पायांचे घोटे काळेकुट झाले आहेत? मग 'हे' घरगुती उपाय करून पाय करा स्वच्छ
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासह त्वचेवरसुद्धा लगेच दिसून येतो. उन्हाळा सुरु झाल्यानंतर त्वचा अधिक काळवंडून जाते. याशिवाय त्वचेवर पिंपल्स येणे, त्वचा कोरडी होणे, त्वचा लाल होणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. या समस्या वाढू लागल्यानंतर अनेक महिला त्वचा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचा काहीवेळा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणून घरगुती उपाय करावे. सर्वच महिला त्वचेच्या आरोग्याची जास्त काळजी घेतात. चेहऱ्याची त्वचा खराब झाल्यानंतर अनेक वेगवेगळे उपाय केले जातात.मात्र पायांकडे लक्ष दिले जात नाही.(फोटो सौजन्य – iStock)
सॅडल, शूज किंवा इतर चप्पलचे डाग पायांवर तसेच राहतात. चप्पल लागल्यानंतर त्वचेला जखम होऊन त्वचेवर डाग तसेच राहतात. यामुळे बऱ्याचदा पायांची त्वचा काळवंडलेली दिसू लागते. सूर्याच्या किरणांमुळे त्वचा अधिक काळी आणि निस्तेज होऊन जाते. उन्हाळ्यात त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पायांची काळवंडलेली त्वचा उजळदार करण्यासाठी कोणती घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
बटाट्याच्या रसात असलेले गुणधर्म त्वचा उजळदार करतात. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर बटाट्याचा रस लावावा. याशिवाय लिंबाच्या रसात असलेले विटामिन सी त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार करतात. लिंबू आणि बटाट्याचा रस एकत्र मिक्स करून त्वचेवर लावल्यास त्वचेचे काळे डाग निघून जाऊन त्वचा स्वच्छ होते. हे मिश्रण आठवड्यातून दोनदा पायांवर लावल्यास काळवंडलेले पाय स्वच्छ होतील. या पायांच्या त्वचेसाठी नैसर्गिक उपाय करावे.
घामोळ्यांचे औषध तुमच्या स्वयंपाकघरात! ‘हा’ घ्या रामबाण उपाय
सुंदर आणि उजळदार त्वचेसाठी विटामिन सी अतिशय महत्वाचे आहे. संत्र्याचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि सुंदर दिसू लागते. यासाठी वाटीमध्ये संत्र्याचा रस, दुधाची साय आणि चंदन पावडर घेऊन मिक्स करा. त्यानंतर तयार करून घेतलेले मिश्रण संपूर्ण पायांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज करून झाल्यानंतर 10 मिनिटं पाय तसेच ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेवरील काळपटपणा कमी होईल आणि त्वचा अधिक सुंदर, उजळदार दिसू लागेल.