Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bloating Remedies: सतत आंबट ढेकर किंवा पित्ताचा त्रास कशामुळे होतो? अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Bloating Remedies: अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर लगेच आंबट ढेकर, पोट फुगणे इत्यादी समस्या वाढू लागतात. या सर्व त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात फायबर युक्त पदार्थांचे सेवन, भरपूर पाणी आणि शारीरिक हालचाल करणे फार आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 18, 2026 | 05:30 AM
सतत आंबट ढेकर किंवा पित्ताचा त्रास कशामुळे होतो? अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय

सतत आंबट ढेकर किंवा पित्ताचा त्रास कशामुळे होतो? अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय

Follow Us
Follow Us:

Bloating Remedies: धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा स्स्वयंपाक बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. सतत कामात व्यस्थ राहिल्यामुळे शरीराकडे खूप जास्त दुर्लक्ष केले जाते. जेवल्यानंतर लगेच आंबट ढेकर येणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, पोटातून आवाज येणे, वारंवार गॅस बाहेर पडणे इत्यादी समस्या उद्भवतात. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अपचनाच्या समस्या कायमच उद्भवतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे सकाळी पोटात जडपणा जाणवतो आणि गॅस झाल्यासारखे वाटते. कायमच साधा पचनाचा त्रास म्हणून शरीराकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे केल्यामुळे गंभीर आजार सुद्धा वाढतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे सुद्धा फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

National Epilepsy Day: फिट्सबद्दलचे गैरसमज करा दूर! प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत ‘हे’ महत्त्वाचे गैरसमज आणि सत्य

पोटात गॅस कशामुळे होतो:

अन्नपदार्थांचे सेवन करताना किंवा कोणताही पदार्थ पिताना काही प्रमाणात पोटामध्ये हवा सुद्धा जाते. घाईघाईने जेवणे, अन्नपदार्थ व्यवस्थित चावून न खाणे, जेवताना बोलणे, स्ट्रॉने पेये पिणे किंवा सतत काहींना काही खात राहिल्यामुळे पोटात हवा जाण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे घशात जळजळ आणि आंबट ढेकर येऊन घशाजवळ काहीतरी अडकल्यासारखे वाटते.

काही पदार्थ पचन होताना आतड्यांमध्ये विघटन होतात. या प्रक्रियेमुळे गॅस तयार होण्याची जास्त शक्यता असते. कडधान्ये, हरभरा, राजमा, वाटाणे, कोबी, फ्लॉवर, कांदा यांसारखे पदार्थ आतड्यांमध्ये गॅस वाढवतात. तर काहींना दूध सहज पचन होत नाही. दुधामध्ये असलेल्या लॅक्टोजमुळे पोट फुगणे किंवा गॅस होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय शरीरात वाढलेली बद्धकोष्ठता, कमी शारीरिक हालचाल, गोळ्या औषधांचे सेवन, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम यांसारख्या पचनाच्या विविध समस्या उद्भवल्यामुळे पोटात गॅस तयार होतात.

Male Fertility Tips: फॉलिक ॲसिड केवळ महिलांसाठीच नाही; तर पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठीही आवश्यक, जाणून घ्या सविस्तर

पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी उपाय:

आतड्यांमध्ये वाढलेला गॅस कमी करण्यासाठी जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे. जेवण आणि झोप यामध्ये ३ तासांचे अंतर असणे फार आवश्यक आहे. जेवण झाल्यानंतर १५ ते २० मिनिटं चालावे. यामुळे पचनसंस्था सुधारते आणि खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यास मदत होते. दिवसभर एका जागेवर बसून काम करत राहिल्यामुळे अपचनाच्या तक्रारी वाढू लागतात. त्यामुळे १ किंवा २ तासांचे अंतराने उभं राहणे किंवा चालणे आवश्यक आहे. पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते. आहारात फायबरचा समावेश करावा. सोडा, कोल्ड्रिंक्स आणि कार्बोनेटेड पेये पिणे टाळावे. दूध, गहू, कांदा, कडधान्ये किंवा विशिष्ट फळे खाल्ल्यानंतर गॅस होत असेल तर आहारात अजिबात समावेश करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सतत आंबट ढेकर येण्यामागील कारणे कोणती?

    Ans: सतत आंबट ढेकर येण्यामागे अॅसिडिटी, अपचन, पोटात जास्त आम्ल तयार होणे किंवा पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येणे ही कारणे असू शकतात.

  • Que: पित्ताचा त्रास आणि आंबट ढेकर यांचा काय संबंध आहे?

    Ans: पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत आल्यामुळे आंबट ढेकर, छातीत जळजळ आणि घशात आंबटपणा जाणवू शकतो. या स्थितीला अॅसिड रिफ्लक्स म्हणतात.

  • Que: सतत आंबट ढेकर येणे कोणत्या आजाराचे लक्षण असू शकते?

    Ans: वारंवार आंबट ढेकर येणे हे अॅसिड रिफ्लक्स किंवा GERD (Gastroesophageal Reflux Disease) चे लक्षण असू शकते. काही वेळा गॅस्ट्रायटिस किंवा पचनाशी संबंधित इतर समस्यांमुळेही असा त्रास होतो.

Web Title: Remedies for bloating what causes persistent sour belching or acidity try these measures to get relief from indigestion sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • bloating
  • gut health
  • home remedies

संबंधित बातम्या

Weight Loss: महिनाभरात वजन होईल झपाट्याने कमी! रात्री झोपण्याआधी नियमित करा वेलचीचे सेवन
1

Weight Loss: महिनाभरात वजन होईल झपाट्याने कमी! रात्री झोपण्याआधी नियमित करा वेलचीचे सेवन

Skin Care Tips: १० रुपयांत चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! बेसनमध्ये मिक्स करा ‘ही’ पांढरी गोष्ट, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार
2

Skin Care Tips: १० रुपयांत चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! बेसनमध्ये मिक्स करा ‘ही’ पांढरी गोष्ट, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार

Hibiscus Hair Mask: कोरड्या केसांमुळे हैराण झाला आहेत? मग ‘या’ पद्धतीने घरी बनवा जास्वंद- कढीपत्त्याचा हेअर मास्क, केस होतील घनदाट
3

Hibiscus Hair Mask: कोरड्या केसांमुळे हैराण झाला आहेत? मग ‘या’ पद्धतीने घरी बनवा जास्वंद- कढीपत्त्याचा हेअर मास्क, केस होतील घनदाट

Homemade Soap: जपानी महिलांप्रमाणे गोरीपान त्वचा हवा आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल साबण, त्वचा होईल चमकदार
4

Homemade Soap: जपानी महिलांप्रमाणे गोरीपान त्वचा हवा आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल साबण, त्वचा होईल चमकदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.