रतन टाटा यांच्या हेल्दी आणि निरोगी आरोग्याचे रहस्य
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा प्रसिद्ध उद्योगपती होते. त्यांनी देशाच्या विकासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी अनेक महत्वपूर्ण कामे केली. रतन टाटा 1990 पासून 2012 पर्यंत टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी होते. काही दिवसांआधी रतन टाटा यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण बुधवारी रात्री त्यांचे कमी रक्तदाबाच्या समस्येमुळे निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा त्यांच्या आहार आणि आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्याचे. तसेच त्यांचा फिटनेस अनेकांना प्रेरित करणारा होता. आज आम्ही तुम्हाला रतन टाटा वयाच्या 86 वर्षी एवढे फिट आणि हेल्दी कसे होते? याचे रहस्य सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
हे देखील वाचा: रतन टाटांचे प्रेरणात्मक कोट्स मिळवून देतील बळ
रतन टाटा वयाच्या 86 व्या वर्षी सुद्धा खूप हेल्दी आणि निरोगी होते. त्यांच्या दिवसाची सुरुवात सकाळी सहा वाजता व्हायची. त्यानंतर सकाळी उठून ते नियमित व्यायाम आणि योगा करायचे. तसेच ते सकाळी लवकर उठल्यानंतर मॉर्निंग वॉकला जायचे. शरीराला सतत चालण्याची, फिरण्याची आणि शारीरिक हालचालींची फार आवश्यकता असते. पण याच गोष्टी हल्लीची तरुणाई फॉलो करत नसल्यामुळे अनेक आजरांचा धोका वाढला आहे. रतन टाटा सकाळच्या वेळी सूर्य नमस्कार सुद्धा करायचे.
धावपळीच्या जीवनात सतत काम करत राहिल्यामुळे शरीर आणि मन पूर्णपणे थकून जाते. थकलेल्या मनाला विश्रांतीची आणि शांततेची आवश्यकता असते. हे मिळवण्याचा योग्य मार्ग म्हणजे मेडिटेशन करणे. रतन टाटा सकाळी उठल्यानंतर नेहमी मेडिटेशन करायचे. ज्यामुळे तणाव आणि अनेक शारीरिक समस्या सुद्धा दूर होतात. शांतपणे केलेल्या विचारणामुळे रतन टाटा त्यांच्या आयुष्यात खूप यशवस्वी झाले.
आतड्यांचे आणि शरीराचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी श्वसनाचे व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम केल्यामुळे शरीर आणि मन दोन्हीसुद्धा निरोगी राहते. श्वसनाचे व्यायाम नियमित केल्यामुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. रतन टाटा नियमित श्वसनाचे व्यायाम करायचे. ज्यामुळे ते वयाच्या ८६ व्या वर्षीसुद्धा एवढे फिट आणि हेल्दी होते.
हे देखील वाचा: Ratan tata death live updates: “विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल” रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार
सकाळचा नाश्ता: एक ग्लास ताज्या फळांचा ज्यूस, उकडलेले अंडे, अक्रोड आणि मनुका
दुपारचं जेवण: लसणीचा तडका दिलेली डाळ-चपाती आणि भात. तसेच ते दुपारच्या जेवणात वेगवेगळ्या भाज्यांची कोशिंबीर खायचे.
संध्याकाळचा नाश्ता: ताजी फळे
रात्रीचे जेवण: रात्रीच्या जेवणात हलके अन्न. त्यामध्ये सूप किंवा सूप किंवा वाटाणा पुलाव