२६ जानेवारीचा दिवस गोड बनवायचाय? तर मग घरी बनवा मऊसूत ‘गाजर पाक’, झटपट तयार होते रेसिपी
Gajar Pak Recipe : हिवाळ्यात गाजर फार स्वस्त होतात. २६ जानेवारीचा दिवशी तुम्हालाही घरी जर काही खास बनवायचं असेल तर गाजर पाक हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल.
नेहमी नेहमी गाजर हलवाच कशाला यावेळी घरी बनवा टेस्टी गाजर पाक.
२६ जानेवारी म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिन देशाच्या स्वातंत्र्य, संविधान आणि एकतेचा उत्सव. या दिवशी घराघरांत देशभक्तीची भावना असते, तिरंग्याचे रंग, देशभक्तीपर गाणी आणि खास पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. सण-उत्सव म्हटलं की गोड पदार्थ हवाच! प्रजासत्ताक दिनानिमित्त केशरी रंगाचा गाजर पाक हा अतिशय योग्य आणि पारंपरिक गोड पदार्थ आहे. गाजराची नैसर्गिक गोडी, साजूक तुपाचा दरवळ आणि सुके मेव्याची खमंग चव… हे सगळं एकत्र आलं की गाजर पाक खास बनतो. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देणारा आणि पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. चला तर मग, २६ जानेवारीच्या खास दिवशी घरच्या घरी सोप्या पद्धतीने देशभक्तीच्या रंगात रंगलेला गाजर पाक कसा बनवायचा याची रेसिपीजाणून घेऊया.