिवसांपूर्वी ब्लड फ्रेशर कमी झाले होते. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ब्लड प्रेशर डाऊन झाल्यामुळे त्यांची तब्येत पूर्णपणे बिघडून गेली होती.कमी रातदाबाची समस्या उद्भवल्यानंतर शरीरातील अवयव काम करणं बंद करतात. तसेच रतन टाटा यांना डिहायड्रेशनची समस्या देखील उद्भवली होती. तर जाणून घेऊया शरीरातील रक्तदाब कमी झाल्यास काय करावे, जाणून घेऊया सविस्तर.
हे देखील वाचा: वयाच्या ८६ व्या वर्षी रतन टाटा एवढे फिट कसे होते ? जाणून घ्या त्यांच्या फिटनेसचे रहस्य
पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे दैनंदिन जीवनात रोज भरपूर पाणी प्यावे. रोजच्या आहारात लिंबू पाणी, नारळ पाणी, डाळीचे पाणी आणि तांदुळाच्या पाण्याचे सेवन करावे. या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्वे आणि मिनरल्स आढळून येतात, ज्याचा शरीराला फायदा होतो. नारळ पाणी किंवा लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्यास उन्हाळ्याच्या दिवसांमध्येसुद्धा ब्लड प्रेशरची समस्या उद्भवणार नाही.
शरीरात मानसिक तणाव निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवतात. तणावमुक्त जीवनशैली जगण्यासाठी नियमित ध्यान करणे, व्यायाम करणे, 8 तासांची झोप घेणे इत्यादिओ गोष्टी केल्यास तणाव कमी होतो. शरीरात तणाव वाढल्यामुळे ब्लड प्रेशरची समस्या उद्भवते. त्यामुळे नेहमी आनंदी आणि हसत खेळत जीवन जगले पाहिजे.
हे देखील वाचा: रतन टाटा यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल; वाचून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले
दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला झोपेची आवश्यक्ता असते. कामाचा तणाव, मानसिक तणाव दूर करण्यासाठी झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रोज कमीत कमी 7 ते 8 तास झोपले पाहिजे. झोपल्यामुळे मन शांत आणि निरोगी राहते. तसेच रात्री झोपण्याच्या तीन तास आधी जेवावे, यामुळे जेवलेले अन्नपदार्थ सहज पचण्यास मदत होते.