Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

28 वर्षांची प्रतीक्षा संपली! भगवान बुद्धांची तपोभूमी सारनाथचा UNESCO जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

Travel News : बाैद्ध धर्मातील सर्वात पवित्र स्थळ सारनाथला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील करण्यात आलं आहे. यामुळे आतंरराष्ट्रीय पातळीवर 'बुद्धिस्ट सर्किट आणखी मजबूत होणार असल्याचं म्हटलं जातंय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2026 | 08:01 AM
28 वर्षांची प्रतीक्षा संपली! भगवान बुद्धांची तपोभूमी सारनाथचा UNESCO जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

28 वर्षांची प्रतीक्षा संपली! भगवान बुद्धांची तपोभूमी सारनाथचा UNESCO जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

Follow Us
Follow Us:
  • भारतातील एका ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे.
  • या मान्यतेमुळे पर्यटनाला चालना मिळण्यासह सांस्कृतिक वारशालाही नवी ओळख मिळणार आहे.
  • जवळपास तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर या महत्त्वाच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले.
दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या युनेस्को जागतिक वारसा समितीचे ४८ वे अधिवेशनात आयोजित करण्यात आले होते. यात भारताच्या एका पवित्र ठिकाणाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील करण्या्चा निर्णय घेण्यात आला. हे ठिकाण म्हणजे बाैद्ध धर्मातील सर्वात पवित्र स्थळ सारनाथ. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता अखेर सारनाथला अधिकृतपणे युनेस्को जागतिक वारसा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…

उत्तर प्रदेशच्या पर्यटनाला मिळणार चालना

सारनाथ हे भारतातील ४५ वे स्थळ ठरले आहे, ज्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाला आहे. जर उत्तर प्रदेशाविषयी बोलणं केलं तर हे राज्यातील चौथे स्थळ आहे. याआधीही उत्तर प्रदेशच्या तीन स्थळांना युनेस्को यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. यात प्रामुख्याने ताजमहल, आग्रा किल्ला आणि फतेहपूर सिक्री यांचा समावेश होतो. राज्य सरकारचे म्हणणे आहे की, या या जागतिक मान्यतेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तर प्रदेशातील ‘बुद्धिस्ट सर्किट’ आता आणखी मजबूत होईल.

२८ वर्षांची प्रतिक्षा

पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, सारनाथ एका रात्रीतच युनेस्कोच्या यादीत सामील झाले नाही तर या ठिकाणाला ३ जुलै १९९८ मध्ये युनेस्कोच्या ‘टेंटेटिव लिस्ट’ मध्ये सामील करण्यात आले. आता २८ वर्षांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर सारनाथला प्रतिष्ठित दर्जा प्राप्त झाला आहे.

बुद्धांच्या पहिल्या प्रवचनाची पवित्र भूमी

सारनाथचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व फार मोठे आहे. ज्ञान प्राप्त केल्यानंतर भगवान बुद्धांनी मानवतेच्या कल्याणासाठी सर्वात पहिला उपदेश सारनाथ या ठिकाणी दिला. बाैद्ध धर्मातील या महान घटनेला ‘धर्मचक्र प्रवर्तन’ या नावाने ओळखले जाते. ‘ऋषीपट्टण’ सारख्या अनेक प्राचीन बौद्ध ग्रंथांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख आढळून आला आहे, यावरुन आपल्याला ठिकाणाच्या पवित्रतेचा अंदाज येतो.

या ठिकाणी झाली विक्रांत मेस्सीच्या ‘मुसाफिर कॅफे’ चित्रपटाची शुटिंग, ठिकाणाची सुंदरता अनेकांना करते मोहित

एएसआयने केली सुधारणा

जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित होण्याच्या काही महिन्यांआधी भारतीय पुरतत्व सर्वेक्षणाने या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण बदल केले. एएसआयने इंग्रजांनी लावलेल्या फलकाला काढून इतिहासात दुरुस्ती केली. सुरुवातीला या ठिकाणाच्या शोधाचे श्रेय ब्रिटिशांना दिले जात होते, परंतु आता हे स्पष्ट करण्यात आले आहे की, सारनाथच्या शोधाचा खरा श्रेय हा स्थानिक राजघराण्यातील बाबू जगत सिंग यांना जाते. मार्च महिन्यात, बाबू जगत सिंहचे वंशज प्रदीप नारायण यांनी एक निवेदन केले होते ज्यात त्यांनी म्हटले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने ऐतिहासिक कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर या स्थळाचे उत्खनन सर्वप्रथम बाबू जगत सिंग यांच्या आदेशानुसार करण्यात आले होते स्पष्ट केले आहे.

Web Title: Sarnath gets unesco world heritage status after 28 years india cultural landmark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
1

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
2

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide
3

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.