दातांवर वाढलेल्या पिवळेपणामुळे हसताना लाजिरवण्यासारखे वाटते? पांढऱ्या शुभ्र दातांसाठी करा 'हे' घरगुती उपाय
प्रत्येकाला आपले दात कायमच सुंदर आणि चमकदार हवे असतात. पांढऱ्या शुभ्र दातांसाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी महागडी टूथपेस्ट तर कधी दंतमंजन लावून दातांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम दातांवर दिसून येतो. तिखट, तेलकट, गोड पदार्थ किंवा अतिमसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे दातांवर पिवळा आणि पांढरा थर जमा होण्यास सुरुवात होते. दातांवर वाढलेल्या किळसवाण्या थरामुळे चारचौघांमध्ये हसताना लाजिरवण्यासारखे वाटते आणि महिलांना आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. चहा-कॉफीचे अतिसेवन, तंबाखूजन्य पदार्थ आणि दातांच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे दात अस्वच्छ वाटतात.(फोटो सौजन्य – istock)
दातांवर जमा झालेला पिवळा थर कमी करण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्स करून घेतल्या जातात. पण वारंवार केलेल्या ट्रीटमेंटमुळे दातांची गुणवत्ता खराब होऊन जाते आणि तरुण वयातच दात पडून जातात. त्यामुळे दातांच्या स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी कोणत्याही केमिकल ट्रीटमेंट न करता घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे दातांवरील चमक कायम टिकून राहते आणि दात स्वच्छ दिसतात. चला तर जाणून घेऊया दात स्वच्छ करण्यासाठी कोणते उपाय करावेत.
वाटीमध्ये बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण दातांवर लावून हलक्या हाताने चोळा. यामुळे दातांच्या भोवती जमा झालेला पांढरा, पिवळा थर कमी होण्यास मदत होईल. बेकिंग पावडरमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड आढळून येते, ज्यामुळे दातांवर वाढलेले डाग कमी होतात. दातांना लावलेले मिश्रण काहीवेळ तसेच ठेवल्यानंतर दात पाण्याने स्वच्छ करून घ्या. आठवड्यातून एकदा लिंबाचा रस आणि बेकिंग सोडायचे मिश्रण दातांवर लावल्यास दात स्वच्छ होण्यास मदत होईल.
दातांमध्ये वाढलेल्या वेदना किंवा दातांवर जमा झालेला पिवळा चिकट थर नष्ट करण्यासाठी मोहरी तेल आणि मिठाचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये मोहरीचे तेल आणि मीठ घेऊन पेस्ट तयार करावी. तयार केलेली पेस्ट दातांवर लावून ब्रशने दात स्वच्छ करावेत. त्यानंतर पाण्याच्या गुळण्या कराव्यात. मिठामध्ये सोडियम असते तर मोहरीच्या तेलातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म दातांचा पिवळेपणा कमी करून दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यास मदत करतात.
केळी खाल्ल्यानंतर साल फेकून दिली जाते. पण असे न करता केळीची साल फेकून देण्याऐवजी दातांसाठी वापर करावा. यासाठी केळीच्या सालीमधील आतील भाग दातांवर घासा, यामुळे दातांवर जमा झालेला पिवळा पांढरा थर नष्ट होण्यास मदत होईल. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम, मँग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केळीची साल दातांवर लावावी.
Ans: दिवसातून दोनदा (सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी) ब्रश करा, गोड आणि चिकट पदार्थ टाळा, जे दात किडण्याचे मुख्य कारण आहेत.
Ans: दात दुखणे, गोड किंवा थंड पदार्थ खाताना दातांमध्ये झिणझिण्या येणे, किंवा दातांवर काळे/पांढरे डाग दिसणे ही किडण्याची लक्षणे आहेत.
Ans: दात गिळणे सामान्यतः हानिकारक नसते, कारण ते पचनसंस्थेतून बाहेर पडतात. तथापि, जर तीक्ष्ण दात असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.






