Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हेरिकोसेलच्या वाढत्या समस्यांमुळे पुरुषांच्या प्रजननक्षमतेस धोक! तज्ज्ञांनी दिला वेळीच उपचारांचा सल्ला

दर आठवड्याला वंध्यत्व तपासणीसाठी येणाऱ्या 30 ते 55 वयोगटातील दोन ते तीन पुरुषांमध्ये व्हेरिकोसेलचे निदान होते.उपचार न केल्यास शुक्राणूंची संख्या कमी होणे, हालचाल मंदावणे, शुक्राणूंच्या आकारात दोष दिसून येणे, अंडकोशाचा आकार कमी होणे तसेच हार्मोन्सचे असंतुलन अशा समस्या उद्भवू शकतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 15, 2026 | 02:12 PM
व्हेरिकोसेलच्या वाढत्या समस्यांमुळे पुरुषांच्या प्रजननक्षमतेस धोक! तज्ज्ञांनी दिला वेळीच उपचारांचा सल्ला

व्हेरिकोसेलच्या वाढत्या समस्यांमुळे पुरुषांच्या प्रजननक्षमतेस धोक! तज्ज्ञांनी दिला वेळीच उपचारांचा सल्ला

Follow Us
Follow Us:

पुणे : पुरुषांमधील वंध्यत्वाचे एक महत्त्वाचे पण अनेकदा दुर्लक्षित कारण असलेल्या व्हेरिकोसेलच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. ही समस्या वेळीच ओळखून उपचार घेतल्यास नैसर्गिक गर्भधारणा आणि आयव्हीएफ उपचारांच्या यशाची शक्यता वाढू शकते अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Health Update: देशात ५ वर्षांत २.९४ लाखांहून अधिक एड्‌सग्रस्तांचा मृत्यू! महाराष्ट्राची स्थिती सुधारली,पण मुंबईची चिंताजनक

व्हेरिकोसेल (Varicocele) ही पुरुषांच्या अंडकोषातील (testicles) नसांची सूज किंवा नसा फुगणे स्थिती आहे. पायांमध्ये दिसणाऱ्या व्हेरिकोज व्हेन्सप्रमाणेच ही समस्या असून ती प्रामुख्याने डाव्या बाजूस अधिक प्रमाणात दिसून येते. यामुळे अंडकोशाभोवती रक्तप्रवाहावर परिणाम होतो, तापमान वाढते आणि शुक्राणूंची निर्मिती तसेच गुणवत्ता कमी होऊ शकते.

डॉ. रश्मी निफाडकर( वंध्यत्व निवारण तज्ञ, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, बाणेर, पुणे ) यांनी सांगितले की, व्हेरिकोसेलचे मुख्य कारण म्हणजे शिरांमधील झडपा योग्यरित्या कार्य न करणे. त्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि रक्त साचू लागते. ही समस्या किशोरवयीन आणि तरुण पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. मात्र सुरुवातीला लक्षणे सौम्य किंवा कोणतीह लक्षणं न आढळल्याने ती लक्षात येत नाहीत.त्यांनी सांगितले की, काही पुरुषांमध्ये अंडकोशातील वेदना, जडपणा, सूज, शिरा फुगलेल्या दिसणे किंवा जास्त वेळ उभे राहिल्यानंतर आणि शारीरिक हालचालीनंतर वाढलेला त्रास अशी लक्षणे दिसून येतात. अनेकदा मूल होण्यात अडचणी येऊ लागल्यानंतरच ही समस्या निदर्शनास येते.

उपचार न केल्यास शुक्राणूंची संख्या कमी होणे, हालचाल मंदावणे, शुक्राणूंच्या आकारात दोष दिसून येणे, अंडकोशाचा आकार कमी होणे तसेच हार्मोन्सचे असंतुलन अशा समस्या उद्भवू शकतात. दर आठवड्याला वंध्यत्व तपासणीसाठी येणाऱ्या 30 ते 55 वयोगटातील दोन ते तीन पुरुषांमध्ये व्हेरिकोसेलचे निदान होते.

