pomogranate benefits: सकाळी उठल्यानंतर नियमित करा वाटीभर डाळिंबाचे सेवन, रक्त शुद्ध होण्यासोबतच शरीर होईल डिटॉक्स
डाळिंबामध्ये प्युनिकालाजिन्स आणि पॉलिफेनॉल्स असतात. ज्यामुळे हानिकारक पेशींपासून शरीराचे होणारे नुकसान टाळता येते. रक्तवाहिन्यांमधील 'एंडोथेलियल नायट्रिक ऑक्साईड' वाढवून रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्यासाठी डाळिंबाचे दाणे किंवा रस प्यावा.
डाळिंबाच्या दाण्यांमध्ये असलेले फायबर युक्त घटक पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतात. वारंवार पचनाच्या समस्या उद्भवत असतील तर आहारात डाळिंबाच्या दाण्यांचे सेवन करावे.
बऱ्याचदा अतिप्रमाणात डाळिंबाच्या दाण्यांचे सेवन केल्यास रक्तदाब आणखी खाली जाऊन चक्कर येणे किंवा अशक्तपणा वाढू शकतो. डाळिंबामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रक्रिया मंदावते.
बाजारातील थंड किंवा पॅकबंद ज्यूस पिण्याऐवजी डाळिंबाच्या दाण्यांचा रस प्यावा. यामुळे रक्तातील घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते.
हार्ट किंवा यकृताच्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी डाळिंबाचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.