चिंतेवरील सद्गुरूंचा सोपा उपाय
आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात चिंता ही एक सामान्य समस्या बनली आहे. त्यावर उपाय म्हणून बरेच लोक औषधांचा आधार घेतात, परंतु सद्गुरु मानतात की चिंता दूर करण्याचा उपाय औषधांमध्ये नाही तर आपल्या मनात आहे. सद्गुरूंनी यासाठी अत्यंत सोपा आणि प्रभावी असा उपाय सांगितला आहे. सद्गुरु नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे उपाय सांगत असतात.
सद्गुरु म्हणतात की चिंतेचे मुख्य कारण म्हणजे आपले मन आणि शरीर आपले ऐकत नाही. जर आपले मन आपल्या नियंत्रणाखाली असेल तर आपल्याला कधीही चिंता त्रास देऊ शकत नाही. समस्या अशी आहे की आपण आपले मन आणि शरीर समजून घेण्याचा आणि स्थिर करण्याचा प्रयत्न करत नाही, याबाबत अधिक प्रकाश त्यांनी टाकला आहे (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
सद्गुरूंचा साधा उपाय
नमस्कार साधना करण्याचा साधा उपाय
सद्गुरुंच्या मते, जर तुम्हाला कोणताही मोठा योगसाधना करता येत नसेल, तर फक्त ‘नमस्कार साधना’ करा. हा सोपा आणि प्रभावी उपाय तुमची चिंता निम्म्याने कमी करू शकतो. या साधनेसाठी, तुम्हाला तुमचे दोन्ही हात जोडून तुमच्या जीवनासाठी महत्त्वाची गोष्ट मनात आणून पाहावी लागेल, मग मनात ते सूर्य, झाड, लहान मूल किंवा प्रिय व्यक्ती यापैकी काहीही असू शकते.
2 गोष्टींत ठेवलेले अन्न खाणे टाळा, Sadhguru Jaggi Vasudev यांनी उघडले डोळे; 90 टक्के लोकांना कॅन्सरचा धोका
नमस्कार साधना कशी करावी?
नमस्कार मुद्रेत आपले दोन्ही हात पूर्णपणे जोडून बसा. सूर्य, झाडं, आकाश किंवा तुमचं कुटुंब यासारखं तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीकडे काळजीपूर्वक पहा. हे 10-12 मिनिटे करा आणि त्या गोष्टीबद्दल मनापासून कृतज्ञता आणि प्रेम मनात व्यक्त करा. सद्गुरु म्हणतात की ही साधना तुमची आंतरिक अस्वस्थता शांत करते आणि तुमची चिंता कमी करण्यास मदत करते. तसंच तुमचं लक्ष अधिक केंद्रित होते आणि तुम्ही चिंता आणि नैराश्याच्या आहारी जात नाही
निरोगी आरोग्याची 6 सूत्रं, दीर्घायुष्यासाठी Jaggi Vasudev यांनी सांगितले सिक्रेट
Anxiety मागील विज्ञान
चिंता नक्की का वाटते
सद्गुरु समजावून सांगतात की आपले मन एका धारदार सुरीसारखे आहे. जर आपले हात स्थिर नसतील तर हा चाकू आपल्याला फक्त इजा करतो. नमस्कार साधना तुमच्यामध्ये संतुलन आणि स्थिरता आणते, ज्यामुळे तुमचे मन शांत होते. सद्गुरु असेही म्हणतात की औषधांद्वारे चिंता शमवणे हा समस्येवरचा उपाय नाही. आपले मन आणि शरीर चालवणारे आपल्यात दडलेले ‘इंजिनियरिंग’ समजून घेतले पाहिजे तरच यातून तुम्ही लवकर बाहेर पडू शकता
डॉक्टरांकडे कधी जावे?
सद्गुरूंनी सांगितलेला उपाय जरी योग्य असला तरीही तुम्हाला जर जास्त त्रास होत असेल आणि हा त्रास सहन करणे शक्य नसेल तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जास्त प्रमाणात चिंता आणि Anxiety Attacks सतावत असतील तर वेळीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्यावरील योग्य उपाय चालू करावेत
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.