100 वर्षाचे दीर्घायुष्य हवं असल्यास जाणून घ्या सद्गुरू जग्गी वासुदेवांच्या टिप्स
उत्तम आरोग्य आणि कल्याण हा चांगल्या जीवनाचा मुख्य प्रवाह आहे. निरोगी राहण्यासाठी व्यक्ती अनेक प्रकारचे उपाय करून स्वतःला चांगले आयुष्य देण्याचा प्रयत्न करते. पण आजच्या काळात निरोगी राहण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय बनवण्यासाठी, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
सोशल मीडियावर जग्गी वासुदेव नेहमीच सक्रिय असतात आणि वेगवेगळ्या हेल्थ टिप्स शेअर करत असातात. या टिप्स तुम्हीही वापरू शकता आणि दीर्घायुष्य मिळविण्यास नक्कीच फायदा करून घेऊ शकता. त्यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीने निरोगी जीवनशैलीसाठी या सोप्या टिप्सचे पालन केले तर त्याला नक्कीच स्वत: मध्ये निरोगी बदल दिसून येईल (फोटो सौजन्य – iStock)
फळं आणि भाज्यांचा समावेश
कच्च्या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा
सद्गुरुंच्या मते, आपण दररोज आपल्या आहारात 40-50 टक्के लाईव्ह सेल फूड्सचा समावेश केला पाहिजे. लाइव्ह सेल फूड म्हणजे फळे, कच्च्या भाज्या, ड्राय फ्रूट्स किंवा कोणत्याही प्रकारचे स्प्राउट्स खाणे. सकाळी नाश्त्यात नियमित तुम्ही कडधान्याचा समावेश करा अथवा आपल्या आहारात सलाड आणि फळांचादेखील अधिक समावेश केल्यास तुम्हाला अधिक एनर्जी मिळते आणि वेगवेगळ्या आजारांपासूनही तुम्ही दूर राहता असे सद्गुरूंनी सांगितले आहे.
सद्गुरूंच्या मते, अन्नामध्येच एन्झाईम्स असतात जे आपल्या शरीरासह आपले अन्न पचवतात. पण आजकाल आपण ज्या पद्धतीने अन्न शिजवतो, त्या प्रक्रियेत अन्नातील बहुतेक एन्झाईम्स नष्ट होतात आणि जे अन्न आपण खातो ते आपल्याला दीर्घकाळ ताकद देण्यासाठी ते पचण्यातच खर्च होते आणि ऊर्जा कमी होते
बदाम खाण्यापूर्वी करा एक काम, कॅन्सरचा धोका होईल कमी, सद्गुरू जग्गी वासुदेवांचा सल्ला
झोपण्यापूर्वी नियमित आंघोळ करणे
दिवसातून दोन वेळा आंघोळ करावी
खरं तर, बरेच लोक आंघोळीच्या वेळेबद्दल वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की आपण सकाळी लवकर आंघोळ केली पाहिजे, तर काहींच्या मते आपण आपली आंघोळीची वेळ नेमकी नसली तरीही चालेत. पण सद्गुरूंच्या मते शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्यही खूप महत्त्वाचे आहे.
त्यामुळे झोपण्यापूर्वी जर आपण आंघोळ केली तर आपल्या मनातील सर्व ताणतणाव आणि विविध प्रकारचे ओझे कमी होऊन आपल्याला आराम वाटतो. आंघोळ केल्याने आपली केवळ शारीरिक शुद्धी होत नाही तर मानसिकदृष्ट्याही शुद्ध होते, ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
पाणी पिण्याचे प्रमाण
पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा आणि योग्य प्रमाणात पाणी प्या
योग्य प्रमाणात पाणी पिण्याने आपण निरोगी राहू शकतो कारण पाण्याशिवाय आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य हाताळणे कठीण होऊ शकते. सद्गुरूंच्या मते, पिण्याचे पाणी आपली शारीरिक उर्जा टिकवून ठेवते, ज्यामुळे आपण अधिक कार्यक्षम आणि सक्रिय राहू शकतो.
यासोबतच सद्गुरु सांगतात की, पाणी पिऊन आपले शारीरिक स्वास्थ्य स्थिर ठेवता येते. हे अत्यंत आवश्यक आहे कारण ते ऊर्जा पातळी राखण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने आपल्या अवयवांना ताजेतवाने करते आणि पोषण देते
जेवल्यानंतर पाणी पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या सद्गुरू आणि डॉक्टरांचा सल्ला
भूकेपेक्षा कमी खाणे
नेहमी भूकेपेक्षा कमी खावे
सद्गुरूंनी सांगितले की भूक लागणे आणि पोट रिकामे असणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुमच्या शरीरात उर्जा कमी असते पण जेव्हा तुमचे पोट रिकामे असते तेव्हा योग विज्ञान आणि आधुनिक विज्ञानानुसार ही स्थिती चांगली आहे.
सद्गुरूंच्या मते, पोट रिकामे असेल तेव्हाच आपण कोणतेही काम चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून, आपण नेहमी आपल्या भूकेपेक्षा कमी खावे आणि अनावश्यक फास्ट फूडसारख्या हानिकारक गोष्टी खाऊ नये.
डाळी आणि नट्स देतात मजबूती
डाळी आणि नट्सचा आहारात करा समावेश
चांगल्या आरोग्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती राखणे खूप महत्वाचे आहे आणि सद्गुरूंच्या मते, अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवू शकता. हे पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
आपल्या आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्य, काजू आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. ते तुम्हाला जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स देतात जे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाचे आहेत. याव्यतिरिक्त, तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे. झोपेच्या दरम्यान, तुमचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.