Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care Tips: कमकुवत केसांसाठी फायदेशीर ठरेल रोजमेरी ऑइल! जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Rosemary Oil For Hair: केसगळती, पातळ केस आणि केसांच्या वाढीसाठी उपाय म्हणून रोजमेरी ऑइलचा वापर वाढत आहे. परंतु रोजमेरी ऑइल वापरण्याची योग्य पद्धत कोणती, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 20, 2026 | 08:43 PM
photo - yandex

photo - yandex

Follow Us
Follow Us:
  • कमकुवत केसांसाठी फायदेशीर ठरेल रोजमेरी ऑइल
  • रोजमेरी ऑइलचे फायदे
  • वापरण्याची योग्य पद्धत
केस गळणे, केस पातळ होणे आणि त्यांची वाढ मंदावणे या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. वाढते प्रदूषण, ताणतणाव, अनहेल्दी डाएट आणि केमिकल प्रोडक्टचाअतिवापर यामुळे केस कमकुवत होऊ लागतात. अशा वेळी अनेकजण नैसर्गिक उपायांचा अवलंब करतात. त्यामध्ये रोजमेरी ऑइल हा एक लोकप्रिय पर्याय ठरत आहे. टाळूमधील रक्ताभिसरण सुधारण्यास आणि केसांच्या मुळांना पोषण देण्यास ते मदत करू शकते. मात्र, याचा योग्य आणि सुरक्षित वापर करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

High BP: फक्त मोठ्यांनाच नाही! लहान मुलांनाही होऊ शकतो हाय ब्लड प्रेशर, जाणून घ्या कारणे

रोजमेरी ऑइलचे फायदे

रोजमेरी ऑइलमध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी- इन्फ्लमेन्टरी गुणधर्म असल्याचे मानले जाते. त्यामुळे टाळूचे आरोग्य सुधारण्यास, केसांच्या मुळांना पोषण मिळण्यास आणि केस तुटण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. नियमित आणि सातत्यपूर्ण वापरामुळे केस अधिक मजबूत आणि निरोगी दिसू शकतात.

वापरण्याची योग्य पद्धत

रोजमेरी एसेन्शियल ऑइल कधीही थेट टाळूवर लावू नये. ते खोबरेल, ऑलिव्ह किंवा जोजोबा यांसारख्या कॅरिअर ऑइलमध्ये काही थेंब मिसळून वापरावे. त्यानंतर बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने ५ ते १० मिनिटे टाळूला मसाज करावा. तेल किमान एक तास ठेवून नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवावेत. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करता येतो.

घाई नको, सातत्य महत्त्वाचे

रोजमेरी ऑइल वापरल्यानंतर लगेचच परिणाम दिसतील, अशी अपेक्षा ठेवू नये. केसांची वाढ ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने बदल दिसण्यासाठी काही महिने लागू शकतात. नियमित वापर आणि योग्य केसांची निगा राखल्यास हळूहळू सकारात्मक परिणाम जाणवू शकतात.

या चुका टाळा

अतिप्रमाणात तेल वापरणे, एसेन्शियल ऑइल थेट त्वचेवर लावणे किंवा रोजच तेल लावणे टाळावे. संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी प्रथम पॅच टेस्ट करावी. तेल लावल्यानंतर टाळूवर जळजळ, खाज किंवा पुरळ आल्यास त्याचा वापर थांबवून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

केस निरोगी ठेवण्यासाठी या सवयीही आवश्यक

रोजमेरी ऑइलसोबतच संतुलित आहार, पुरेशी झोप, भरपूर पाणी पिणे आणि तणाव नियंत्रणात ठेवणेही महत्त्वाचे आहे. प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्त्वांनी युक्त आहार घेतल्यास केसांच्या वाढीस मदत होते. तसेच उष्णता निर्माण करणाऱ्या स्टायलिंग उपकरणांचा अतिवापर टाळणेही आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: 30 दिवस फक्त सॅलड खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Web Title: Rosemary oil benefits for hair growth hair fall control tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • Benefits of Oil
  • hair care tips in marathi
  • rose

संबंधित बातम्या

Rain Hair Damage : पावसाळ्यात केस गळतायत? हेअर Mask आणि हेअर Spaमध्ये कोणता पर्याय आहे बेस्ट?
1

Rain Hair Damage : पावसाळ्यात केस गळतायत? हेअर Mask आणि हेअर Spaमध्ये कोणता पर्याय आहे बेस्ट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.