Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावरील चमक हरवली आहे? तर १ वाटी तांदुळाच्या पाण्याचा ‘असा’ करा वापर,चेहरा दिसेल ग्लोइंग

सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये चेहऱ्याला सूट होईल असे योग्य स्किन केअर फॉलो केले पाहिजे. कोरियन स्किन केअर प्रोडक्ट्स बनवण्यासाठी तांदुळाच्या पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तांदुळाच्या पाण्याचा वापर कशा पद्धतीने करायचा याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 24, 2024 | 11:05 AM
टॅनिंग घालवण्यासाठी तांदुळाच्या पाण्याचा 'अशा' पद्धतीने करा वापर

टॅनिंग घालवण्यासाठी तांदुळाच्या पाण्याचा 'अशा' पद्धतीने करा वापर

Follow Us
Close
Follow Us:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्रतेचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा घरी असल्यानंतर चेहरा पूर्णपणे तेलकट आणि चिकट होऊन जातो. चेहऱ्यावर सगळीकडे तेल साचू लागते. तेलकट चेहरा वेळीच स्वच्छ केला नाहीतर संपूर्ण चेहऱ्यावर फोड किंवा पिंपल्स येण्यास सुरुवात होते. हे पिंपल्स घालवण्यासाठी पुन्हा एकदा अनेक उपाय करावे लागतात. पण सध्या बाजारात कोरियन प्रोडक्ट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहेत. या कोरियन प्रोडक्ट्सच्या मदतीने चेहऱ्यावर डाग किंवा पिंपल्स घालवले जातात.

कोरियन प्रॉडक्ट बनवण्यासाठी वापरला जाणारा महत्वाचा पदार्थ म्हणजे तांदुळाचे पाणी. तांदुळाच्या पाण्याचा वापर करून कोरियन प्रॉडक्ट बनवले जातात. हे प्रॉडक्ट चेहऱ्यासाठी खूपच प्रभावी आहेत. कोरियन प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी तांदुळाच्या पाण्याचा वापर करा. तांदुळाच्या पाण्यामध्ये असलेले एंटी एजिंग गुणधर्म त्वचेसाठी प्रभावी आहेत. तसेच यामुळे तुमची त्वचे डाग विरहित होण्यास मदत होते. डाग विरहित त्वचा मिळवण्यासाठी केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी तांदुळाच्या पाण्याचा वापर करा. आज आम्ही तुम्हाला चमकदार त्वचेसाठी तांदुळाच्या पाण्याचा वापर कसा करायचा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: काकडीच नाही तर त्याच्या बियाही आहेत गुणांचे भांडार; जाणून घ्या फायदे

चमकदार त्वचेसाठी तांदुळाच्या पाण्याचा वापर कसा करायचा?

टॅनिंग घालवण्यासाठी तांदुळाच्या पाण्याचा ‘अशा’ पद्धतीने करा वापर

पहिली पद्धत:

तांदुळाच्या पाण्याचा वापर करण्याआधी एका वाटीमध्ये १ चमचा तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात पाणी टाकून अर्धा ते १ तास भिजण्यासाठी ठेवा. तांदूळ भिजल्यानंतर त्यातील पाणी बाजूला काढा. त्यानंतर टोपामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ आणि त्याचे पाणी घालून शिजण्यासाठी ठेवा. १५ मिनिटं शिजवून झाल्यानंतर हे पाणी थंड करून घ्या. त्यानंतर तुम्ही थंड झालेले पाणी त्वचेला लावू शकता.

हे देखील वाचा: पावसाळ्यात होणारे 5 सामान्य Eye Infection, अशी लक्षणे दिसल्यास त्वरीत करा तपासणी

दुसरी पद्धत:

३ चमचे स्वच्छ धुवून घेतलेल्या तांदळामध्ये दीड ग्लास पाणी टाकून ३ दिवस तांदूळ भिजण्यासाठी ठेवा. ३ दिवसांनंतर तांदुळमधील पाणी वेगळे काढून घ्या. त्यानंतर कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर तांदुळाचे पाणी टाका. २० ते २५ मिनिटं ठेवून चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्यावर चमक येईल. टॅन झालेले चेहरा उजळण्यास मदत होईल.

टॅनिंग घालवण्यासाठी तांदुळाच्या पाण्याचा ‘अशा’ पद्धतीने करा वापर

तांदुळाच्या पाण्यापासून टोनर बनवण्याची कृती:

तांदुळाच्या पाण्यापासून टोनर तयार करण्यासाठी १ बॉटल तांदुळाच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. हे पाणी टोनर म्हणून चेहऱ्यावर वापरा. काही दिवसांमध्ये त्वचा उजळण्यास मदत होईल. हे टोनर चेहऱ्याला लावून १० मिनिटं ठेवून द्या.चेहरा कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

 

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Skin care how to apply rice water on face for healthy skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 10:42 AM

Topics:  

  • glowing face
  • rice water

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.