Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
Recipe : तुम्हाला माहितीये का? फक्त हिरव्या मिरच्यांपासूनच नाही तर लालचुटक मिरच्यांपासूनही तुम्ही चवदार आणि अस्सल महाराष्ट्रीयन चवीचा ठेचा तयार करु शकता. चला या ठेच्याची रेसिपी जाणून घेऊयात.
Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
Follow Us
Follow Us:
लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा एकदा नक्की बनवून खा.
यासाठी निवडक साहित्यांची गरज लागते.
आठवडाभर तुम्ही हा ठेचा साठवून ठेवू शकता.
महाराष्ट्राच्या पारंपरिक जेवणात ठेच्याला विशेष स्थान आहे. साध्या जेवणाची चव वाढवणारा आणि झणझणीत तिखटपणासोबत मिरचीचा खास स्वाद देणारा ठेचा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. भाकरी, पिठलं, वरण-भात किंवा गरमागरम पोळी यांसोबत लाल मिरचीचा ठेचा वाढला की जेवणाची रंगत आणखी वाढते. विशेष म्हणजे हा ठेचा बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि घरात सहज उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यामधून तो तयार करता येतो. भाजलेल्या लाल मिरच्या, लसूण, शेंगदाणे आणि मीठ यांचा योग्य मेळ साधला की चवदार आणि खमंग ठेचा तयार होतो. चला पारंपरिक पद्धतीने लाल मिरचीचा त्याचा कसा तयार करायचा याची रेसिपीजाणून घेऊया.
यासाठी सर्वप्रथम सुक्या लाल मिरच्या स्वच्छ करून घ्या. कढई गरम करून त्यात थोडे तेल टाका आणि मिरच्या मंद आचेवर हलक्या भाजून घ्या. मिरच्या जळणार नाहीत याची काळजी घ्या.
त्याच कढईत लसूण पाकळ्या आणि जिरे घालून काही मिनिटे परतून घ्या. लसणाला हलका सोनेरी रंग आला की गॅस बंद करा.
भाजलेले शेंगदाणे सोलून घ्या. शेंगदाणे आधीच भाजलेले नसतील तर ते कढईत हलके भाजून घ्या.
खलबत्त्यात भाजलेल्या लाल मिरच्या, लसूण, जिरे आणि मीठ घाला. हे मिश्रण जाडसर कुटून घ्या. ठेचा अगदी
बारीक वाटण्यापेक्षा थोडा भरडसर ठेवला तर त्याची पारंपरिक चव चांगली लागते.a
आता भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यात घाला आणि सर्व साहित्य एकत्र कुटून घ्या. शेंगदाण्यामुळे ठेच्याला छान खमंगपणा आणि पोत मिळतो.
ठेचा खूप कोरडा वाटत असल्यास त्यात थोडे पाणी घाला. मात्र पाणी जास्त घालू नका. ठेचा घट्ट आणि भरडसर राहील इतकेच पाणी वापरा.
तयार लाल मिरचीचा ठेचा एका वाटीत काढा. वरून थोडे कच्चे किंवा गरम केलेले तेल घातल्यास चव आणखी खुलते. गरम भाकरी, पिठलं किंवा वरण-भातासोबत हा ठेचा सर्व्ह करा.
Web Title: Red chilli thecha recipe spicy maharashtrian thecha recipe with red chillies