
Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या 'या' पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
Skin Care: वातावरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम त्वचेवर झाल्यानंतर चेहरा खूप जास्त निस्तेज दिसू लागतो. याशिवाय वय वाढल्यानंतर किंवा तरुण वयात चुकीच्या स्किनचा केअरचा वापर केल्यामुळे आणि त्वचेची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा सैल पडणे, काळे डाग, पिगमेंटशन, पिंपल्स इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच दुर्लक्ष केल्यास त्वचा तरुण वयातच सैल पडू शकते.(फोटो सौजन्य – istock)
कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
त्वचा सैल पडल्यानंतर किंवा चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले महागडे स्किन केअर, महागड्या स्किन ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. पण त्याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. हजारो रुपये खर्च करून सुद्धा त्वचा आहे तशीच दिसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या आणि सैल त्वचा घट्ट आणि निरोगी करण्यासाठी स्वयंपाक घरात कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे त्वचेवरील नैसर्गिक ग्लो वाढतो आणि त्वचा आतून सुंदर होण्यास मदत होते. फेसपॅक लावल्यामुळे त्वचा टाईट राहण्यास मदत होते.
त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच बाजारातील महागड्या प्रॉडक्टचा वापर करू नये. यासाठी होममेड फेसपॅकचा वापर करावा. कॉर्न फ्लोर, कच्चे दूध, मुलतानी माती इतकेच साहित्य लागेल. फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कॉर्न फ्लोर, मुलतानी माती आणि कच्चे दूध घेऊन एकत्र मिक्स करा. तयार केलेले मिश्रण जास्त पातळ करू नये. घट्टसर पेस्ट बनवल्यानंतर ब्रशच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर फेसपॅक लावून २० मिनिटं तसेच ठेवा. फेसपॅक सुकल्यानंतर हाताने चेहऱ्यावरील फेसपॅक काढून टाका.
फेसपॅक पूर्णपणे सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. चेहरा पाण्याने धुतल्यानंतर टॉवेलने स्वच्छ पुसून घ्या. कॉर्न फ्लोरमध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स आढळून येतात. ज्यामुळे चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते. कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक एसिड, प्रोटीन आणि विटामिन आढळून येते. मुलतानी मातीच्या वापरामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होत नाही आणि नैसर्गिक ग्लो कायम टिकून राहण्यास मदत होते. त्वचा कायमच चमकदार आणि सुंदर ठेवण्यासाठी योग्य स्किन केअर फॉलो करणे आवश्यक आहे.
Ans: त्वचेची लवचिकता कमी होणे, सूर्यप्रकाशाचा जास्त संपर्क, वजनात मोठे बदल, धूम्रपान, ताणतणाव किंवा त्वचेची योग्य काळजी न घेणे यांसारख्या विविध कारणांमुळे त्वचा सैल दिसू शकते.
Ans: घरगुती फेसपॅकमुळे त्वचा काही काळासाठी अधिक तजेलदार आणि मऊ दिसू शकते; मात्र सैल झालेली त्वचा कायमची घट्ट करण्यासाठी फेसपॅक प्रभावी असल्याचे ठोस पुरावे नाहीत.
Ans: सामान्यतः घरगुती फेसपॅक 10 ते 15 मिनिटे ठेवून सौम्यपणे धुवून काढता येतो. जळजळ किंवा खाज जाणवल्यास लगेच चेहरा स्वच्छ धुवावा.