अरे देवा! येथे बायको भाड्याने मिळते (फोटो सौजन्य - Google Gemini AI)
थायलंड हा एक सुंदर देश आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. येथील समुद्रकिनारे, जेवण आणि नाईटलाइफ जगभर प्रसिद्ध आहे. पण या सर्वांव्यतिरिक्त, तुम्हाला माहिती आहे का की थायलंडमध्ये लोक फक्त खोल्या, हॉटेल किंवा ऑफिसच नाही तर पत्नीदेखील भाड्याने घेऊ शकतात? हो तुम्ही योग्य वाचलं आहे, हे खरं आहे.
या प्रथेला ‘वाईफ ऑन हायर’ किंवा ‘ब्लॅक पर्ल’ असे म्हटले जाते. हा एक प्रकारचा तात्पुरता करण्यात येणारा विवाह आहे, ज्यामध्ये एका तरुणीला पैसे देऊन काही काळासाठी पत्नी बनवता येते. ती तरुणी निर्धारित वेळेपर्यंत पत्नीची सर्व कर्तव्ये पार पाडते. थायलंडमध्ये हा ट्रेंड वेगाने वाढतो आणि वेगाने वाढणारा रेंटल वाईफचा ट्रेंड नक्की काय आहे, रेंटल वाईफ कोण आहे आणि तो कसा सुरू झाला ते जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Google Gemini AI)
कसा सुरू झाला ट्रेंड?
Thailand News या युट्यूब व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, रेंटल वाईफचा ट्रेंड प्रथम पटाया आणि बँकॉक सारख्या शहरांमध्ये सुरू झाला. असे म्हटले जाते की पर्यटक दूरच्या देशांमधून या शहरांमध्ये येत असत, त्यावेळी ते त्यांच्या एकाकीपणावर मात करण्यासाठी जोडीदार शोधत असत. नंतर स्थानिक महिला मर्यादित काळासाठी सोबतीची भूमिका बजावत असत, जसे की एकत्र वेळ घालवणे, बोलणे, फिरणे आणि घरकामात मदत करणे. हे परस्पर संमतीवर आधारित नाते होते. हळूहळू ही गोष्ट एक ट्रेंड बनत गेली, ज्याला आता ‘वाईफ ऑन हायर’ वा ‘ब्लॅक पर्ल’ किंवा सरळ शब्दात मराठीत सांगायचे झाले तर ‘भाड्याने घेतलेली पत्नी’ असे म्हटले जाते.
Relationship Tips: लग्नापूर्वी जोडीदारासह बोलून घ्या 4 गोष्टी, तरच टिकू शकतं नातं
रेंटल वाईफ कोण असतात?
अनेक अहवालातून समोर आले आहे की, या ‘रेंटल वाईफ’ सहसा गरीब ग्रामीण महिला असतात. त्या बार, मसाज सेंटर किंवा क्लबमध्ये काम करतात. येथेच त्या परदेशी पर्यटकांना भेटतात. बहुतेक महिला घरातील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि आर्थिक हातभार लावण्यासाठी हे काम निवडतात. त्यांच्यासाठी हा त्यांचा उदरनिर्वाह करण्याचा एक मार्ग आहे. तथापि, याबद्दल त्यांच्यावर कोणताही दबाव नसतो. कधीकधी अशा नात्यांमध्ये परस्पर समज इतकी चांगली असते की दोन्ही व्यक्ती एकमेकांशी बराच काळ जोडल्या जातात. काही प्रकरणांमध्ये, ही मैत्री नंतर कायमच्या नात्यातदेखील बदलते आणि या व्यक्ती एकमेकांशी दीर्घकाळासाठी लग्नही करू शकतात.
दर कसे ठरवले जातात?
महिलेचे वय, सौंदर्य, शिक्षण आणि वेळेनुसार भाड्याची रक्कम ठरवली जाते. हा दर साधारणपणे १६०० डॉलर्स म्हणजेच १.३ लाख रुपयांपासून सुरू होतो आणि ७०-८० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. काही महिला आठवड्याचे पॅकेज देतात, तर काही महिला या महिन्यांसाठी भाड्याने दिल्या जातात. या महिलांबरोबर करण्यात आलेल्या करारानुसार हे ठरते. असा प्रश्न पडतो की, हे कायदेशीर आहे का? तर थायलंडमध्ये ही प्रथा इतकी लोकप्रिय आहे की या विषयावर एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. तथापि, थायलंडमध्ये सध्या अशा भाड्याने घेतलेल्या पत्नीबाबत कोणताही विशिष्ट कायदा नाही.
ही कल्पना कुठून आली?
असे म्हटले जाते की थायलंड व्यतिरिक्त, जपान आणि कोरियासारख्या देशांमध्ये ही प्रथा आधीच सुरू आहे. त्याच वेळी, या ट्रेंडच्या जलद वाढीची अनेक कारणे आहेत. शहरीकरण आणि धावपळीच्या जीवनात लोकांचा एकटेपणा वाढत आहे.
अशा परिस्थितीत, लोक कायमस्वरूपी नात्याऐवजी तात्पुरते नातेसंबंध बनवण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. थायलंड सरकारचा असाही विश्वास आहे की देशात भाड्याने घेतलेल्या पत्नीची प्रथा अस्तित्वात आहे आणि पर्यटकांमुळे ती व्यवसायाचे रूप धारण करू लागली आहे. सरकार आता यावर कायदेशीर नियंत्रण आणण्याबद्दल बोलत आहे, जेणेकरून महिलांचे शोषण होऊ नये आणि नाती मर्यादेत रहावीत.