Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Screen Time चा डोळ्यांना फटका! 2050 पर्यंत निम्म्या जगाला लागणार चष्मा, एम्सच्या तज्ज्ञांचं धक्कादायक वक्तव्य

Screen Time : वाढत्या स्क्रीन टाईमचा फटका डोळ्यांना बसत असल्याची माहिती दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी दिली आहे. तसेच येत्या 2050 पर्यंत जगातील 50 टक्के लोकांना चष्मा लागेल अशी धक्कादायक माहितीही त्यांनी दिली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 09, 2026 | 08:56 PM
Screen Time चा डोळ्यांना फटका! 2050 पर्यंत निम्म्या जगाला लागणार चष्मा, एम्सच्या तज्ज्ञांचं धक्कादायक वक्तव्य

Screen Time चा डोळ्यांना फटका! 2050 पर्यंत निम्म्या जगाला लागणार चष्मा, एम्सच्या तज्ज्ञांचं धक्कादायक वक्तव्य

Follow Us
Follow Us:
  • मायोपियासाठी चष्म्याची गरज भासण्याची शक्यता
  • लहान मुलांमध्येही दृष्टीदोषाचे प्रमाण वाढते
  • वाढता स्क्रीन टाइम आणि मैदानी खेळांचा अभाव समस्येमागील कारण
 

वाढता स्क्रीन टाइम (Screen Time) आणि बदलती जीवनशैली यामुळे जगभरात दृष्टीदोषाची समस्या वाढत आहे. 2050 पर्यंत जगातील जवळपास 50 टक्के लोकांना मायोपिया म्हणजेच दूरचे स्पष्ट न दिसण्याच्या समस्येसाठी चष्म्याची गरज भासू शकते, असा इशारा दिल्लीतील एम्सच्या तज्ज्ञांनी (AIIMS) दिला आहे. धक्कादायक म्हणजे, दिल्लीतील दर तीनपैकी एका व्यक्तीला चष्म्याची गरज असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.

एम्सच्या कम्युनिटी ऑप्थॅल्मॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण वशिष्ठ यांनी ही माहिती दिली. डोळ्यांच्या दृष्टीदोषाची समस्या ओळखून गरजूंपर्यंत वेळेत नेत्रतपासणी आणि चष्मे पोहोचवण्यासाठी दिल्लीमध्ये व्यापक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. प्रभावी रिफ्रॅक्टिव्ह एरर कव्हरेज (ईआरईसी) वाढवण्यासाठी या आराखड्याच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

एम्समध्ये संभाव्य उपायांचा अभ्यास

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) जिनेव्हा कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या विश्लेषण साधनाच्या मदतीने दिल्लीतील दृष्टीदोषाची स्थिती, सेवांमधील त्रुटी आणि संभाव्य उपायांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण दिल्लीसाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या उपक्रमात केंद्र आणि दिल्ली सरकारचे अधिकारी, एम्सचे तज्ज्ञ, विविध राज्यांतील कार्यक्रम अधिकारी तसेच डोळ्यांच्या आरोग्यावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. सुमारे ७० जणांची टीम या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी चर्चा करणार आहे. आशा कार्यकर्त्या आणि विविध आरोग्य केंद्रांच्या मदतीने गरजूंपर्यंत चष्मे पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.

लहान मुलांमधील दृष्टीदोषाचा चढता आलेख

डॉ. वशिष्ठ यांच्या माहितीनुसार, मुलांमधील दृष्टीदोषाचे प्रमाणही वाढत आहे. २००१ मध्ये सुमारे सात टक्के मुलांना दृष्टीसंबंधी समस्या होती. २०१२ मध्ये एम्सच्या अभ्यासात हे प्रमाण १३ टक्के आढळले, तर सध्याच्या काही अभ्यासांनुसार ते २० ते २५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

मुलांचा वाढता स्क्रीन टाइम हे या समस्येमागील प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अभ्यासासाठी संगणक, लॅपटॉप आणि मोबाइलचा वाढता वापर तसेच मैदानी खेळांऐवजी घरात मोबाइल गेम खेळण्याचे वाढते प्रमाण यामुळे मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी २०३० पर्यंतचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार आहे. त्यासाठीचा कृती आराखडा येत्या एक-दोन महिन्यांत प्रसिद्ध करण्याचे नियोजन असल्याचे डॉ. वशिष्ठ यांनी सांगितले.

Web Title: Screen time 2050 world population may need glasses aiims expert warning rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • AIIMS Delhi
  • eye care
  • WHO

संबंधित बातम्या

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
1

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Benefits Of Carrot: वयाच्या 50 वर्षांनंतर सुद्धा नजर राहील तीक्ष्ण! चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा गाजरचे सेवन
2

Benefits Of Carrot: वयाच्या 50 वर्षांनंतर सुद्धा नजर राहील तीक्ष्ण! चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा गाजरचे सेवन

Eye Mucus: सकाळी उठल्यानंतर डोळ्यांमध्ये चिकट पदार्थ जमा होतो? ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा दृष्टी होईल कमी
3

Eye Mucus: सकाळी उठल्यानंतर डोळ्यांमध्ये चिकट पदार्थ जमा होतो? ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा दृष्टी होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.