Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ पदार्थांपासून बनवलेले पाणी! गॅस- बद्धकोष्ठतेचा त्रासापासून मिळेल कायमची सुटका, राहाल फ्रेश

पोटात वाढलेला जडपणा आणि गॅस कमी करण्यासाठी कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन न करता घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे शरीराला तात्काळ फरक पडतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 24, 2026 | 08:27 AM
जेवणानंतर नियमित प्या 'या' पदार्थांपासून बनवलेले पाणी! गॅस- बद्धकोष्ठतेचा त्रासापासून मिळेल कायमची सुटका, राहाल फ्रेश

जेवणानंतर नियमित प्या 'या' पदार्थांपासून बनवलेले पाणी! गॅस- बद्धकोष्ठतेचा त्रासापासून मिळेल कायमची सुटका, राहाल फ्रेश

Follow Us
Follow Us:

पोटात गॅस होण्याची कारणे?
अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय?
बद्धकोष्ठता वाढण्याची कारणे?

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, वारंवार जंक फूडचे अतिसेवन, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत तिखट, तेलकट किंवा अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचनाच्या समस्या वाढून आरोग्य बिघडते. बऱ्याचदा रात्रीच्या किंवा दुपारच्या वेळी जेवल्यानंतर पोटात जडपणा किंवा पोट फुगल्यासारखे वाटते. पोटात जमा झालेल्या गॅसमुळे दिवसभर पोटात जडपणा जाणवू लागतो आणि काहीच खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. याशिवाय काहीवेळा ऍसिडिटी, आंबट ढेकर, उलट्या, मळमळ होण्याची खूप जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

Menstrual Cycle: Sickle Cell Disease असलेल्या महिलांसाठी मासिक पाळीचा काळ अधिक आव्हानात्मक का ठरू शकतो?

पोटात जमा झालेल्या गॅसमुळे पोटात जडपणा किंवा ऍसिडिटी झाल्यानंतर अनेक लोक गोळ्या औषधांचे सेवन करतात. यामुळे काही काळापुरता आराम मिळतो. पण काही काळानंतर पुन्हा एकदा शरीरात ऍसिडिटी वाढते. त्यामुळे गॅस आणि अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी जेवणानंतर या पदार्थांचे पाणी प्यावे. घरगुती उपाय केल्यास शरीरावर तात्काळ परिणाम दिसून येतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच पोटात जमा झालेला गॅस आणि पोटाचे घट्ट झालेले स्नायू रिलॅक्स होण्यास मदत होईल.

गॅस-ब्लोटिंग झाल्यास ‘या’ पदार्थांचे करा सेवन:

ओवा बडीशेपचे पाण्याचे सेवन:

पोटाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित ओवा आणि बडीशेपचे पाणी बनवून प्यावे. यामुळे पोटात वाढलेला गॅस कमी होण्यासोबतच बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळेल. ओव्यामध्ये असलेले थायमॉन नावाचे अॅक्टिव तत्व पचनक्रिया मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय बडीशेप खाल्ल्यामुळे पोटात वाढलेली जळजळ आणि उष्णता कमी होण्यास मदत होते. पाणी तयार करण्यासाठी टोपात एक ग्लास पाणी घेऊन त्यात ओवा आणि बडीशेप एकत्र मिक्स करून पाण्याला उकळी काढा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या आणि सेवन करा. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच शरीर स्वच्छ होईल.

हिंगाचे पाणी:

जेवण बनवताना मोठ्या प्रमाणावर हिंगाचा वापर केला जातो. हिंगाच्या सेवनामुळे अन्नपदार्थ पचन होण्यास मदत होते. पोट फुगणे किंवा पोटाचे स्नायू घट्ट झाल्यासारखे वाटल्यास हिंगाचे पाणी प्यावे. अर्धा ग्लास पाण्यात चिमूटभर हिंग टाकून मिक्स करा आणि सेवन करा. यामुळे पोटात जमा गॅस बाहेर पडून जाईल. पण अतिप्रमाणात हिंगाचे पाणी पिऊ नये. यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो.

Health Update: कर्करोगावरील उपचार महागणार? केमोथेरपीच्या औषधांच्या किमतीत १० ते ५० टक्के वाढ

जिऱ्याचे पाणी:

जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे पोटात वाढलेला जडपणा कमी होण्यासोबतच शरीरातील घाण स्वच्छ होते. जिऱ्याने डायजेस्टिव सिस्टीम सक्रिय होण्यास मदत होते. टोपात पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा जिरं घालून पाण्याला उकळी काढा आणि पाणी थंड करून सेवन करा. यामुळे पोटात वाढलेला जडपणा कमी होण्यासोबतच ऍसिडिटीपासून सुटका मिळेल. तसेच जेवण बनवताना जिऱ्याचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जेवणानंतर पाणी प्यायल्याने पचनक्रियेला मदत होते का?

    Ans: योग्य प्रमाणात पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक आहे. पुरेसे पाणी घेतल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास आणि शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होऊ शकते.

  • Que: गॅस आणि बद्धकोष्ठतेसाठी कोणते घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात?

    Ans: पुरेसे पाणी पिणे, फायबरयुक्त आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार ठेवणे पचनासाठी फायदेशीर ठरू शकते.

  • Que: जेवणानंतर कोणत्या पदार्थांचे पाणी पचनासाठी घेतले जाते?

    Ans: काही लोक जिरे, बडीशेप, अजवाइन यांसारख्या पदार्थांपासून तयार केलेले पाणी पारंपरिक पद्धतीने घेतात. याचा फायदा व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो.

Web Title: Regularly drink water infused with these ingredients after meals get permanent relief from gas and constipation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • acidity
  • bloating
  • home remedies

संबंधित बातम्या

Gardening Tips : हिरव्या मिरच्यांना भरेल कुंडी, लागवडीनंतर 15 दिवसांनी मातीत टाका फक्त ही एक गोष्ट!
1

Gardening Tips : हिरव्या मिरच्यांना भरेल कुंडी, लागवडीनंतर 15 दिवसांनी मातीत टाका फक्त ही एक गोष्ट!

३० दिवसांमध्ये केस गळणे होईल पूर्णपणे बंद! केसांच्या मुळांशी लावा ‘या’ पदार्थांचे पाणी, वाढत्या समस्यांपासून मिळेल सुटका
2

३० दिवसांमध्ये केस गळणे होईल पूर्णपणे बंद! केसांच्या मुळांशी लावा ‘या’ पदार्थांचे पाणी, वाढत्या समस्यांपासून मिळेल सुटका

Skin Care Tips: आठवड्यातील ४ दिवस चेहऱ्यावर लावा ‘हा’ नॅचरल फेसपॅक, आलिया भटप्रमाणे त्वचेवर येईल चमकदार ग्लो
3

Skin Care Tips: आठवड्यातील ४ दिवस चेहऱ्यावर लावा ‘हा’ नॅचरल फेसपॅक, आलिया भटप्रमाणे त्वचेवर येईल चमकदार ग्लो

उन्हामुळे चेहरा काळवंडला आहे? दुधाच्या सायीमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, आठवडाभरात त्वचेवर येईल चमकदार ग्लो
4

उन्हामुळे चेहरा काळवंडला आहे? दुधाच्या सायीमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, आठवडाभरात त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.