भारतात 30 पैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग, लक्षणे कशी दिसतात?
भारतीय महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगामध्ये स्तनाचा कर्करोग हा पहिल्या क्रमांकावर येतो. दरवर्षी सुमारे एक लाख 60 नवीन रुग्णांची भर यात पडत आहे. तर जवळजवळ 80 हजार महिला या आजाराने दरवर्षी मृत्युमुखी पडतात. आपल्या देशात प्रत्येकी 30 पैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यत आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमधील महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. दरम्यान भारतात स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण सार्वजनिक आरोग्याच्या चिंतेचा विषय बनला आहे. दर चार मिनिटांनी एका महिलेचे या आजारासह निदान होते . लवकर निदान हा प्रबळ उपाय आहे. ज्यामुळे वाढत्या केसेसवर प्रतिबंध करण्यासोबत वेळेवर कर्करोगासंदर्भात योग्य काळजी घेण्यास मदत होऊ शकते. स्तनाच्या कर्करोगाबाबत वाढत्या जागरूकतेमुळे भिती नाहीशी होऊन योग्य माहिती मिळू शकते, तसेच महिला स्वत:च्या आरोग्याची सक्रियपणे काळजी घेण्यास सक्षम होऊ शकतात.
टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शलाका जोशी म्हणाल्या, “भारतात ३० पैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग होतो, जेथे गेल्या २५ वर्षांमध्ये हा आजार होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. लवकर निदान आजारामधून बरे होण्यासाठी महत्त्वाचे आहे. ज्यामुळे लवकर निदान केल्यास पाच वर्षांमध्ये उपचार यशस्वी होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक आहे. दुर्दैवाने लवकर चिन्हे व लक्षणांबाबत जागरूकतेचा अभाव, तपासणी उपलब्ध नसणे, वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष आणि उपचाराची भिती अशा कारणांमुळे आपल्या देशामध्ये ६० टक्के महलांचे प्रगत टप्प्यावर निदान होते. सुरूवातीच्या टप्प्यामध्ये निदान झाल्यास कमी इंटेन्सिव्ह उपचार करावा लागतो आणि जीवनाचा दर्जा उत्तम राहतो.
“माझ्या वैद्यकीय अनुभवामध्ये निदर्शनास आले आहे की, अनेक महिला त्यांच्या स्तनांमधील गाठींकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यामधून वेदना होत नाही. पण वेदना होत नसलेल्या गाठी जोखीमयुक्त असू शकतात हे माहित असणे महत्त्वाचे आहे. तरूण महिलांना देखील स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, म्हणून त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आमची या अज्ञानाचे निराकरण करत महिलांना ‘ब्रेस्ट अवेअर’ असण्यास आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेण्यास प्रेरित करण्याचे मिशन आहे. या जागरूकतेसह महिलांना सक्षम केल्यास आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.”
टाटा ट्रस्ट्स १९४० पासून भारतात कर्करोगासंदर्भात काळजी घेण्यामध्ये, तसेच ऑन्कॉलॉजी संशोधन व प्रगत उपचारांपासून कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर केअर प्रोग्राम स्थापित करण्यापर्यंत अग्रस्थानी आहे. टाटा ट्रस्ट्सने स्क्रिनिंग किओस्क्स आणि डायग्नोस्टिक युनिट्स स्थापित केले आहेत, तसेच राज्य सरकार व नॅशनल हेल्थ मिशनसोबत सहयोग करत उच्च दर्जाची व किफायतशीर केअर उपलब्ध होण्याची खात्री घेत आहे आणि स्तनाचा कर्करोग तपासणी उपक्रमांना पाठिंबा देत आहे. पायाभूत सुविधा प्रबळ करणे आणि उपलब्ध होण्याजोगे व उत्तम केअर उपलब्ध करून देणे त्याप्रमाणेच भारताच्या कानाकोपऱ्यातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकतेचा प्रसार करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
या मनसुब्यासह टाटा ट्रस्ट्सने अद्वितीय मोहिम ‘गाठ पे ध्यान’ (‘फोकस ऑन द लम्प’) लाँच केली. ही मोहिम महिला जेवण बनवताना अन्नामध्ये गुठळ्या येण्याला प्रतिबंध करण्यासाठी घेणाऱ्या बारकाईने काळजीमधून प्रेरित आहे. तसेच ही मोहिम महिलांना ‘गाठ’ (लम्प) येण्याच्या कोणत्याही लक्षणावर देखरेख ठेवण्यासाठी त्यांच्या स्तनांची नियमितपणे स्वत:हून तपासणी करण्यास प्रेरित करते.
