Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हामुळे त्वचा खूप जास्त टॅन झाला आहे? मग या पद्धतीने चेहऱ्यावर लावा कच्चे दूध, सकाळी उठताच त्वचेवर दिसेल ग्लो

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करावा. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यासोबतच चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास मदत होईल आणि त्वचा सुंदर दिसेल. जाणून घ्या चेहऱ्यावर दूध लावण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 18, 2026 | 09:35 AM
उन्हामुळे त्वचा खूप जास्त टॅन झाला आहे? मग या पद्धतीने चेहऱ्यावर लावा कच्चे दूध

उन्हामुळे त्वचा खूप जास्त टॅन झाला आहे? मग या पद्धतीने चेहऱ्यावर लावा कच्चे दूध

Follow Us
Follow Us:

कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा खूप जास्त टॅन आणि निस्तेज होऊन जाते. चेहऱ्यावरील ग्लो कमी झाल्यामुळे त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत येणारा घाम, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्वचा खूप जास्त चिकट आणि तेलकट होऊन जाते. चेहरा कायमच फ्रेश आणि ग्लोइंग दिसण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करून फेशिअल, क्लीनअप आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. त्वचेवर वाढलेले टॅन घालवण्यासाठी केवळ फेशिअलच नाहीतर वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट आणि महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर सुद्धा केला जातो.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्याच्या ओपन पोर्सना बंद करेल घरगुती टोनर, त्वचेवर येईल नैसर्गिक चमक; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

वारंवार केमिकल ट्रीटमेंट, स्किन केअर इत्यादी गोष्टी करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे चेहऱ्यावर वाढलेला टॅन कमी होण्यासोबतच त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होईल. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेला टॅन कमी करण्यासाठी कच्च्या दुधाचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. दुधाचा वापर केवळ चहा बनवण्यासाठी नाहीतर त्वचेसाठी सुद्धा केला जातो. चेहऱ्यावर वाढलेला टॅन, कोरडी त्वचा आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करावा. यामुळे त्वचा आठवडाभरात सुंदर आणि ग्लोइंग दिसेल.

कच्च्या दुधात लॅक्टिक ऍसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि स्वच्छ राहते. दुधामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा मॉईश्चराईज करण्यास मदत करतात. कच्चे दूध त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. वाटीमध्ये कच्चे थंड दूध घ्यावे. कापसाच्या गोळ्यांचे दूध संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज केल्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल आणि चेहरा सुंदर दिसेल. उन्हामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होण्यास मदत होईल आणि त्वचा सुंदर दिसेल.

त्वचेची नैसर्गिक चमक कायमच राहील टिकून! रात्री झोपण्याआधी ‘या’ तेलाने करा चेहऱ्यावर मसाज, काळे डाग होतील गायब

कच्च्या दुधाचा वापर करणे अतिशय सोपे आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेचे कोणतेही नुकसान करत नाही. चेहऱ्यावर वाढलेला टॅन कमी करण्यासोबतच त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. जर तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल तर नियमित चेहऱ्यावर रात्री झोपण्याआधी दूध लावावे आणि काहीवेळाने स्वच्छ धुवून त्यावर सीरम किंवा त्वचेला सूट होईल असे क्रीम लावावे. कच्च्या दुधात तुम्ही हळद आणि बेसन सुद्धा मिक्स करू शकता. फेसपॅक लावल्यास चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Skin care your skin become heavily tanned due to the sun then apply raw milk to your face using this method

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • home remedies
  • milk
  • skin care tips

संबंधित बातम्या

चेहऱ्याच्या ओपन पोर्सना बंद करेल घरगुती टोनर, त्वचेवर येईल नैसर्गिक चमक; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
1

चेहऱ्याच्या ओपन पोर्सना बंद करेल घरगुती टोनर, त्वचेवर येईल नैसर्गिक चमक; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

त्वचेची नैसर्गिक चमक कायमच राहील टिकून! रात्री झोपण्याआधी ‘या’ तेलाने करा चेहऱ्यावर मसाज, काळे डाग होतील गायब
2

त्वचेची नैसर्गिक चमक कायमच राहील टिकून! रात्री झोपण्याआधी ‘या’ तेलाने करा चेहऱ्यावर मसाज, काळे डाग होतील गायब

बद्धकोष्ठतेच्या त्रासाने कंटाळला आहात? मग कोमट दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, सकाळी उठल्यानंतर पोट होईल स्वच्छ
3

बद्धकोष्ठतेच्या त्रासाने कंटाळला आहात? मग कोमट दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, सकाळी उठल्यानंतर पोट होईल स्वच्छ

झोपण्याआधी नियमित करा ‘या’ पिवळ्या रंगाच्या पाण्याचे सेवन, आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो
4

झोपण्याआधी नियमित करा ‘या’ पिवळ्या रंगाच्या पाण्याचे सेवन, आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.