Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

औषधापेक्षाही गुणकारी ठरतोय व्यायाम, 37% कॅन्सर मृत्यू 28% पुन्हा कॅन्सर होण्याचा धोका कमी; रिसर्चमध्ये खुलासा

बहुतेक कर्करोगांवर उपचार करता येतात. पण असे असूनही, दरवर्षी लाखो लोक कर्करोगाने मरतात. दरम्यान, एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की औषधापेक्षा कर्करोगाशी लढण्यासाठी व्यायाम अधिक प्रभावी आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 20, 2025 | 09:52 AM
नियमित व्यायाम केल्याने कॅन्सरचा धोका होईल कमी (फोटो सौजन्य - iStock)

नियमित व्यायाम केल्याने कॅन्सरचा धोका होईल कमी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

आजही, कर्करोगातून वाचणे हे चमत्कारापेक्षा कमी मानले जात नाही. असे असूनही, बहुतेक कर्करोगांवर आता उपचार करता येतात. यावरून हे स्पष्ट होते की या आजाराशी लढण्यासाठी औषध १००% प्रभावी नाही. कर्करोगाच्या रुग्णांसाठी एक नवीन आणि आशादायक बातमी समोर आली आहे.

अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, कॅनडा आणि इस्रायलमधील रुग्णांवर केलेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासात असे आढळून आले आहे की कर्करोगाच्या उपचारानंतर रुग्णांनी नियमित व्यायाम कार्यक्रम स्वीकारला तर मृत्यूचा धोका एक तृतीयांश कमी होतोच, परंतु कर्करोग परत येण्याची किंवा नवीन कर्करोग होण्याची शक्यता देखील लक्षणीयरीत्या कमी होते. हा खुलासा एका रिसर्चमध्ये करण्यात आला असून आपण याबाबत अधिक माहिती या लेखातून घेऊया (फोटो सौजन्य – iStock) 

औषधापेक्षा व्यायाम अधिक प्रभावी 

व्यायाम करणे अधिक फायदेशीर ठरू शकते

या अभ्यासाचे अहवाल अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी (ASCO) च्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात आले आणि ते न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झाले आहेत. असे पहिल्यांदाच दिसून आले आहे. वैद्यकीय संशोधनातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की व्यायाम अनेक औषधांपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतो.

कॅन्सर होण्याआधी शरीर देत असतो ‘हे’ संकेत, याकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला खुले आमंत्रण! वेळीच सावध व्हा

अभ्यास काय म्हणतो?

या संशोधनात २००९ ते २०२३ दरम्यान ८८९ कोलन कर्करोगाच्या रुग्णांचा समावेश होता, त्यापैकी ९०% स्टेज ३ रुग्ण होते. त्यांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले होते – पहिल्या गटाला (४४५ रुग्णांना) व्यायाम कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले होते. दुसऱ्या गटाला (४४४ रुग्णांना) फक्त निरोगी जीवनशैलीचे पुस्तक देण्यात आले. ५ वर्षांनंतर, व्यायाम करणाऱ्या रुग्णांमध्ये कर्करोगाची पुनरावृत्ती किंवा नवीन कर्करोगाचा विकास होण्याचा धोका २८% ने कमी झाल्याचे आढळून आले. ८ वर्षांनंतर, त्यांचा मृत्युदर ३७% ने कमी झाला.

ASCO च्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे विधान

काय आहे तज्ज्ञांचे मत

डॉ. ज्युली ग्रॅलो, ज्या या अभ्यासाचा भाग नव्हत्या परंतु ASCO च्या मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांनी या संशोधनाचे वर्णन “सर्वोच्च पातळीवरील पुरावा” असे केले. त्या म्हणाल्या की आम्ही या सत्राला ‘चांगले औषध’ असे नाव दिले आहे परंतु, मी त्याला औषधापेक्षा चांगले आहे असे म्हणेन. कारण त्याचे कोणत्याही औषधासारखे दुष्परिणाम नाहीत. त्या म्हणाल्या की आता कर्करोगाच्या उपचारादरम्यान आणि नंतर औषधाइतकेच शारीरिक हालचालींना महत्त्व देण्याची वेळ आली आहे. या अभ्यासातून अनेक कर्करोग असणाऱ्या रुग्णांना अधिक काळ जगण्याची उमेद मिळू शकते हे मात्र नक्की. 

40 टक्के होईल कॅन्सरचा धोका कमी, करा 5 कामं आणि रहा बिनधास्त!

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Research revealed exercise is more effective than medicines for cancer it may reduce risk of death by 37 recurrence by 28

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • cancer
  • Cancer prevention
  • exercises

संबंधित बातम्या

शरीरात कशी होते Cancer ची सुरुवात? कोणकोणते आहेत टप्पे? वेळीच जाणून घ्या आणि स्वतःचे रक्षण करा
1

शरीरात कशी होते Cancer ची सुरुवात? कोणकोणते आहेत टप्पे? वेळीच जाणून घ्या आणि स्वतःचे रक्षण करा

IBS आणि कोलन कॅन्सरमध्ये काय आहे फरक? लक्षणं एकसारखीच; उडू शकतो गोंधळ
2

IBS आणि कोलन कॅन्सरमध्ये काय आहे फरक? लक्षणं एकसारखीच; उडू शकतो गोंधळ

Cancer च्या पेशी होतील कायमच्या नष्ट! ‘हे’ उपाय केल्यास आयुष्यात कधीच होणार नाही कॅन्सर, कायमच राहाल निरोगी
3

Cancer च्या पेशी होतील कायमच्या नष्ट! ‘हे’ उपाय केल्यास आयुष्यात कधीच होणार नाही कॅन्सर, कायमच राहाल निरोगी

आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयानक लक्षणे, दुर्लक्ष केल्यास आतड्यांच्या होतील चिंध्या
4

आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयानक लक्षणे, दुर्लक्ष केल्यास आतड्यांच्या होतील चिंध्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.