Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ 1 मिनिटात कळणार आता ब्रेस्ट कॅन्सरची पहिली स्टेज, Smart Bra चा लागला शोध

Smart Bra: स्तनाचा कर्करोग ही महिलांसाठी मोठी समस्या बनत चालली आहे. हा आजार उशिरा आढळल्यास प्राणघातकदेखील ठरू शकतो. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री हिना खाननेही आपल्याला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे सांगितले होते. मात्र आता या समस्येवर तोडगा निघताना दिसत आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 27, 2024 | 10:18 AM
स्तनाच्या कर्करोगासाठी स्मार्ट ब्रा

स्तनाच्या कर्करोगासाठी स्मार्ट ब्रा

Follow Us
Follow Us:

स्तनाचा कर्करोग ही महिलांसाठी मोठी समस्या बनत चालली आहे. मात्र आता या समस्येवर तोडगा निघताना दिसत आहे. IIT कानपूरच्या एका संशोधकाने एक स्मार्ट ब्रा विकसित केली आहे, जी स्तनाचा कर्करोग शोधण्यात खूप उपयुक्त ठरू शकते. 

हिंदुस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, संशोधक श्रेया नायर यांनी बायोसायन्स आणि बायोइंजिनियरिंग विभागाचे प्रमुख प्रा. अमिताभ बंदोपाध्याय यांच्या देखरेखीखाली ही स्मार्ट ब्रा तयार केली आहे. ब्रेस्ट कॅन्सरचा प्रसार झपाट्याने होत असून या आजाराचे वेळीच निदान न होणे हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे श्रेयाचे मत आहे. त्यामुळे तिने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय. (फोटो सौजन्य – iStock) 

स्मार्ट ब्रा कसे काम करणार

स्मार्ट ब्रा चा उपयोग करून कळणार स्तनाचा कर्करोग

ही स्मार्ट ब्रा खूपच आश्चर्यकारकपणे कार्य करते. या ब्रामध्ये एक खास प्रकारचा सेन्सर आहे, जो स्तनामध्ये कोणताही बदल लगेच ओळखतो. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे लवकर दिसल्यास, हा सेन्सर ताबडतोब अलर्ट पाठवतो. अशाप्रकारे, स्त्रिया हा रोग अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच जाणून घेऊ शकतात आणि त्यावर उपचार करू शकतात. श्रेयाच्या म्हणण्यानुसार, या स्मार्ट ब्रा चा प्रोटोटाइप तयार आहे आणि क्लिनिकल चाचण्या केल्या जात आहेत.

हेदेखील वाचा – भारतात 30 पैकी एका महिलेला स्‍तनाचा कर्करोग, लक्षणे कशी दिसतात?

1 मिनिटात कळेल

ही ब्रा दिवसातून फक्त एक मिनिट घालायची असते. ही ब्रा मोबाईलशी कनेक्टड असून संपूर्ण डेटा तयार करते. सेन्सरला स्तनांमध्ये काही बदल आढळल्यास, तो मोबाईलवर संदेश पाठवतो आणि महिलेला डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला देतो अशी सिस्टिम यामध्ये तयार करण्यात आली आहे. 

हेदेखील वाचा – Breast Cancer होऊ शकतो पूर्ण बरा, या पद्धतीने करा स्वतःची तपासणी

एक वर्षानंतर बाजारात उपलब्ध

श्रेयाने सांगितले की, या स्मार्ट ब्रा ची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे आणि जर सर्व काही सुरळीत झाले तर वर्षभरात ती बाजारात उपलब्ध होईल. या ब्रा ची किंमत सुमारे 5 हजार रुपये असेल, असे कोणतेही उपकरण अद्याप बाजारात उपलब्ध नसल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे बाजारात आल्यानंतर याचा कशा पद्धतीने महिला उपयोग करून घेतील पाहावे. लागेल. सध्या यावर प्रक्रिया चालू असून चाचपणी केली जात आहे. 

Web Title: Smart bra will detect breast cancer in a 1 minute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 10:18 AM

Topics:  

  • Breast Cancer
  • Health News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.