Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: पिंपल्सने भरलेला चेहरा आठवडाभरात होईल स्वच्छ! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ हिरव्या पावडरचा करा वापर

Skin Care Tips: त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंब आणि कढीपत्त्याचा पांनाचा वापर करावा. यामुळे केवळ त्वचेच्या समस्या नाहीतर केसांना सुद्धा भरमसाट फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 12, 2026 | 10:25 AM
Skin Care Tips: पिंपल्सने भरलेला चेहरा आठवडाभरात होईल स्वच्छ! त्वचेची काळजी घेण्यासाठी 'या' हिरव्या पावडरचा करा वापर

Skin Care Tips: पिंपल्सने भरलेला चेहरा आठवडाभरात होईल स्वच्छ! त्वचेची काळजी घेण्यासाठी 'या' हिरव्या पावडरचा करा वापर

Follow Us
Follow Us:

Skin Care Tips: धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल,  प्रदुषित वातावरण इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामांमुळे अकाली केस पांढरे होणे, टक्कल पडणे, केसांत कोंडा होणे, चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स, काळे डाग येणे, सुरकुत्या इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या केमिकल्सयुक्त स्किन केअरचा वापर करतात. पण रासायनिक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये असलेले घटक त्वचेचे नुकसान करतात आणि चेहऱ्यावरील चमक नाहीशी करून टाकतात. वांरवांर चेहऱ्यावर पिंपल्स किंवा काळे डाग येत असतील तर अजिबात दु्र्लक्ष न करता डाॅक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि काळे डाग करण्यासाठी आयुर्वेदातील हिरव्या पावडरचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्द्ल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

कडुनिंबाच्या पानांचा वापर केल्यामुळे त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळते आणि चेहऱ्यावरील हरवलेली ग्लो पुन्हा परत मिळण्यास मदत होते. यामध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म, अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी-फंगल घटक असतात. त्यामुळे कडुलिंब आणि कढीपत्त्याचा पांनाचा वापर त्वचा आणि केसांसाठी करू शकता.  त्वचा आणि केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास कायमच घरगुती पदार्थांचा वापर करावा, ज्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. या दोन्ही पानांपासून घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पावडर तयार करून त्वचेवर लावू शकता.

हिरवी पावडर तयार करण्याची कृती

हिरवी पावडर तयार करण्यासाठी सर्वप्रथम कडुनिंबाची पाने आणि कढीपत्त्याची पाने पाण्याने स्वच्छ करून घ्या. स्वच्छ करून घेतलेली पाने कपड्यावर किंवा ताटात पसरवून हवेशीर ठिकाणी सुकण्यासाठी ठेवा. २ दिवस उन्हामध्ये सुकल्यानंतर पाने पूर्णपणे कुरकुरीत होतील. पूर्णपणे कुरकुरीत सुकलेली पाने मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून पावडर तयार करा. तयार केलेली पावडर कोरड्या एअरटाइट कंटेनरमध्ये भरून ठेवा. पावडर काढण्यासाठी कोरड्या चमचाचाच वापर करावा, जेणेकरून पावडर जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहील.

Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

फेसपॅक बनवण्याची कृती

चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग कमी करण्यासाठी वाटीमध्ये तयार केलेली हिरवा पावडर घेऊन त्यात दही किंवा गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा आणि १५ मिनिट तसाच ठेवून द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धूवुन घ्या. कोणतााही फेसपॅक लावण्याआधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फेसपॅक लावल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Skincare tips get a clear pimple free face in just a week use this green powder for your skincare routine sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • benefits of neem
  • glowing face
  • skin care tips

संबंधित बातम्या

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश
1

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर
2

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर
3

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.