
पित्त वाढल्यामुळे अंगावर लाल चट्टे येतात? मग आहारात करा 'हे' साधे बदल
कोणत्या कराणांमुळे पचनक्रिया सतत बिघडते?
पचनक्रिया सुधारण्यासाठी घरगुती उपाय?
पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शरीरात उष्णता वाढल्यानंतर काहींना पित्ताची समस्या उद्भवते. याशिवाय मसालेदार, तेलकट आणि वारंवार जंक फूडचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. याशिवाय शरीरात अनेक बदल दिसून येतात. पचनशक्ती कमकुवत झाल्यामुळे शरीरात पित्त वाढते. पित्त वाढल्यानंतर आंबट ढेकर येणे, छातीमध्ये वाढलेली जळजळ, तोंड कडू होणे, अंग गरम होणे, डोकेदुखी, चिडचिड, भूक मंदावणे आणि उलट्या होणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. तसेच काहींच्या अंगावर पित्ताचे लाल चट्टे सुद्धा येतात. पित्ताची पातळी वाढल्यानंतर अंगावर आलेल्या लाल चट्ट्यानां खाज येण्यास सुरुवात होते. काहीवेळा खाज खूप जास्त असह्य होते. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे दैनंदिन कामात अनेक अडथळे निर्माण होतात.(फोटो सौजन्य – istock)
खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा, अपुऱ्या झोप आणि तणावाचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन न झाल्यामुळे शरीरात पित्ताची पातळी वाढून अन्ननलिकेमध्ये पित्त तयार होते. यामुळे सतत आंबट ढेकर येऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पित्ताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. योग्य आहार आणि भरपूर पाण्याचे सेवन केल्यास पित्तावर नियंत्रण मिळवता येईल.
वारंवार शरीरात पित्त वाढत असेल तर आहारात बदल करणे आवश्यक आहे. शरीरात थंडावा टिकवून ठेवणाऱ्या पौष्टीक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. दही, ताक, नारळपाणी, उसाचा रस, मठ्ठा, काकडी, खरबूज, पपई, भोपळा, पडवळ, दुधी, मोसंबी, डाळिंब इत्यादी भाज्या आणि फळांचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. तसेच रोजच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. गव्हाचे पीठ, पोळी, रोटी, भाकरी इत्यादी पदार्थ खाल्ल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहण्यासोबतच पचनक्रिया सुद्धा निरोगी आणि मजबूत राहील. भातासोबत मूगडाळ, उडदाची डाळ, चणाडाळ, मसूरडाळ इत्यादी डाळींचे सेवन करावे. खाल्लेला कोणताच पदार्थ पचनास जड जाऊ नये म्हणून सकाळी उठल्यानंतर एक चमचा तूप उपाशी पोटी खावे. मसालेदार, आंबट, तिखट, तेलकट, गरम आणि जड पदार्थ खाल्ल्यानंतर कायमच शरीराची पचनक्रिया बिघडते.
रोजच्या आहारात मिरची, गरम मसाला, तळलेले पदार्थ, कॉफी, कोल्डड्रिंक, फास्ट फूड, व्हिनेगर आणि गरम-कोरड्या स्नॅक्सचे सेवन करू नये. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक तासनतास उपाशी राहतात. असे केल्यामुळे पचनक्रिया बिघडते. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने सहज पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन करावे. पचनक्रिया मजबूत राहण्यासाठी खाण्याच्या योग्य वेळा फॉलो करणे आवश्यक आहे.
पित्त वाढल्यानंतर प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे उलट्या होणे किंवा उलटी झाल्यासारखे वाटणे. वारंवार उलट्याचा त्रास जाणवू लागल्यास कोमट पाणी किंवा नारळपाणी प्यावे. यामुळे शरीरावर वाढलेला तणाव कमी होईल. तसेच आल्याचा रस, जिऱ्याचे पाणी, मध-लिंबू मिसळून घेतलेले कोमट पाणी इत्यादी ड्रिंकचे सेवन केल्यास पित्त कमी होईल. तसेच अंगावर वाढलेले पित्ताचे लाल चट्टे कमी करण्यासाठी कोकम किंवा आमसुलाचे सेवन करावे . यामुळे पित्ताचा त्रास पूर्णपणे कमी होऊन जातो.
Ans: ऍसिडिटी ही एक सामान्य पचन समस्या आहे, जी पोटात आम्ल जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे होते.
Ans: पोटात आणि छातीत सतत जळजळ होणे.
Ans: आल्याचा किंवा कॅमोमाइलचा चहा जळजळ कमी करण्यास आणि पोट शांत करण्यास मदत करू शकतात.