वयाच्या चाळीशीमध्ये सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी 'या' सोप्या टिप्स
वय वाढल्यानंतर त्वचेमध्ये अनेक बदल दिसू लागतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकदा त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र हेच केमिकल प्रॉडक्ट त्वचेसाठी काहीवेळा घातक ठरतात. यामुळे पिंपल्स किंवा त्वचेवर मुरूम येण्याची शक्यता असते. त्वचेवर आलेले फोड किंवा मुरूम त्वचेचे पूर्णपणे नुकसान करतात. वाढत्या वयात महिलांच्या त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतात. चेहऱ्यावर आलेले वांग, पिंपल्स आणि काळे डाग त्वचेचे नुकसान करून टाकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढत्या वयात त्वचा दीर्घकाळ तरुण आणि उठावदार ठेवण्यासाठी काही घरगुती आणि सहज करता येतील असे उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक सौदंर्य कायम टिकून राहील.(फोटो सौजन्य – iStock)
सुंदर दिसण्यासाठी सर्वच महिला नेहमीच मेकअप करतात. मेकअप केल्यामुळे त्वचेवरील समस्या लगेच दिसून येत नाही. पण काहीवेळा मेकअप केल्यानंतर तो लवकर काढला जात नाही. त्वचेवर अधिककाळ मेकअप तसाच ठेवल्यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे रात्री झोपण्याआधी मेकअप व्यवस्थित काढून वरून कोणतेही तेल किंवा क्रीम लावावे. जास्त वेळ मेकअप त्वचेमध्ये राहिल्यामुळे ब्लॅकहेड्स, पिंपल्स इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
सर्वच महिलांनी त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी. त्वचेची काळजी न घेतल्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी चेहऱ्याला सूट होणाऱ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करावा. चेहऱ्यावर केमिकलयुक्त मास्क किंवा फेसपॅक लावण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागल्यास स्किन केअर रुटीनमध्ये बदल करावा. याशिवाय सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून रोज सनस्क्रीन लावावे.
त्वचेचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोप घेतल्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. झोपल्यामुळे त्वचेमधील हानिकारक पेशी बाहेर पडून जातात आणि त्वचा दुरुस्त होते. रोजच्या फ्रेश झोपमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि काळी वर्तुळ निघून जातात.
टॅनिंग आणि सनबर्न टाळण्यासाठी हे घरगुती उपाय वापरून पहा…
नियमित त्वचा मॉइश्चरायझ करणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर मॉइश्चरायझ लावल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारून त्वचेतील ओलावा कायम टिकून राहतो. याशिवाय रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये तुम्ही रेटिनॉल आणि विटामिन सी सारखे अँटी-एजिंग घटक असलेले प्रॉडक्ट वापरू शकता.