डॉ. निफाडकर पुढे सांगतात की, मिनिमली इन्वेसिव्ह प्रक्रिया किंवा शस्त्रक्रियेद्वारे व्हेरिकोसीलवर उपचार केल्यास शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास आणि गर्भधारणेची शक्यता वाढण्यास मदत होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, व्हॅरिकोसेलच्या शस्त्रक्रियेनंतरही वीर्याचे मापदंड पूर्ववत करता येत नाहीत आणि अत्यंत गंभीर परिस्थितीत, आयव्हीएफ (IVF) हाच एकमेव उपाय उरतो. त्यामुळे अंडकोशातील सततचा त्रास किंवा वंध्यत्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

डॉ. वैशाली चौधरी(फर्टिलिटी ॲण्ड आयव्हीएफ एक्स्पर्ट मदरहूड हॉस्पिटल्स, खराडी, पुणे) यांच्या मते, वंध्यत्व उपचारासाठी येणाऱ्या सुमारे 20 ते 25 % पुरुषांमध्ये व्हेरिकोसेलची समस्या आढळून येते. अनेक पुरुषांमध्ये या आजाराची कोणतीही ठळक लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र काहींना अंडकोषात वेदना, जडपणा जाणवणे – विशेषतः बराच वेळ उभे राहिल्यानंतर, शारीरिक श्रम किंवा व्यायामानंतर – असा त्रास होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये अंडकोषाचा आकार किंचित लहान झाल्याचेही दिसून येते.

व्हेरिकोसेलचा सर्वाधिक परिणाम शुक्राणूंच्या गुणवत्तेवर होतो. फुगलेल्या शिरांमुळे अंडकोषाभोवतीचे तापमान वाढते, ज्यामुळे शुक्राणूंची निर्मिती आणि त्यांची हालचाल (मोटिलिटी) कमी होऊ शकते. विशेषतः गंभीर स्वरूपाच्या व्हेरिकोसेलमध्ये शुक्राणूंची हालचाल लक्षणीयरीत्या घटल्याचे आढळते. व्हेरिकोसेलचे निदान प्रामुख्याने शारीरिक तपासणीद्वारे केले जाते. त्यानंतर स्क्रोटल सोनोग्राफी आणि डॉप्लर तपासणीद्वारे निदानाची खात्री केली जाते. या तपासण्यांमुळे सुरुवातीच्या टप्प्यातील किंवा ग्रेड 1 व्हेरिकोसेलचेही अचूक निदान शक्य होते.

ग्रेड 3 व्हेरिकोसेलमध्ये शस्त्रक्रिया हा मुख्य उपचार पर्याय मानला जातो. मात्र उपचार किंवा शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही जोडीदारांच्या प्रजननक्षमतेचे मूल्यमापन करणे अत्यंत आवश्यक असते. जर महिला जोडीदाराचे वय 36 ते 37 वर्षांपेक्षा अधिक असेल किंवा अंडोत्सर्जनातील समस्या, फलोपियन ट्यूब ब्लॉकेज अथवा गर्भाशयाशी संबंधित अडचणी असतील, तर आयव्हीएफसारखे प्रगत वंध्यत्व उपचार अधिक योग्य ठरू शकतात. त्यामुळे उपचाराचा निर्णय घेताना जोडप्याच्या एकूण प्रजनन आरोग्याचा सर्वंकष विचार करून वैयक्तिक पातळीवर योग्य उपचारपद्धती निवडणे महत्त्वाचे ठरते.

पोट- मांड्यांवर वाढलेला चरबीचा थर झपाट्याने होईल कमी! उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, राहाल कायमच निरोगी

तज्ज्ञांच्या मते, पुरुषांनी नियमित प्रजनन आरोग्य तपासणी करणे, वेळीच तपासणी करणे आणि पुरुष वंध्यत्वाबाबत खुलेपणाने चर्चा करणे गरजेचे आहे. आयव्हीएफ किंवा इतर फर्टिलिटी उपचार घेताना केवळ महिलांच्या आरोग्याकडे लक्ष न देता पुरुषांच्या प्रजननक्षमतेचीही योग्य तपासणी करणे गरजेचे असल्याचे डॉ. निफाडकर यांनी स्पष्ट केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हेरिकोसेल म्हणजे काय?

    Ans: व्हेरिकोसेल म्हणजे अंडकोषाच्या आसपासच्या नसांमध्ये सूज किंवा त्या फुगणे. ही समस्या पुरुषांमध्ये आढळू शकते.

  • Que: व्हेरिकोसेलचा पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होतो का?

    Ans: काही प्रकरणांमध्ये व्हेरिकोसेलमुळे शुक्राणूंची संख्या, हालचाल किंवा गुणवत्ता प्रभावित होऊ शकते, त्यामुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते.

  • Que: व्हेरिकोसेलची लक्षणे कोणती असू शकतात?

    Ans: अंडकोषात जडपणा जाणवणे, वेदना, सूज, उभे राहिल्यावर त्रास वाढणे किंवा अंडकोषाच्या आकारात बदल जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात.

Web Title: Rising issues with varicocele pose a threat to male fertility experts advise timely treatment health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Doctor advice
  • Health Care Tips
  • male infertility

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.