Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहासोबत लुटा गुजराती खांडवीचा मजा, नाश्त्यासाठीचा परफेक्ट हेल्दी पर्याय; रेसिपी नोट करा

Khandvi Recipe : नाश्त्यासाठी एक हेल्दी पर्यायाच्या शोधात असाल तर खांडवी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. बेसनापासून तयार होणारा हा पदार्थ चहासोबत खाल्ला जाऊ शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 11, 2026 | 09:30 AM
चहासोबत लुटा गुजराती खांडवीचा मजा, नाश्त्यासाठीचा परफेक्ट हेल्दी पर्याय; रेसिपी नोट करा

चहासोबत लुटा गुजराती खांडवीचा मजा, नाश्त्यासाठीचा परफेक्ट हेल्दी पर्याय; रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • खांडवी हा एक भारतीय नाश्त्याचा प्रकार आहे.
  • बेसनापासून हा पदार्थ तयार केला जातो.
  • गुजरातमध्ये हा पदार्थ अधिकतर खाल्ला जातो.
खांडवी हा गुजरातमधील एक अतिशय प्रसिद्ध आणि चविष्ट स्नॅक आहे. हलका, मऊ आणि तोंडात विरघळणारा असा हा पदार्थ बेसन आणि ताकापासून बनवला जातो. खांडवीची खासियत म्हणजे त्याचे पातळ रोल आणि वर दिलेली मोहरी-कढीपत्त्याची फोडणी. हा पदार्थ दिसायला जितका सुंदर असतो तितकाच खायला देखील स्वादिष्ट असतो.

Recipe : खास प्रसंगावेळी घरी बनवा गोडसर चवीची ‘तांदळाची फिरनी’, चव अशी की सर्वच होतील खुश

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, पाहुणे आले असताना किंवा खास प्रसंगी खांडवी बनवली जाते. हा पदार्थ हलका असल्यामुळे पचायलाही सोपा असतो. योग्य पद्धतीने मिश्रण शिजवून पातळ पसरवले तर खांडवीचे परफेक्ट रोल तयार होतात. नारळ आणि कोथिंबीर घालून सजवलेली खांडवी प्लेटमध्ये खूप आकर्षक दिसते. चला तर मग घरीच मऊ आणि चविष्ट खांडवी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य :

  • 1 कप बेसन
  • 1 कप ताक (किंवा पातळ दही)
  • 1 कप पाणी
  • 1/2 टीस्पून हळद
  • चवीनुसार मीठ
फोडणीसाठी :
  • 1 टेबलस्पून तेल
  • 1/2 टीस्पून मोहरी
  • 1 टीस्पून तीळ
  • 6–7 कढीपत्त्याची पाने
  •  किसलेला नारळ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत हराभरा कबाब, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय

कृती :

  • एका भांड्यात बेसन, ताक, पाणी, हळद आणि मीठ घालून गाठी न राहता चांगले एकजीव करून घ्या.
  • हे मिश्रण कढईत घालून मध्यम आचेवर सतत हलवत शिजवा.
  • मिश्रण घट्ट होऊ लागले की लगेच प्लेट किंवा स्वच्छ पृष्ठभागावर पातळ थरात पसरवा.
  • थोडे थंड झाल्यावर त्याच्या लांब पट्ट्या कापून सावकाश रोल करा.
  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, तीळ आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करा.
  • ही फोडणी तयार केलेल्या खांडवीवर घाला.
  • वरून किसलेला नारळ आणि कोथिंबीर घालून सजवा आणि स्वादिष्ट खांडवी सर्व्ह करा.
  • गरम चहा किंवा हिरव्या चटणीसोबत ही खांडवी खूप छान लागते.

Web Title: How to make gujrati style khandvi at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
1

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
2

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी
3

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी
4

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.