Eye Infection In Monsoon: पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या सामान्य असतात. डोळ्यात ओलावा निर्माण होणे, घाण येणे आणि प्रदूषणामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढतो. म्हणूनच, तुम्हाला या सामान्य डोळ्यांच्या संसर्गाबद्दल माहिती असणे आणि ते टाळण्यासाठी उपायांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात डोळ्यांची साथही जास्त प्रमाणात दिसून येते. यासाठी नक्की कोणती इन्फेक्शन्स होऊ शकतात जाणून घेऊया. (फोटो सौजन्य - iStock)
पावसाळाच्या दिवसात डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. यामध्ये नक्की कोणकोणत्या समस्यांचा समावेश आहे जाणून घेऊया
कंजक्टिव्हायटिस अर्थात पावसाळ्याच्या दिवसात डोळे लाल होणं ही सामान्य समस्या आहे. हे विषाणू, बॅक्टेरिया किंवा अॅलर्जीमुळे होऊ शकते, डोळे लाल होणे, खाज सुटणे, पाणी येणे अशा गोष्टी यामध्ये होतात
तेल ग्रंथींच्या बॅक्टेरियल संसर्गामुळे पापण्यांवर एक वेदनादायक मोठी पुळी येते. हे लवकर बरे होते, तुम्ही कोमट पाण्याचे कॉम्प्रेस आणि आयड्रॉप यासाठी वापरू शकता
डोळे कोरडे होणे हा संपूर्ण संसर्ग नसला तरी पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेमुळे डोळ्यांच्या कोरड्या आजाराची लक्षणे आणखी वाढू शकतात आणि डोळ्यांना त्रास होतो
फंगल क्रेरायटिस हा कॉर्नियाचा संसर्ग आहे. हे बुरशीमुळे होते. यामुळे वेदना, लालसरपणा, अंधुक दृष्टी, प्रकाशाची संवेदनशीलता आणि स्त्राव होऊ शकतो. कॉन्टॅक्ट लेन्स घालणाऱ्यांना जास्त त्रास होतो
कॉर्नियल अल्सर ही कॉर्नियावरील एक जखम आहे. हे संसर्ग, दुखापत किंवा कोरडे डोळे यामुळे असू शकते. लक्षणांमध्ये डोळा दुखणे, अंधुक दृष्टी, लालसरपणा आणि प्रकाश संवेदनशीलता यांचा समावेश होतो.
तुम्हाला गंभीर डोळ्यांचा संसर्ग असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. तसंच डोळ्यांना वारंवार हात लावू नका, हात स्वच्छ ठेवा, डोळ्यांची नियमित तपासणी करा