Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त आहात? मग शरीराच्या ‘या’ भागांवर करा मसाज, डोकेदुखी होईल क्षणार्धात गायब

हल्ली वाढलेला कामाचा तणाव, धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींमुळे डोके दुखीची समस्या उद्भवू लागते. अशावेळी हे घरगुती उपाय नक्की करून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 12, 2025 | 09:45 AM
डोके दुखीपासून आराम मिळवण्यासाठी सोपे उपाय

डोके दुखीपासून आराम मिळवण्यासाठी सोपे उपाय

Follow Us
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा दिसून येतो. दैनंदिन जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा योग्य समतोल राखण्यास आरोग्यासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. पण हल्ली वाढलेला कामाचा तणाव, धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींमुळे डोके दुखीची समस्या उद्भवू लागते. डोके दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक डोक्याला बाम किंवा आयोडेक्स लावतात. मात्र यामुळे त्वचेवर परिणाम होण्याची शक्यता असते. शिवाय अनेक लोक डोके दुखीची समस्या वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध न घेता मेडिकलमध्ये मिळणाऱ्या पेनकिलर गोळ्याचे सेवन करतात. मात्र नेहमी नेहमी पेनकिलरच्या गोळ्या खाल्याने आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.(फोटो सौजन्य – iStock)

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

डोके दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर काहींना मळमळ, उलट्या होणे, खाण्यापिण्याची इच्छा न होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. डोके दुखीचा त्रास जाणवू लागल्यास पेनकिलरच्या गोळ्या जास्त खाऊ नये. पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे तात्काळ आराम मिळतो, मात्र काहीवेळा पून्हा एकदा डोके दुखण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय नक्की करून पहा.

पायांच्या बोटांवर मसाज करा:

डोके दुखीचा त्रास वाढल्यानंतर पायांच्या बोटांवर मसाज करा. जेणेकरून डोकेदुखीचा त्रास कमी होईल. यासाठी पायाच्या पहिल्या बोटाच्या मधील बिंदूंमध्ये पायाला चिमटा काढा. याचं प्रमाणे दोन बोटांच्या मधील गॅपमध्ये दाब द्या. यामुळे डोकेदुखीची समस्या कमी होईल आणि आराम मिळेल.

स्कॅल्प मसाज:

स्कॅल्प मसाज केल्यामुळे डोकेदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते. यासाठी कपाळावर ताजे बिंदू शोधा. त्यामध्ये कपाळातून एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत जाणाऱ्या रेषेला शोधा. त्यानंतर अंगठ्याने एकमिनिटं दाबून ठेवा. अशाप्रकारे स्कॅल्प मसाज केल्यास डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होईल.

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

मानेवर मसाज करा:

अनेकदा डोकेदुखीची समस्या उद्भवू लागल्यानंतर मानेच्या शिरा दुखण्यास सुरुवात होते. मानेच्या शिरा अतिशय नाजूक असतात. त्यामुळे मानेवर मसाज करताना हलक्या हाताने मसाज करावा. दोन्ही हात मानेच्या बाजूला ठेवून हलक्या हाताने हळूहळू खाली मानेवर अंगठ्याने बोट ठेवत मसाज करून घ्या. दोन मिनिटं याच स्थितीमध्ये राहून हळुवार मसाज करावा.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Simple remedies to get relief from headache acupressure points health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • Headache pain
  • home remedies

संबंधित बातम्या

महागड्या Makeup Remover चा वापर करण्याऐवजी ‘हे’ पदार्थ वापरून काढा चेहऱ्यावरील मेकअप, त्वचा होईल स्वच्छ
1

महागड्या Makeup Remover चा वापर करण्याऐवजी ‘हे’ पदार्थ वापरून काढा चेहऱ्यावरील मेकअप, त्वचा होईल स्वच्छ

Beauty Tips: दिवाळीआधी वजन होईल कमी, चेहरा दिसेल फ्रेश! ऋजुता दिवेकरानी सांगितलेले ‘हे’ उपाय शरीरासाठी ठरतील फायदेशीर
2

Beauty Tips: दिवाळीआधी वजन होईल कमी, चेहरा दिसेल फ्रेश! ऋजुता दिवेकरानी सांगितलेले ‘हे’ उपाय शरीरासाठी ठरतील फायदेशीर

Pigmentation: दिवाळीपर्यंत चेहऱ्यावरील काळे डाग होतील नाहीसे! महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी करा ‘हे’ घरगुती उपाय
3

Pigmentation: दिवाळीपर्यंत चेहऱ्यावरील काळे डाग होतील नाहीसे! महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी करा ‘हे’ घरगुती उपाय

Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी ‘या’ पद्धतीने केसांना लावा मेहंदी
4

Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी ‘या’ पद्धतीने केसांना लावा मेहंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.