
सकाळी उठल्यानंतर नियमित करा भिजवलेल्या लवंगचे सेवन! गंभीर आजारांपासून मिळेल कायमची सुटका
तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. शरीराची पचनक्रिया सुधारण्यासाठी लवंग प्रभावी ठरेल. भिजवलेली लवंग खाल्ल्यास पचनक्रिया सुधारून आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया निर्माण होतात. गॅस, अपचन, पोट फुगणे आणि ॲसिडिटी इत्यादी पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी भिजवलेली लवंग खावी. लवंगमधील कार्मिनेटिव गुणधर्म बिघडलेली पचनक्रिया सुधारतात.
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे साथीचे आजार वाढून शरीराची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होऊन जाते. अशावेळी भिजवलेली लवंग किंवा पाण्याचे सेवन करावे. यामुळे घशात वाढलेले इन्फेक्शन कमी होईल आणि तात्काळ आराम मिळेल. लवंगमध्ये अॅंटी-बॅक्टेरियल गुण श्वसननलिका स्वच्छ करतात आणि घशात वाढलेल्या खवखवपासून आराम मिळवून देतात.
शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी भिजवलेला लवंग खावा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल. रोज सकाळी उठल्यानंतर भिजवलेली लवंग खाल्ल्यास आरोग्य कायमच निरोगी राहील. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी लवंग खावी. पण लवंग खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वेट लॉस आणि बरंच काही! दालचिनीचे पाणी इतकं फायदेशीर; रोजच प्या
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वाढत्या वयात हाडांच्या वेदना वाढू लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी भिजवलेली लवंग खावी. यामध्ये असलेले अॅंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म संधिवात, सांध्यांमधील वेदना, हाडांचे दुखणे इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करेल. याशिवाय दातांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी भिजवलेली लवंग खावी.
भिजवलेल्या लवंगाचे मुख्य फायदे?
रिकाम्या पोटी भिजवलेल्या लवंगा खाल्ल्यास किंवा लवंगाचे पाणी प्यायल्यास पचनसंस्था मजबूत होते. यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
लवंगाचा कसा वापर करावा?
रात्री झोपण्यापूर्वी ५ ते ६ लवंगा एका ग्लासभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी थोडे उकळून किंवा तसेच कोमट करून रिकाम्या पोटी प्या. भिजवलेल्या लवंगा चावून खाल्ल्यास अधिक प्रभावी ठरतात.