Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्नायूंची वेदना की कर्करोग? हाडे आणि मऊ ऊतींचा सारकोमा ओळखणे का ठरते कठीण?

Soft Tissue Sarcoma Cancer Symptoms: हाडे आणि मऊ ऊतींचा सारकोमा हा दुर्मिळ कर्करोग असून त्याची सुरुवातीची लक्षणे सामान्य दुखापत किंवा स्नायूंच्या वेदनांसारखी दिसतात. त्यामुळे अनेकदा निदानास विलंब होतो आणि रोग वाढण्याचा धोका निर्माण होतो.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 07, 2026 | 03:01 PM
स्नायूंची वेदना की कर्करोग? हाडे आणि मऊ ऊतींचा सारकोमा ओळखणे का ठरते कठीण?
Follow Us
Follow Us:
  • स्नायूंची वेदना की कर्करोग?
  • हाडे आणि मऊ ऊतींचा सारकोमा ओळखणे का ठरते कठीण?
  • सारकोमा आजाराची लक्षणे
हाडे आणि मऊ ऊतींचा (Soft Tissue) सारकोमा हा एक दुर्मिळ प्रकारचा कर्करोग असून तो हाडे, स्नायू, चरबी, टेंडन, रक्तवाहिन्या किंवा शरीरातील संयोजी ऊतींमध्ये (Connective Tissues) निर्माण होऊ शकतो. हा कर्करोग दुर्मिळ असल्यामुळे आणि सुरुवातीची लक्षणे सामान्य स्वरूपाची असल्यामुळे अनेकदा त्याची गल्लत क्रीडा दुखापत, स्नायू ताणणे किंवा टेंडनच्या सूजेशी केली जाते. परिणामी, योग्य निदान आणि उपचार होण्यास विलंब होतो आणि काही वेळा तोपर्यंत रोगाची प्रगती झालेली असते. सैफी हॉस्पिटलचे स्पाइन सर्जन आणि ऑर्थोपेडिक कन्सलटंट डॉ. शब्बीर सुत्तरवाला यांच्याकडून जाणून घेऊयात सारकोमाची प्रमुख लक्षणे कोणती.

Hair Spa खरंच केसांसाठी फायदेशीर की फक्त पैशांची उधळण; जाणून घ्या

सारकोमाचे चुकीचे निदान होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे त्याची सुरुवातीची लक्षणे ही नेहमीच्या स्नायू व सांध्यांच्या समस्यांसारखीच असतात. रुग्णांना सतत बोथट वेदना, सूज किंवा शारीरिक हालचालीनंतर अस्वस्थता जाणवू शकते. तरुण खेळाडू या वेदना अतिवापरामुळे झाल्या असाव्यात असे समजतात, तर वयोवृद्ध व्यक्ती त्या संधिवात किंवा स्नायूंच्या थकव्यामुळे होत आहेत असे गृहीत धरतात. सुरुवातीच्या टप्प्यात हाडांच्या सारकोमामुळे होणाऱ्या वेदना काही काळ विश्रांती घेतल्यानंतर किंवा वेदनाशामक औषधे घेतल्यावर कमी होऊ शकतात. त्यामुळे अनेकांना ही साधी दुखापत असल्याचा गैरसमज होतो.

मात्र, सामान्य क्रीडा दुखापतींपेक्षा सारकोमाशी संबंधित वेदनांची काही वैशिष्ट्ये वेगळी असतात. या वेदना कालांतराने वाढत जातात, रात्री अधिक तीव्र होऊ शकतात आणि पुरेशी विश्रांती किंवा फिजिओथेरपी करूनही कायम राहतात. मऊ ऊतींच्या सारकोमामध्ये सुरुवातीला वेदना नसलेली, पण हळूहळू आकाराने वाढणारी गाठ दिसू शकते. तर हाडांच्या सारकोमामुळे हाड कमकुवत होऊन अगदी किरकोळ दुखापतीतही फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. अशी कोणतीही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत.

सारकोमाच्या उपचारांबाबतच्या अलीकडील मार्गदर्शक सूचनांनुसार, रुग्णांना शक्य तितक्या लवकर सारकोमा तज्ज्ञांकडे पाठवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. २०२५ च्या यूके सारकोमा व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संशयास्पद मऊ ऊतींच्या गाठींसाठी तातडीने एमआरआय (MRI) तपासणी करावी. शरीराच्या आत असलेली गाठ, झपाट्याने वाढणारी गाठ किंवा ५ सेंटीमीटरपेक्षा मोठी गाठ आढळल्यास त्वरित तज्ज्ञांकडे रेफर करावे. तसेच, भविष्यातील उपचारांवर परिणाम होऊ नये म्हणून बायोप्सी ही केवळ सारकोमा तज्ज्ञ केंद्रांमध्येच करावी.

सारकोमाच्या निदानामध्ये अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) यांचाही वापर वाढत आहे. सध्या एआय-आधारित इमेजिंगचा वापर संशोधनाच्या टप्प्यात असला तरी, कर्करोगाच्या गाठी आणि सामान्य स्नायू-सांध्यांच्या विकारांमधील फरक अधिक अचूकपणे ओळखण्यात त्याचा उपयोग होऊ शकतो. भविष्यात यामुळे निदानातील विलंब कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

निष्कर्षतः, बहुतेक क्रीडा दुखापती काही आठवड्यांत बऱ्या होतात. मात्र, दीर्घकाळ टिकणाऱ्या वेदना, कारण नसताना येणारी सूज किंवा सतत वाढत जाणारी गाठ ही सारकोमासारख्या गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात. त्यामुळे रुग्ण, प्राथमिक आरोग्यसेवा देणारे डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट आणि क्रीडा वैद्यक तज्ज्ञ यांनी या लक्षणांविषयी अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. वेळेवर योग्य तपासणी आणि तज्ज्ञांकडे रेफर केल्यास सारकोमाचे लवकर निदान होऊन उपचारांचे परिणाम अधिक चांगले होऊ शकतात.

Analogue Paneer: तुम्हीही खात नाही ना बनावट पनीर? कसे तयार होते; आरोग्यासाठी किती धोकादायक

Web Title: Soft tissue sarcoma symptoms diagnosis treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • cancer
  • Cancer Awareness
  • strong bones

संबंधित बातम्या

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?
1

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
2

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.