स्थानिक समुदायांसोबत ऑन-ग्राऊंड कृतीचा भाग म्हणून टाटा ट्रस्ट्सने अधिकाधिक महिलांना त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास आणि स्वत:ची काळजी घेण्यास प्रेरित करण्यासाठी सामाजिक जागरूकता जाहिरात (Social Awareness Film) लाँच केली. पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि प्रख्यात शेफ संजीव कपूर यांचा समावेश असलेल्या या जाहिरातीचा महिला प्रेक्षकांपर्यंत पोहोचत त्यांना प्रेरित करण्याचा मनसुबा आहे. स्वयंपाक आणि स्तनाची स्वत:हून तपासणी यांना जोडणारे साधे उदाहरण कल्पकतेने सादर करत या जाहिरातीचा महिलांना स्तनाची तपासणी करण्यास, तसेच स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता जीवन वाचवण्यास प्रेरित करण्याचा मनसुबा आहे. यामुळे महिलांना वैद्यकीय निदान करण्यामध्ये विलंब होण्यास कारणीभूत ठरणारे घटक जसे कमी जागरूकता, सामाजिक नियम आणि लैंगिक पूर्वाग्रहांपासून वैद्यकीय मदत घेण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांना अवलंबून राहणे यांचे निराकरण होईल.
“टाटा ट्रस्ट्समध्ये आम्ही जागरूकता महिलांना स्वत:हून स्तनाची तपासणी करण्याच्या माध्यमातून लवकर निदानाच्या महत्त्वाबाबत जागरूक करण्यामध्ये बजावू शकणारी महत्त्वाची भूमिका ओळखतो. ‘गाठ पे ध्यान’ हा महिलांना दैनंदिन माहितीचा वापर करत या महत्त्वपूर्ण वर्तणूकीचा अवलंब करण्यास आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास प्रेरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशभरात आमच्या सामुदायिक इव्हेण्ट्सदरम्यान या संदेशाप्रती महिलांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामधून आम्हाला जाहिरातीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास प्रेरणा मिळाली, ज्यामुळे त्यांना ही काळजी घेणे किती सोपे आहे आणि जीवनदायी कशाप्रकारे ठरू शकते हे समजावण्यास मदत होईल,” असे टाटा ट्रस्ट्सच्या ब्रँड अँड मार्केटिंग कम्युनिकेशन्सच्या शिल्पी घोष म्हणाल्या.
प्रतिबंधात्मक व सक्रिय आरोग्यसेवा पद्धतींना प्राधान्य देत टाटा ट्रस्ट्सचा माहितीपूर्ण संवादांना चालना देण्याचा, जागरूकतेमधील महत्त्वपूर्ण तफावतींना दूर करण्याचा आणि सामायिक कृतीला प्रेरित करण्याचा मनसुबा आहे. सामाजिक प्रयोगात्मक जाहिरात सारखे प्रयत्न शक्तिशाली उत्प्रेरक आहेत, जे समुदायांमध्ये आशेचा किरण जागृत करण्यासोबत आरोग्याची काळजी घेण्यास प्रेरित करतात. ज्यामुळे खात्री मिळते की पार्श्वभूमी किंवा स्थान कोणतेही असो, प्रत्येक महिलेला आवश्यक असलेली केअर मिळते आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या प्रयत्नामध्ये पाठिंबा मिळतो.