Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत पेनकिलरच्या गोळ्या खाणे आरोग्यासाठी धोकादायक! वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ गुणकारी पदार्थांचा करा वापर

आरोग्यासंबंधित छोट्या मोठ्या दुखण्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक नेहमी पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करतात. मात्र या गोळ्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. या गोळ्या खाण्याऐवजी आयुर्वेदातील हे उपाय नक्की करा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 11, 2025 | 10:01 AM
घरगुती पेनकिलर तयार करण्याची कृती

घरगुती पेनकिलर तयार करण्याची कृती

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. सर्दी खोकला होणे, सांधेदुखी, अंगदुखी, कंबर दुखणे इत्यादी हाडांचे दुखणे वाढण्याची शक्यता असते. अशावेळी अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेण्याऐवजी मेडिकलमधून पेनकिलरच्या गोळ्या आणून खातात. या गोळ्यांच्या सेवनामुळे तात्काळ आराम मिळतो. पण नेहमी नेहमी पेनकिलरच्या गोळ्या खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. शिवाय पेनकिलरच्या गोळ्या खाणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोणत्याही दुखण्यावर मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्या आणून खाल्या जातात. मात्र याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होतात. नेहमी नेहमी पेनकिलरच्या गोळ्या आणून खाल्यामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेण्याऐवजी अनेक लोक मेडिकल मधून पेनकिलरच्या गोळ्या आणून खाण्याचा सोपा पर्याय निवडतात. मात्र यामुळे आरोग्याला हानी पोहचते. पेनकिलरच्या गोळ्या तात्पुरता आजार बरा करण्यासाठी मदत करतात. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पेनिकलरच्या गोळ्या खाण्याऐवजी छोट्या मोठ्या दुखण्यांपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदातील काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तात्काळ आराम मिळेल.

घरगुती पेनकिलर तयार करण्याची कृती:

साहित्य:

  • सुंठ पावडर
  • एरंडेल तेल
  • पाणी

कृती:

  • घरगुती पेनकिलर गोळी तयार करण्यासाठी सर्वप्रथम, टोपात १०० मिली पाणी उकळवून घ्या.
  • त्यानंतर उकळत्या पाण्यात ५ ग्रॅम सुंठ पावडर घालून मिक्स करा.
  • नंतर त्याच पाण्यात ५ मिली एरंडेल तेल मिक्स करून घ्या.
  • सुंठ आणि एरंडेल तेल कोणत्याही प्रकारच्या दुखण्यावर तात्काळ आराम मिळवून देण्यासाठी मदत करते. तयार केलेले मिश्रण तुम्ही दिवसभरातून दोनदा पिऊ शकता.

हाडांच्या दुखण्यांपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन:

सुंठ पावडर:

प्रत्येक स्वयंपाक घरात सुंठ हा पदार्थ आढळून येतो. वेदनाशामक असलेले सुंठ अनेक आजारांवर प्रभावी आहे. अ‍ॅसिडीटी, जळजळ, सूज, सांधेदुखी, कंबरदुखी इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सुंठाचे सेवन करू शकता. शिवाय मसाल्यातील पदार्थांमध्ये सुंठाचा वापर केला जातो. आरोग्यासंबंधित अनेक समस्यांवर सुंठ प्रभावी आहे.

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

एरंडेल तेल:

आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर केला जातो. यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. या तेलाच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते, ज्यामुळे शरीर स्वच्छ होते. कोणत्याही प्रकारच्या वेदना, सूज इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करावा. शरीरात निर्माण झालेला मानसिक तणाव दूर करण्यासाठी तुम्ही एरंडेल तेलाचा वापर करू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Side effects of taking painkillers homemade painkiller recipe ayurvedic remedies for body pain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 10:01 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

दिल्लीमधील आंदोलनात वापरण्यात आलेले अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय? जाणून घ्या शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम
1

दिल्लीमधील आंदोलनात वापरण्यात आलेले अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय? जाणून घ्या शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम

भाजलेला की उकडलेला? मका खाण्याची योग्य पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे
2

भाजलेला की उकडलेला? मका खाण्याची योग्य पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे

मांसाहार खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो का? सर्जरीशिवाय मूळव्याध बरा करण्यासाठी आहारात करा बदल, पोट होईल स्वच्छ
3

मांसाहार खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो का? सर्जरीशिवाय मूळव्याध बरा करण्यासाठी आहारात करा बदल, पोट होईल स्वच्छ

पावसाळ्यात हाडांच्या वेदना कशामुळे वाढतात? शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे वाढतो आजारांचा धोका
4

पावसाळ्यात हाडांच्या वेदना कशामुळे वाढतात? शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे वाढतो आजारांचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.