स्नायूंमध्ये आलेला क्रॅम्प कसा कमी करावा
प्रसिद्ध गायक सोनू निगम चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याने गायलेली सर्वच गाणी चाहत्यांना खूप जास्त आवडतात. सोनू निगमने बॉलिवूड आणि म्युझिक अल्बममध्ये अनेक गाणी गायली आहेत. नुकताच सोनू निगमचा पुण्यामध्ये एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान त्याची तब्येत काहीशी बिघडली होती. मात्र तरीसुद्धा त्याने लाईव्ह परफॉर्मन्स केला. स्टेज परफॉर्मन्स दरम्यान त्याचा पाय आणि पाठ दुखण्यास सुरुवात झाली होती. पाठीमध्ये सुई टोचल्यासारख्या वेदना होत होत्या. स्नायूंमध्ये क्रॅम्प आल्यानंतर अशी परिस्थिती ओढवते. अनेकदा चालताना किंवा कोणतेही काम करताना अचानकपणे पाठीमध्ये किंवा पायात क्रॅम्प येऊ लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्नायूंमध्ये क्रॅम्प आल्यानंतर कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
मज्जासंस्था आणि शरीराच्या नसा मजबूत ठेवण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन
शरीरातील स्नायू अतिशय लवचिक असतात. त्यामुळे कोणतेही काम करताना किंवा चालताना स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर अचानकपणे हातामध्ये किंवा पायांमध्ये क्रॅम्प येण्यास सुरुवात होते. अनेकांना ओटीपोटात दुखणे तर काहींचे हात पाय दुखू लागतात. मात्र या वेदना अनेकदा अतिशय तीव्र होण्याची शक्यता असते. अनेकदा एकापेक्षा जास्त स्नायू अचानकपणे आकुंचन पावतात, त्यावेळी क्रॅम्प येण्याची जास्त शक्यता असते.
शरीर जास्त वेळ कामात सक्रिय राहिल्यानंतर किंवा कोणताही अवघड व्यायाम प्रकार केल्यामुळे स्नायूंमध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते. याशिवाय शरीराची रक्तप्रवाह सुरळीत न होणे, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, रक्तवाहिन्यांवर आलेला दाब, शरीरात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी आवश्यक घटकांची कमतरता इत्यादी गोष्टींमुळे हातापायांमध्ये किंवा पाठीमध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते. दैनंदिन आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक व्यायाम करतात. मात्र अतिप्रमाणात व्यायाम किंवा जिम केल्यामुळे हातापायांमध्ये किंवा पाठीमध्ये पेटके येऊ लागतात.
व्यायाम करताना पाठीमध्ये किंवा पायांमध्ये क्रॅम्प आल्यानंतर हीट थेरपी घ्यावी. हीट थेरपी घेतल्यामुळे क्रॅम्पमुळे आलेली सूज कमी होण्यास मदत होते. याशिवाय गरम पाण्याने पाय शेकवल्यास लवकर आराम मिळेल. अँटऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे आहारात सेवन करावे.याशिवाय अँटऑक्सिडंट असलेली फळे आणि भाज्या खाव्यात. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. क्रॅम्प पासून सुटका मिळवण्यासाठी दैनंदिन आहारात भरपूर पाण्याचे सेवन करावे.
दैनंदिन आहारात कमी पाणी प्यायल्यामुळे स्नायूंमध्ये क्रॅम्प येण्याची सशक्यता असते. त्यामुळे नियमित ७ ते ८ ग्लास पाण्याचे सेवन करावे. भरपूर पाणी प्याल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. याशिवाय शरीराची हालचाल केल्यामुळे पाण्याचे सेवन करावे. ज्यामुळे शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवतं नाही.
शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा ‘या’ आंबट गोड फळाचे सेवन,आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
सतत हातापायांमध्ये क्रॅम्प येत असेल तर रात्री झोपण्याआधी नियमित स्ट्रेचिंग करावे. याशिवाय १० मिनिटं सायकलिंग केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे दररोज 25 ते 20 मिनिटं सायकल चालवावी. सायकल नियमित चालवल्यामुळे शरीरातील स्नायू लवचिक राहतात.