
चेहऱ्यावरील ड्रायनेस- तेलकटपणा कायमचा होईल कमी! मसूर डाळ आणि दुधाचा फेसपॅक त्वचेवर आणेल चमकदार ग्लो
कडाक्याच्या उन्हाळ्यात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा खूप जास्त टॅन होऊन जाते. याशिवाय सतत येणाऱ्या घामामुळे चेहरा तेलकट आणि चिकट होऊन जातो. त्वचेवर जमा झालेल्या अतिरिक्त तेलामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होते, ज्याच्या परिणामामुळे मोठे पिंपल्स, फोड किंवा मुरूम येतात. त्वचेच्या वाढत्या समस्यांमुळे चेहरा खूप जास्त निस्तेज होऊन जातो आणि ग्लो कमी होतो. त्वचा काळी पडणे, टॅनिंग, पिंपल्स, त्वचा अधिक कोरडी, निस्तेज होणे किंवा ओपन पोअर्सची समस्या वाढू लागल्यानंतर महिला अनेक वेगवेगळे उपाय करतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी वेगवेगळ्या महागड्या स्किन ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे त्वचेला खूप जास्त हानी पोहचते.(फोटो सौजन्य – AI)
चेहऱ्यावरील ग्लो कमी झाल्यानंतर महिला वारंवार केमिकल ट्रीटमेंट, फेशिअल तर काहीवेळा स्किन केअरचा प्रॉडक्टचा वापर करून त्वचेला गंभीर हानी पोहचवतात. याशिवाय वय वाढल्यानंतर त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात. ज्याच्या परिणामामुळे त्वचा खूप जास्त निस्तेज आणि काळवंडलेली दिसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी मसूर डाळ आणि दुधाचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मसूर डाळ आणि दूध स्वयंपाक घरात कायमच उपलब्ध असते. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि चेहरा अतिशय सुंदर, देखणा दिसतो. स्किन केअरसोबतच त्वचेला भरपूर पोषण देण्यासाठी आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.
फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात मसूर डाळ घालून बारीक पावडर वाटून घ्या. वाटून घेतलेली पावडर हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे पुन्हा पुन्हा वापरता येईल. त्यानंतर वाटीमध्ये मसूर डाळीची पावडर आणि दूध मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि काहीवेळ तसेच ठेवून द्या. त्वचा कोरडी झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ होण्यासोबतच टॅन सुद्धा कमी होईल आणि चेहरा उजळदार दिसेल.
Oily Skin: ऑयली स्किनला म्हणा बाय-बाय! महागडे स्किनकेअर नको, फक्त करा ‘हा’ घरगुती उपाय
कच्च्या दुधात असलेले लॅक्टिक ॲसिड चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यास मदत करते. यामुळे त्वचेच्या पेशी सुधारतात. त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी फेसपॅक लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे त्वचा स्वच्छ होण्यासोबतच चेहऱ्यावरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. हा उपाय सलग ७ दिवस नियमित केल्यास त्वचेच्या छिद्रांमधील घाण स्वच्छ होण्यासोबतच त्वचा अतिशय उजळदार आणि देखणी दिसेल.