Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

World Heart Day: कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होतो. ज्याच्या परिणामामुळे श्वास घेण्यास अडथळे निर्माण होऊन कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचत्र करणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 28, 2026 | 02:30 PM
World Heart Day:‘नॉर्मल' रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

World Heart Day:‘नॉर्मल' रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Follow Us
Follow Us:

World Heart Day: भारतातील बहुतेक व्यक्तींना त्यांच्या कोलेस्ट्रॉलबाबत माहित असते, पण फार कमी व्यक्तींना त्यांचे वैयक्तिक एलडीएल-सी लक्ष्य माहित असते. हृदयाच्या आरोग्यासंदर्भात केअर घेण्याची एकच पद्धत सर्वांना लागू होऊ शकत नाही, याबाबत कार्डिओलॉजिस्ट स्पष्ट करत आहेत. ३४ वर्षीय विक्रम देसाई यांना त्यांच्या वार्षिक आरोग्य तपासणीचा रिपोर्ट मिळाला, तेव्हा त्यांच्या कोलेस्ट्रॉलची पातळी मर्यादेत होती. तंदुरुस्त आणि सक्रिय जीवनशैली असल्याने सर्व काही ठीक आहे असा त्यांचा समज झाला. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांना महत्त्वाचा फरक समजला: लॅबमधील रिपोर्ट सर्वसाधारण माहिती देतात, पण कौटुंबिक इतिहास किंवा मधुमेहासारखे वैयक्तिक जोखीम घटक व्यक्तीचे खरे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल (एलडीएल-सी) लक्ष्य निश्चित करतात.(फोटो सौजन्य – istock)

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

विक्रम यांच्या केसमधून भारतातील शहरी भागांमधील वाढते वास्तव समोर येते. भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ७.८ टक्‍के मृत्यू उच्च कोलेस्ट्रॉलमुळे होतात आणि देशातील ३१ टक्‍के व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली दिसून येते. पाश्चिमात्य देशांतील व्यक्तींच्या तुलनेत भारतातील व्यक्तींना हृदयाशी संबंधित आजार १० ते १५ वर्षे आधी होतो. अनेक लोकांना त्यांच्या एकूण कोलेस्ट्रॉलची आकडेवारी माहित असली, तरी स्वतःचे वैयक्तिक एलडीएल-सी लक्ष्य किती असायला पाहिजे हे फार कमी लोकांना माहित आहे.

एलडीएल-सीचे स्वरूप:

उच्च एलडीएल-सीला अनेकदा “सायलेंट किलर” म्हटले जाते, कारण कोणतीही दृश्य लक्षणे न दाखवता ते हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर (प्लाक) जमा करण्याचे काम करते. या स्थितीला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. यामुळे महत्त्वाच्या अवयवांकडे होणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका वाढतो. तरुण असणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे किंवा वजन नियंत्रणात असणे म्हणजे एलडीएल-सी अपेक्षित मर्यादेत आहे असे नाही.

एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी वैयक्तिक उद्दिष्टे:

एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी लहान वयात तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) वयाच्या १८व्या वर्षापासून लिपिड प्रोफाइल तपासणी करण्याचा सल्ला देते. वेळेत केलेल्या तपासणीमुळे समस्या गंभीर होण्यापूर्वी शोधण्यात मदत होते. आरोग्यदायी दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील उच्च एलडीएल-सी असू शकते, त्यामुळे नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

मुंबईतील सैफी हॉस्पिटल येथील कन्सल्टंट इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. निमित शाह म्हणाले, “लवकर निदान म्हणजे केवळ आकडेवारी तपासणे नाही. एलडीएल-सीचे लक्ष्य प्रत्येकासाठी वेगळे असते आणि सर्वांसाठी केअर घेण्याची एकच पद्धत लागू होत नाही. प्रत्येक व्यक्तीचे वय, कौटुंबिक इतिहास आणि मधुमेह किंवा उच्च रक्तदाबासारखे इतर आजार यांसारखे स्वतंत्र जोखीम घटक असतात, ज्यावरून एलडीएल-सी पातळी निश्चित होते. एलडीएल-सी पातळी मर्यादेत राखणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे, आपल्या आरोग्याच्या स्थितीबाबत माहित असणे आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणाच्या प्रवासात स्वतः केअर करणे गरजेचे आहे.”

हृदयाच्या आरोग्याची स्वत:हून काळजी घ्या:

पुढील आरोग्य तपासणीच्या वेळी डॉक्टरांना तीन महत्त्वाचे प्रश्न विचारून हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी स्वतः घ्या:

आज माझी एलडीएल-सी पातळी किती आहे?
माझे वैयक्तिक एलडीएल-सी लक्ष्य काय असले पाहिजे?
माझ्या उद्दिष्टानुसार पातळी मर्यादेत आहे का, आणि नसल्यास, माझ्यासाठी कोणते पर्याय आहेत?

वयाच्या ७६ व्या वर्षी सुद्धा Narendra Modi ‘ही’ भाजी खाऊन आहेत हेल्दी! विटामिन बी १२ वाढण्यासोबतच हाडांच्या वेदना होतील कमी

संतुलित आहार, तणाव नियंत्रण आणि नियमित व्यायाम यांसारखे जीवनशैलीतील बदल हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. तरीही एलडीएल-सी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ जीवनशैलीतील हे बदल पुरेसे ठरतील असे नाही. अशा वेळी लिपिड कमी करणारे औषधोपचार आवश्यक ठरतात आणि दीर्घकाळापर्यंत या औषधोपचाराचे पालन करणे आवश्यक आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: LDL-C म्हणजे काय?

    Ans: LDL-C म्हणजे Low-Density Lipoprotein Cholesterol. याला सामान्यतः ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल म्हटले जाते. रक्तातील LDL-C जास्त असल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्याचा धोका वाढू शकतो.

  • Que: LDL-C ची ‘नॉर्मल’ रेंज सर्वांसाठी सारखी असते का?

    Ans: नाही. LDL-C चे योग्य लक्ष्य व्यक्तीच्या एकूण हृदयविकाराच्या जोखमीवर अवलंबून बदलू शकते. त्यामुळे केवळ प्रयोगशाळेतील ‘नॉर्मल’ रेंज पाहण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो.

  • Que: वैयक्तिक LDL-C ध्येय म्हणजे काय?

    Ans: व्यक्तीचे वय, आधीचा हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब आणि इतर जोखीम घटक लक्षात घेऊन डॉक्टर LDL-C ची योग्य लक्ष्यपातळी ठरवू शकतात.

Web Title: World heart day why knowing your personalized ldl c target beyond the normal range is crucial for heart health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • heart attack awareness
  • World Heart Day news

संबंधित बातम्या

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
1

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
2

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
3

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी
4

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.