Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीक्ष्ण बुद्धी, उत्तम डोकं आणि घोड्यासारखी शक्ती मिळविण्यासाठी Sadhguru ने 5 पदार्थ खाण्याचा दिला सल्ला

ईशा फाउंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यानुसार जर या गोष्टींचे सेवन केले तर पोट निरोगी राहते आणि मनही तीक्ष्ण राहते. सद्गुरूंनी मुलांना आणि वृद्धांना या ५ गोष्टींचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 29, 2025 | 02:59 PM
बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत (फोटो सौजन्य - Instagram/iStock)

बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत (फोटो सौजन्य - Instagram/iStock)

Follow Us
Follow Us:

ईशा फाउंडेशनचे प्रमुख आणि जागतिक योग गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव नेहमीच त्यांच्या अनुयायांना आरोग्यविषयक टिप्स देतात. त्यांच्या आरोग्यविषयक टिप्स प्राचीन भारतीय वैद्यकीय पद्धती आणि आयुर्वेदावर आधारित आहेत. ते वैद्यकीय शास्त्राची उदाहरणे देऊन त्याचे फायदे स्पष्ट करतात आणि त्यांचे अनेक व्हिडिओदेखील व्हायरल होताना दिसतात. 

सद्गुरु म्हणतात की आपल्या आरोग्याचा प्रत्येक भाग, आपल्या रोगप्रतिकारक शक्तीपासून ते मेंदूच्या शक्तीपर्यंत, आपण काय खातो यावर अवलंबून असतो. म्हणूनच, चांगले आणि संतुलित खाणे महत्वाचे आहे, विशेषतः जेव्हा मेंदू सुधारण्याचा विचार येतो. योग गुरु आणि समग्र प्रशिक्षक सद्गुरु यांच्या मते, जर दैनंदिन आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर मेंदूचे आरोग्य लक्षणीयरीत्या सुधारू शकते. त्यांनी त्यांच्या YouTube व्हिडिओमध्ये स्पष्ट करून सांगितले आहे, आपणही जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Instagram/iStock) 

फळांचा उपयोग 

फळं खाणं ठरेल फायदेशीर

सद्गुरू म्हणतात की फळे शरीरासाठी चमत्कारी ठरू शकतात. जर फळे पुरेशा प्रमाणात खाल्ली तर त्यांचा शरीरावर चांगला परिणाम होतो. जर फक्त फळांवर आधारित आहार घेतला तर दोन तासांत पोट पुन्हा रिकामे वाटू लागते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पोट हलके राहते. हाच तो काळ आहे जेव्हा मेंदू उत्तम प्रकारे काम करतो. सद्गुरू म्हणतात की जर तुम्हाला मेंदूचा पूर्ण क्षमतेने वापर करायचा असेल किंवा शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहायचे असेल तर हाच सर्वोत्तम काळ आहे.

100 वर्ष हेल्दी दीर्घायुष्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेवांच्या 5 टिप्स ठरतील रामबाण, आयुष्याचा घ्याल आनंद

मधाचा वापर

मधाचा करून घ्या उपयोग

सद्गुरू म्हणतात की मध हा पृथ्वीवरील एकमेव पदार्थ आहे ज्याची रचना मानवी रक्तासारखी आहे. दररोज मध सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः ज्यांना छातीत कफ साठण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी. ते हृदय आणि मेंदू दोघांसाठीही चांगले आहे. ते मन सक्रिय ठेवते आणि ऊर्जा देते. ते मुलांसाठीदेखील फायदेशीर आहे आणि जर पांढऱ्या भोपळ्याच्या रसासोबत दिले तर ते मुलांसाठी एक उत्कृष्ट आहार बनते. हे मिश्रण मुलांची बुद्धिमत्तादेखील विकसित करते.

साखरेशिवाय कोकोचे सेवन 

कोको खाणे ठरेल उत्तम

सद्गुरूंच्या मते, कोको हा एक विशेष प्रकारचा उत्तेजक आहे. साखर न घातलेला कोको मेंदूला चांगले आणि अधिक सुरळीतपणे कार्य करण्यास मदत करतो. मेंदूचे कार्य जलद करण्यासाठी कोकोच्या बिया काळी मिरीसह चघळण्याची शिफारस ते करतात.

सद्गुरूंच्या अफलातून 2 टिप्स, 90% आजारांपासून राहाल दूर; वेळीच लावा सवय रहा निरोगी

सफेद पेठ्याचा ज्युस 

लहान मुलांना आवर्जून द्या पेठ्याचा ज्युस

सद्गुरू म्हणतात की जर दररोज एक ग्लास सफेद पेठ्याचा रस प्यायला गेला तर बुद्धिमत्तेत स्पष्ट वाढ दिसून येते. ते म्हणतात की जर मुलांना हा रस दररोज दिला गेला तर त्यांचा मेंदू आणि एकाग्रता दोन्ही तीक्ष्ण होतात. दमा असलेल्या लोकांनी या रसात थोडी काळी मिरी किंवा मध घालावी जेणेकरून त्यातील थंडावा कमी होईल

अंकुरित मेथी

मोड आलेल्या मेथीचा उपयोग

सद्गुरूंच्या मते, अंकुरित मेथीचे दाणे अर्थात मोड आलेले मेथीचे दाणे हे रक्त स्वच्छ करण्यास मदत करतात आणि त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगली प्रमाणात असतात. ते शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. स्तनपान देणाऱ्या मातांमध्ये दुधाचे उत्पादन करण्यास मदत करते. केस आणि नखे वाढण्यास मदत करते, रक्तदाब कमी करते, साखरेची पातळी कमी करते आणि शरीरातील जळजळ दूर करते. जर ते अंकुरित मूगासोबत खाल्ले तर ते मेंदूसाठी आणखी फायदेशीर आहे. सद्गुरू सल्ला देतात की ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी त्यांच्या दैनंदिन आहारात त्याचा समावेश करावा.

सद्गुरूंनी सांगितल्या टिप्स 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Sadhguru jaggi vasudev shared 5 foods should eat to get sharp mind intellectual quality and power like horse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Health News
  • Health Tips
  • Sadhguru Jaggi Vasudev

संबंधित बातम्या

सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा
1

सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच
2

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच

Workout Rule: रिकाम्या पोटी वर्कआऊट करणं योग्य की अयोग्य?
3

Workout Rule: रिकाम्या पोटी वर्कआऊट करणं योग्य की अयोग्य?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.