
ब्रायडल ग्लो मिळवण्यासाठी सोप्या टिप्स
लग्न म्हंटल की खूप जास्त घाईगडबड प्रत्येक घरात असते. लग्नाची तयारी, खरेदी इत्यादी गोष्टींमधून वेळ काढत नवरीला सुद्धा सुंदर दिसण्यासाठी भरपूर तयारी करावी लागते. साखरपुडा, हळद, लग्नामध्ये मेकअप केल्याशिवाय नवरीला चांगला लुक येत नाही. पण सुंदर आणि त्वचेवर अधिक काळ टिकून राहणाऱ्या मेकअपसाठी नवरीला स्किन केअर रुटीन फॉलो करावे लागते. स्किन केअर रुटीन, विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन, पौष्टीक आहार, शरीराला आवश्यक असलेली झोप घेणे आवश्यक आहे. सुंदर त्वचा आणि आरोग्यासाठी या सर्व गोष्टी फॉलो कराव्या लागतात. मात्र या गोष्टी फॉलो न केल्यामुळे त्वचेवर पिंपल्स किंवा मुरुमांचे डाग येऊ लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लग्नाच्या एक महिना पूर्वी ब्रायडल ग्लो मिळवण्यासाठी त्वचेची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा:या गोष्टी डोळ्यांसाठी सर्वोत्तम, लागणार नाही मोठा चश्मा
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी सगळ्यात आधी फेशिअल करणे आवश्यक आहे. फेशिअल केल्यामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते आणि त्वचा उजळदार दिसू लागते. तसेच फेशिअल निवडताना तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेशिअल निवडा. जेणेकरून त्वचा खराब होणार नाही. चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी फेशिअल करताना तुम्ही स्किन स्पेशालिस्टचा सल्ला घेऊ शकता. फेशिअल नेहमी रात्री किंवा संध्याकाळच्या वेळी करावे.
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे शरीरातील अनेक आजार दूर होण्यास मदत होते. स्किन ग्लो करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पोटात साचून राहिलेल्या विषारी पदार्थांमुळे त्वचेवर पिंपल्स येतात. हे पिंपल्स येऊ नये पाणी प्यावे.
चमकदार त्वचेसाठी नियमित विटामिन सी युक्त रसाचे सेवन करावे. यामध्ये तुम्ही लिंबाचा रस, काकडी, पालक, बीट आणि गाजर इत्यादी पदार्थांपासून बनवलेल्या रसाचे सेवन करू शकता. हा रस आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. तसेच आहारात जास्त तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करू नये. तेलकट तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीरात उष्णता वाढ जाते.
हे देखील वाचा:भाऊबीजेच्या दिवशी हातांवर काढा ‘या’ डिझाइन्सची सुंदर मेहंदी, हात दिसतील सुंदर
बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचेवर घाण, धूळ, माती जमा होऊन त्वचा तेलकट होऊन जाते. तेलकट झालेल्या त्वचेवर लगेच पिंपल्स येतात आणि संपूर्ण त्वचा खराब होऊन जाते. त्यामुळे चेहऱ्यावर ब्रायडल ग्लो मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चेहऱ्यावर नियमित वाफ घ्यावी.