सद्गुरूंनी सांगितली तरूणपणातील सर्वात मोठी चूक (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
म्हातारपणात शरीर कमकुवत होते. अनेक आजार तुम्हाला त्रास देऊ लागतात. सर्वात जास्त विपरीत परिणाम मेंदूवर होतो. स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते आणि मानसिक आजारांचा धोका वाढतो. असे काही आजार आहेत ज्यामुळे माणूस आपल्या घराचा पत्ताही विसरू शकतो.
सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी एका चुकीबद्दल सांगितले आहे. सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे, लोकांना नर्व्हस सिस्टिमशी खेळण्याची सवय होते. यासाठी ते अनेक प्रकारच्या गोष्टी वापरतात. त्याचे वाईट परिणाम म्हातारपणात दिसून येतात. यामध्ये वारंवार कॉफी पिण्याची सवय देखील समाविष्ट आहे. याबाबत अधिक माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे
कॉफीचे अतिसेवन
कॉफीचे अतिसेवन केल्याने काय होऊ शकते
कॉफीमध्ये कॅफिन असते. हे मानसिक क्षमता, लक्ष केंद्रित करणे आणि सतर्कता वाढवण्याचे काम करते. आळस आणि कमी उर्जेसाठी हा एक उत्तम उपाय आहे. पण त्याचा परिणाम पाहून लोकांना त्याची सवय होते. दिवसातून अनेक वेळा कॉफी पिण्यास सुरुवात केली जाते आणि याचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर मेंदूवरही अधिक प्रमाणात होताना दिसून येतो.
कॉफी पिण्याने कोलेस्ट्रॉल वाढतं? Heart Attack पासून दूर राहण्यासाठी अभ्यासातील खुलासा एकदा वाचाच!
म्हातारपणात होईल त्रास
म्हातारपणात मेंदूला काय त्रास होऊ शकतो
सद्गुरु म्हणाले, ‘एक कप कॉफी पिण्यानंतर असे वाटते की मी सुपरमॅन झालो आहे.’ हे नर्व्हस सिस्टिमच्या उत्तेजनामुळे होते. जर तुम्ही सतत अशा प्रकारे नर्व्हस सिस्टिम उत्तेजित करत राहिलात तर तुमचे म्हातारपण वेदनांमध्ये जाऊ शकते. कारण तुम्ही उत्तेजक किंवा मादक पदार्थाने मज्जासंस्था अस्वस्थ करत आहात. याचा परिणाम मेंदूवर होईल आणि तुमची स्मरणशक्ती तुम्हाला मदत करणार नाही”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की मादक पदार्थ आणि उत्तेजक दोन्हीचे नकारात्मक परिणाम होतात. तुम्ही मज्जासंस्थेला उत्तेजित करण्याचा किंवा शांत करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा कोणताही परिणाम करत असाल, तरी ते नकारात्मक आहे. यामुळे खूप त्रास होऊ शकतो.
अल्झायमरचाही धोका
कॉफी पिण्याने म्हातारपणी अल्झायमरचा धोका उद्भवू शकतो
तुम्ही रोज सतत कॉफी पित असल्याची ही चूक केल्याने, मेंदू म्हातारपणात काम करणे थांबवू शकतो. ज्यामुळे न्यूरोलॉजिकल आजार होऊ शकतो. जर तुम्ही ही सवय सोडली तर तुम्ही डिमेंशिया आणि अल्झायमरचा धोका कमी करू शकता. याशिवाय, मज्जासंस्था बिघडल्यामुळे वृद्धापकाळात उद्भवणाऱ्या सर्व समस्या या त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे तरूणपणातच तुम्हाला कॉफी अधिक पिण्याची सवय लागली असेल तर ती चूक करणे वेळीच थांबवा. प्रमाणाच्या बाहेर कॉफी पिणे तुमच्या आरोग्यासाठी आणि मेंदूसाठी त्रासदायक ठरू शकते.
काय सांगतात सद्गुरू
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.