पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशिअल करण्यापेक्षा घरीच तयार करा गोल्डन क्रीम
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेचा ग्लो काहीसा कमी होऊन जातो. कारण बाहेरील हानीकारक सूर्याची किरण त्वचेवर थेट पडल्यामुळे चेहरा काळा होऊन त्वचा अतिशय कोरडी होऊन जाते. त्वचा काळी झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशिअल, क्लीनअप किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण काहीवेळा हे उपाय करूनसुद्धा त्वचेवर हवीतशी चमक किंवा ग्लो येत नाही. उन्हाळ्यात त्वचेची काळजी न घेतल्यामुळे काहीवेळा उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर चेहरा अतिशय तेलकट आणि चिकट होऊन जातो. तेलकट त्वचा स्वच्छ न केल्यास चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मोठे मोठे फोड येण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करून त्वचेची व्यवस्थित काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – iStock)
पायांचे घोटे काळेकुट झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून पाय करा स्वच्छ, काळे झालेले पाय होतील सुंदर
ग्लोइंग त्वचेसाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या क्रिम्सचा वापर करतात. मात्र कोणत्याही क्रीम चेहऱ्यावर लावू नये. शरीरात वाढलेल्या तणावामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. चेहऱ्यावर काळे डाग, डार्क सर्कल्स किंवा पिग्मेंटेशन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशिअल करण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी गोल्डन क्रीम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या क्रीममुळे तुमच्या त्वचेवर चमकदार ग्लो येईल आणि त्वचा अतिशय सुंदर आणि मऊ होईल.
त्वचेसाठी केशर अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले घटक त्वचेचा रंग उजळतात. याशिवाय चेहऱ्यावर आलेले डाग घालवण्यासाठी केशरचा वापर तुम्ही नियमित करू शकता. त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम कोरफड जेल करते. कोरफड जेलमध्ये असलेले घटक त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवतात. केशराचा वापर केल्यामुळे त्वचेमधील मेलेनिनचे उत्पादन कमी होते आणि रंग बदलण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन त्वचा चमकदार करण्यासाठी मदत करतात.