Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Drink : उन्हाळ्यात शरीर मिळवून द्या थंडावा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा आंबट-गोड चवीचा ‘कोकम सरबत’

Kokam Sarbat Recipe : लालसर कोकमपासून तयार होणारे हे सरबत उन्हाळ्यातील एक लोकप्रिय समर ड्रिंक आहे. हे चवीला चटपटीत लागते आणि शरीराला हायड्रेट करून थंडावा मिळवून देते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 11, 2026 | 03:30 PM
Summer Drink : उन्हाळ्यात शरीर मिळवून द्या थंडावा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा आंबट-गोड चवीचा 'कोकम सरबत'

Summer Drink : उन्हाळ्यात शरीर मिळवून द्या थंडावा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा आंबट-गोड चवीचा 'कोकम सरबत'

Follow Us
Follow Us:
  • कोकम सरबत हे कोकणातील रातांबीच्या फळांपासून बनवलेले एक अत्यंत आरोग्यदायी आणि थंडगार पेय आहे.
  • बाजारात कोकम सहज उपलब्ध होतात ज्यापासून हे पेय तयार केले जाते.
  • उन्हाळ्यात कोकम सरबताचे आवर्जून सेवन करावे.
उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांची आठवण आपोआप येते. अशा वेळी कोकम सरबत हा एक उत्तम आणि नैसर्गिक पर्याय ठरतो. कोकम हे प्रामुख्याने कोकण भागात आढळणारे फळ असून त्यापासून बनवलेले सरबत चविष्ट आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असते. कोकममध्ये शरीरातील उष्णता कमी करण्याची क्षमता असते, त्यामुळे उन्हाळ्यात होणारी डिहायड्रेशन, थकवा आणि अ‍ॅसिडिटी यापासून आराम मिळतो.

चहासोबत लुटा गुजराती खांडवीचा मजा, नाश्त्यासाठीचा परफेक्ट हेल्दी पर्याय; रेसिपी नोट करा

कोकम सरबताची खासियत म्हणजे त्याची आंबट-गोड चव आणि सुंदर लालसर रंग. हे सरबत पोटासाठीही खूप हलके असते आणि पचन सुधारण्यास मदत करते. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये उन्हाळ्यात कोकम सरबत बनवून ठेवण्याची परंपरा आहे. पाहुणे आले किंवा बाहेरून उन्हातून घरी परतल्यावर थंडगार कोकम सरबत दिले की लगेच ताजेतवाने वाटते. घरच्या घरी कोकम सरबत बनवणे खूप सोपे आहे आणि त्यासाठी फार कमी साहित्य लागते. चला तर मग पाहूया चविष्ट आणि थंडगार कोकम सरबताची सोपी रेसिपी.

साहित्य

  • 10–12 सुकी कोकम फुले
  • 3–4 टेबलस्पून साखर (चवीनुसार)
  • 1/4 टीस्पून जिरेपूड
  • चिमूटभर काळं मीठ
  • 2 कप थंड पाणी
  • बर्फाचे तुकडे
  • सजावटीसाठी पुदिन्याची पाने (ऐच्छिक)
उन्हाळ्यात शरीरात कायमच थकवा जाणवतो? ऊर्जा वाढवण्यासाठी नियमित खा ‘हा’ पौष्टिक लाडू , नोट करा रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम सुकी कोकम फुले स्वच्छ पाण्यात धुऊन घ्या.
  • एका बाऊलमध्ये कोकम फुले 1 कप कोमट पाण्यात 15–20 मिनिटे भिजत ठेवा.
  • कोकम मऊ झाल्यावर ते हाताने किंवा चमच्याने चांगले मॅश करा, जेणेकरून त्याचा रंग आणि चव पाण्यात उतरतील.
  • आता हे मिश्रण गाळून त्यात साखर घाला आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा.
  • त्यात उरलेले पाणी, जिरेपूड आणि काळं मीठ घालून नीट मिक्स करा.
  • ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घाला आणि त्यावर कोकम सरबत ओता.
  • वरून पुदिन्याची पाने घालून थंडगार कोकम सरबत सर्व्ह करा.
  • उन्हाळ्याच्या दिवसांत हे आंबट-गोड आणि ताजेतवाने कोकम सरबत शरीराला थंडावा देतं आणि उर्जा देण्यासही मदत करतं.
 

Web Title: Summer drink make tangy sweet kokum sarbat at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • summer drink

संबंधित बातम्या

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
1

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
4

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.