सर्वच महिला आणि मुलींना सणावाराच्या दिवसांमध्ये मेहंदी काढायला खूप आवडते. मेंहंदीमुळे हात अधिक उठावदार आणि सुंदर दिसतात. त्यामुळे लग्न समारंभात, सणाच्या दिवशी आणि इतर वेळी कोणताही कार्यक्रम असल्यानंतर महिला हातावर सुंदर मेहंदी काढतात. लवकर भाऊबीज हा सण येणार आहे. त्यामुळे यंदाच्या भाऊबीजेला हातावर काढण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाइन्स तुम्ही सहज हातांवर काढू शकता.
भाऊबीजेच्या दिवशी हातांवर काढा 'या' डिझाइन्सची सुंदर मेहंदी

काहींना भरलेली मेहंदी काढायला खूप आवडते. भरलेल्या मेहंदीमध्ये बारीक नक्षीकाम केलेलं असत. ज्यामुळे तुमचे हात अगदी सुंदर आणि मेहंदीच्या रंगाने भरलेले दिसतात.

हल्ली या मेहंदीचा मोठा ट्रेंड आला आहे. तळ हातांवर छोटीशी डिझाईन काढू शकता.ही मेहंदी कमीत कमी वेळात आणि कोणालाही सहज काढता येते.

अरेबिक मेहंदी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे यंदाच्या दिवाळीमध्ये हातांवर काढण्यासाठी या डिझाइन्स अगदी परफेक्ट आहेत.

बारीक डिझाइन्सची मेहंदी काढण्यासाठी मेहंदीचा कोन कापताना त्याचे पुढेच टोक बारीक कापा. ज्यामुळे जास्त जाड मेहंदी हातांवर पडणार नाही.

तुम्हाला जर संपूर्ण हातभरून मेहंदी काढायला आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीची सुंदर मेहंदी काढू शकता. ही मेहंदी कमीत कमी वेळात झटपट हातांवर काढता येते.






