Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोनच्या व्यसनाने चिमुकल्यांच्या मेंदूवर होतोय गंभीर परिणाम, संशोधनात खुलासा; या वयोगटातील मुलं सर्वात जास्त असुरक्षित

Autism in Children : आजच्या डिजिटल युगात लहान मुलांमध्येही स्मार्टफोनचा वापर झपाट्याने वाढताना दिसतोय. मात्र, या सवयीचा त्यांच्या मेंदूच्या विकासावर आणि एकूण आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 03, 2026 | 08:15 PM
स्मार्टफोनच्या व्यसनाने चिमुकल्यांच्या मेंदूवर होतोय गंभीर परिणाम, संशोधनात खुलासा; या वयोगटातील मुलं सर्वात जास्त असुरक्षित

स्मार्टफोनच्या व्यसनाने चिमुकल्यांच्या मेंदूवर होतोय गंभीर परिणाम, संशोधनात खुलासा; या वयोगटातील मुलं सर्वात जास्त असुरक्षित

Follow Us
Follow Us:
  • लहान वयात जास्त स्क्रीन टाइम मेंदूच्या विकासावर परिणाम करू शकतो.
  • १८ महिन्यांखालील मुलांसाठी स्क्रीन पूर्णपणे टाळणे आवश्यक.
  • पालकांनी मर्यादित वापरावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
मागील काही काळापासून स्मार्टफोनची क्रेझ इतकी वाढली आहे की याचा प्रभाव चिमुकल्यांवरही होताना दिसत आहे. प्रत्येक गोष्टीची जशी चांगली बाजू असते त्याचप्रमाणे त्याची वाईट बाजू देखील असते. कोणत्याही गोष्टीचा वापर हा अतिप्रमाणात केला तर त्याचा परिणाम आपल्यासाठी नुकसानकारक ठरु शकतो. असेच काही स्मार्टफोनबाबत देखील घडते. काॅल्स, मेजेजेस आणि मनोरंजनासाठी वापरले जाणारे स्मार्टफोन जेव्हा मर्यादेहून अधिक वापरले जाते तेव्हा त्याचा वापर आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम करतो. देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या एम्स (AIIMS), म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने अलिकडेच एक नवीन संशोधन केले आहे.

तुम्हीही चहात बिस्किट बुडवून खाता का? तुमची ही सवय वाढवेल आरोग्याचा धोका, आजच माहिती करून घ्या

मुलांमध्ये ऑटिझमचा वाढता धोका

एम्स दिल्ली येथील बालरोगशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. शेफाली गुलाटी यांच्या नेतृत्वाखालील पार पडलेल्या या अभ्यासात स्पष्ट झाले की, एक वर्षांचे होण्याआधी जर लहान मुलांना फोन दाखवला तर त्यांना वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत ऑटिझम आजार होण्याची शक्यता वाढते. हा मेंदूच्या विकासाशी संबंधित एक आजार आहे. आपल्याला वाटते की मूल शांत झाले आहे पण याचवेळी त्याच्या कोमल मनावर अनेक हल्ले होत असतात.

जगापासून अलिप्त होते मूल

संशोधनानुसार, जन्मापासून ते १८ महिन्यांपर्यंतच्या मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवले पाहिजे. या वयात मूल जे पाहते आणि ऐकते ते त्याच्या मेंदूच्या रचनेशी जुळते. याकाळात जर ते फक्त स्क्रिन पाहत राहिले तर ते खऱ्या जगापासून दुरावू लागतात. २०२५ सालच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील प्रत्येक ३१ मुलांपैकी एक मूल हे ऑटिझमच्या आजाराने ग्रस्त आहे. भारतातही ही आकडेवारी २० लाखांपर्यंत पोहचली आहे जी चिंताजनक बाब आहे.

मान- पाठीवर वाढलेला काळेपणा होईल कायमचा गायब! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे त्वचा होईल गोरीपान

तज्ञांच्या मते, १८ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा स्क्रीन टाइम पूर्णपणे शून्य असला पाहिजे. त्याचबरोबर १८ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी स्क्रिन टाईम हा १ तासापेक्षा अधिक नसला पाहिजे. जर एखादे मूल ४ तासांपेक्षा जास्त वेळ स्क्रिनवर घालवत असेल तर त्याला ऑटिझमचा त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, मुलांच्या निरोगी विकासासाठी पालकांनी स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Smartphone addiction impact on children brain development screen time risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • child
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
1

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
2

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
4

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.