सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी कोणती फळं आणि भाज्या खाव्यात याचा दिला सल्ला (फोटो सौजन्य - iStock/Instagram)
काही खास फळे आणि भाज्या पोट आणि आतडे स्वच्छ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामध्ये नैसर्गिकरित्या फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात, जे पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या कमी करण्यास मदत करतात. याबाबत सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी महत्त्वाची माहिती देत आपल्या डाएटमध्ये कोणत्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करून घेऊ शकतो याबाबत व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी या संदर्भात सांगितले की, आपले शरीर सुमारे ७० टक्के पाण्याने बनलेले आहे, म्हणून आपण जे काही खातो त्यातही चांगले पाणी असले पाहिजे. पचन आणि आतड्यांच्या शुद्धीकरणासाठी सद्गुरू जास्त पाण्याचे प्रमाण असलेले फळे आणि भाज्या खाण्याची शिफारस करतात.
कोणत्या फळांचे करावे सेवन
कोणत्या फळांचा समावेश करावा
पोट आणि आतडे निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात सफरचंदाचा समावेश करू शकतो. सफरचंदामध्ये पेक्टिन फायबर असते, जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करते आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते. केळी पोटॅशियम आणि फायबरचा चांगला स्रोत आहे, जो पचन सुधारतो आणि आतडे स्वच्छ करतो. अननस तुमच्या पोटासाठी देखील चांगले आहे. त्यात ब्रोमेलेन एंझाइम असते, जे पचन सुधारते आणि जळजळ कमी करते.
व्हिटॅमिन सी ने समृद्ध आवळा पचनसंस्था सुधारतो. हे आतडे स्वच्छ करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. संत्र्यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी असते, जे पचन सक्रिय करण्यास तसेच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. पोट आणि आतडे स्वच्छ करण्यासाठी पपई खाऊ शकता. पपईमध्ये पपेन एंझाइम असते, जे पचन सुधारते आणि आतडे स्वच्छ करते.
‘म्हातारपण जाईल कष्टात…’, एक सवय ठरेल त्रासदायक, सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितला धोका
कोणत्या भाज्यांचे सेवन ठरेल उपयोगी
कोणती भाजी खावी
पचनक्रिया सुधारणाऱ्या अनेक भाज्या आहेत. पालकामध्ये फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असते, जे पचन सक्रिय करण्यास मदत करते. गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन आणि फायबर असते, जे पचनास मदत करते आणि आतडे स्वच्छ करण्यास मदत करते. ब्रोकोलीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
आतड्यासंबंधी काही आजार असतील तर यावेळी तुम्हाला भोपळादेखील मदत करू शकतो. भोपळ्यामध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे आतडे स्वच्छ करण्यास आणि पचन करण्यास मदत करते. रोजच्या आहारामध्ये तुम्ही प्रमाणात भोपळ्याचा समावेश करून घेणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
Anxiety मुळे आयुष्याला लागतोय ब्रेक? सद्गुरू जग्गी वासुदेवांचा सल्ला ठरेल वरदान, जीवन बदलेल
काय सांगतात सद्गुरू
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.