Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Brain Stroke: वेळीच स्ट्रोकची लक्षणे ओळखल्यास वाचू शकतो अमूल्य जीव, तज्ज्ञांचा खुलासा

सध्या ब्रेन स्ट्रोकच्या समस्या तरूणांमध्येही वाढताना दिसत आहेत. जगात याची जागरुकता होण्याची गरज आहे. पण ब्रेन स्ट्रोकची लक्षणं आधीच ओळखता आल्यास तुम्ही योग्य काळजी घेऊ शकता

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 29, 2025 | 12:48 PM
ब्रेन स्ट्रोकची लक्षणे कशी ओळखावी (फोटो सौजन्य - iStock)

ब्रेन स्ट्रोकची लक्षणे कशी ओळखावी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • ब्रेन स्ट्रोकची समस्या
  • ब्रेन स्ट्रोकची लक्षणे 
  • तज्ज्ञांचा खुलासा

मेंदूच्या काही भागात रक्तपुरवठा खंडित किंवा कमी झाल्यास स्ट्रोकची समस्या उद्भवते, यामुळे मेंदूच्या पेशी मृत पावतात. स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्या अरुंद होतात. ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो (इस्केमिक स्ट्रोक) किंवा रक्तवाहिनी फुटुन हेमोरेजिक स्ट्रोक होतो. अशावेळी तत्काळ वैद्यकीय उपचार करणे महत्वाचे आहे, कारण वेळीच उपचार रुग्णांच्या परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा करू शकतात.

स्ट्रोक हे देशभरात मृत्यू आणि दीर्घकालीन अपंगत्वाचे एक प्रमुख कारण ठरत आहे. स्ट्रोकची कारणे म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या, रक्तवाहिनी फुटणे (हेमोरेजिक स्ट्रोक) आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा आणि हृदयरोग यासारखे इतर घटक, ज्यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते. सध्या, स्ट्रोक केवळ प्रौढांमध्येच नाही तर तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. डॉ. सुनील कुट्टी, नवी मुंबईतील न्यूईरा हॉस्पिटलमधील प्रसिध्द न्यूरोसर्जन (मेंदू आणि मणका) यांनी अधिक माहिती दिली आहे. 

World Brain Stroke Day: ‘या’ 5 गोष्टी तुम्हाला ब्रेन स्ट्रोकपासून वाचवतील, तज्ज्ञांकडून दिलासा

स्ट्रोकमुळे उद्भवणारी गुंतागुंत

वेळेत उपचार न केल्यास, स्ट्रोकमुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते जसे की:

  • शरीराच्या एका बाजूला अर्धांगवायू किंवा अशक्तपणा
  • अस्पष्ट बोलणे
  • गिळताना  समस्या आणि जीव घाबरणे धोका
  • दृष्टीदोष किंवा अंधत्व
  • स्मृती कमी होणे, मूड स्विंग किंवा नैराश्य
  • स्ट्रोक व्यवस्थापनात प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. कोणताही विलंब न करता स्ट्रोकची लक्षणे ओळखणे आणि वेळीच उपचार करणे गरजेचे आहे .

ब्रेन स्ट्रोकची लक्षणे तसेच त्यावरील उपाय; जाणून घ्या

कशी ओळखावी लक्षणे

स्ट्रोकची लक्षणे ओळखण्यासाठी ‘बीफास्ट’ (BEFAST) ह्या संज्ञेचा वापर केला जातो. यात प्रत्येक अक्षर एक महत्त्वपूर्ण लक्षण दर्शवते.

  • B – बॅलेंस (Balance): स्ट्रोक झालेल्या व्यक्तीला अचानक संतुलन बिघडण्याचा अनुभव येतो. त्यांना नीट उभे राहता येत नाही किंवा चालताना अस्थिरता येऊ शकते. एकंदरीत, रुग्णाला बॅलन्स करता येत नाही
  • E – आईज (Eyes): स्ट्रोकमध्ये डोळ्यांच्या दृष्टीवर तात्काळ परिणाम होऊ शकतो. एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये अचानक अंधुकपणा किंवा दृष्टी कमी होणे ही लक्षणे असू शकतात. दृष्टीत त्रास उद्भवतो
  • F – फेस (Face): चेहरा हा स्ट्रोकमधील मुख्य लक्षणांपैकी एक आहे. स्ट्रोक झाल्यास चेहऱ्याच्या एका बाजूला तिरकसपणा येतो, त्या व्यक्तीला हसणे कठीण होते किंवा चेहऱ्याचे काही भाग सुस्त होतात
  • A – आर्म्स (Arms): स्ट्रोकमुळे हाताचे कार्यप्रणाली कमी होते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला हात उचलताना अडचण येते, आणि हातात वजन राहत नाही
  • S – स्पीक (Speak): स्ट्रोक मध्ये बोलण्यास अडचणी येतात. पीडित व्यक्तीची जीभ अडखळू लागते, शब्द नीट उच्चारता येत नाहीत किंवा काहीवेळा ती व्यक्ती अजिबात बोलू शकत नाही
  • T – टाइम (Time): वेळ हा स्ट्रोकच्या उपचारांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. स्ट्रोकची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णाला जवळच्या रुग्णालयात नेणे अत्यंत गरजेचे असते.

ही लक्षणे त्वरीत ओळखून त्यानुसार वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. लक्षणे दिसु लागल्यापासून ४.५ तासांच्या आत दिल्यास इंट्राव्हेनस थ्रोम्बोलिसिस (क्लॉट-बस्टिंग इंजेक्शन) रक्त प्रवाह पुनर्संचयित करते. काही प्रकरणांमध्ये थ्रोम्बेक्टॉमी (मोठ्या रक्तवाहिन्यांमधून क्लॉट काढून टाकण्याची शस्त्रक्रिया) आवश्यक असते. उपचार जितक्या लवकर सुरू होतील तितके बरे होण्याची आणि जगण्याची शक्यता वाढते. स्ट्रोक ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे. वेळीच लक्षणे जाणून घेतल्यास व निदान केल्यास एखाद्याचा अमूल्य जीव वाचु शकतो आणि आयुष्यभर अपंगत्व टाळू शकते.

Web Title: Recognizing the symptoms of brain stroke on time can save precious lives experts reveal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 12:48 PM

Topics:  

  • brain
  • Health Tips

संबंधित बातम्या

World Brain Stroke Day: ‘या’ 5 गोष्टी तुम्हाला ब्रेन स्ट्रोकपासून वाचवतील,  तज्ज्ञांकडून दिलासा
1

World Brain Stroke Day: ‘या’ 5 गोष्टी तुम्हाला ब्रेन स्ट्रोकपासून वाचवतील, तज्ज्ञांकडून दिलासा

Couple Weight Gain: लग्नानंतर का वाढते नवरा-बायकोचे वजन, शरीरसंबंध की अजून काही कारण? जाणून घ्या तथ्य
2

Couple Weight Gain: लग्नानंतर का वाढते नवरा-बायकोचे वजन, शरीरसंबंध की अजून काही कारण? जाणून घ्या तथ्य

Constipation Home Remedy: आता शौच होणार नाही कडक; लावावा लागणार नाही जोर; 10 रूपयात मिळाला देशी जुगाड
3

Constipation Home Remedy: आता शौच होणार नाही कडक; लावावा लागणार नाही जोर; 10 रूपयात मिळाला देशी जुगाड

तुमचे लिव्हर सडले आहे का? शरीर देतो ‘हे’ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष अन्यथा मृत्यू देईल भेट
4

तुमचे लिव्हर सडले आहे का? शरीर देतो ‘हे’ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष अन्यथा मृत्यू देईल भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.